Join us  

अंगाला खूपच खाज येते? 'हे' पदार्थ खाणं कमी करा; रॅशेज, जळजळ होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 9:34 AM

How do you get rid of itchy skin in the winter : जास्त खाजवल्यास त्वचेतून रक्त बाहेर येतं आणि जखमा होतात किंवा इन्फेक्शन होतं.

हिवाळ्यात त्वचा खूपच  कोरडी पडते. ड्रायनेस  वाढल्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर खाज येते. जास्त खाजवल्यास त्वचेतून रक्त बाहेर येतं आणि जखमा होतात किंवा इन्फेक्शन होतं. एकावेळी खूप ठिकाणी खाज आल्यास समस्या वाढते. (Infection) अंगावर खाज येण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. रोजच्या खाण्यातले काही पदार्थ टाळले त्वचेवर खाज येण्याापासून सुटका मिळू शकते. (Which food is not good for itchy skin)

शेंगदाणे

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार शेंगदाणा एलर्जीचं कारण ठरू शकतो. शेंगदाण्यांमुळे अनेकदा त्वचेवर पुरळ उठणे, त्वचेखाली सूज येणे, श्वासोच्छवासाचा त्रास आणि पचन समस्या यांसारख्या समस्या उद्भवतात. शेंगदाण्यांची एलर्जी असल्यास असे कोणतेही पदार्थ खाण्यापूर्वी एकदा तज्ज्ञांचा सल्ला  घ्यावा.

आंबट पदार्थ

आंबट फळे आणि भाज्या शरीरात पित्तदोष वाढवतात. शरीरात पित्त वाढल्याने रक्तामध्ये घाण जमा होऊ लागते, ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. खाज टाळण्यासाठी आंबट पदार्थ कमी प्रमाणात खा.

सोया

लहान मुलांमध्ये सोयाची ऍलर्जी सर्वात सामान्य आहे, असा अंदाज आहे की सोया ऍलर्जी सामान्य लोकसंख्येच्या 0.5% पर्यंत प्रभावित करू शकते. ही ऍलर्जी सोया प्रोटीनच्या प्रतिक्रियेमुळे होते, जी सोयाबीन, मिसो, टोफू आणि टेम्पेह सारख्या अनेक सोया-आधारित उत्पादनांमुळे होऊ शकते.

गहू

गव्हाचे सेवन काहीजणांसाठी एलर्जीचं कारण असू शकतं. कारण यात अल्ब्युमिन, ग्लियाडीन, ग्लोब्युलिन आणि ग्लूटेन असते. यासह गव्हातील प्रथिनांच्या संपर्कात आल्याने गव्हाची ऍलर्जी उद्भवते. यामुळे खाज सुटणे, पचनाचा त्रास आणि श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात.

अंडी

अंड्यातील ऍलर्जी सामान्यत: अंड्याच्या पांढर्‍या भागामध्ये आढळणार्‍या विशिष्ट प्रथिनांमुळे उद्भवते, ज्यामध्ये ओव्हलब्युमिन, ओव्होट्रान्सफेरिन, अंड्याचा पांढरा लायसोझाइम आणि ओव्हुमुसिननी समृद्ध असतो. त्यामुळे एलर्जी होण्याची शक्यता असते.

खाज आल्यास कोणते घरगुती उपाय करावेत?

एलोवेरा

कोरफडीमध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे तुम्हाला त्वचेच्या संसर्गापासून मुक्त होण्यास मदत करतात. यासोबतच कोरफडमध्ये व्हिटॅमिन ई असते जे त्वचेला आर्द्रता प्रदान करते, ज्यामुळे खाज येण्यात आराम मिळतो.  कोरफडीचे जेल खाजवलेल्या भागावर लावा आणि 15 मिनिटे कोरडे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

कडूलिंब

कडूलिंब त्वचेसाठी चांगला मानला जातो.  कडुलिंब तुमच्या त्वचेसाठी खूप चांगला आहे. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबायोटिक गुणधर्म असतात जे खाज कमी करण्यास मदत करतात. कडुलिंबाची पाने पाण्यात उकळवा आणि नंतर कोमट किंवा थंड झाल्यावर आंघोळ करा किंवा कडुलिंबाची पाने बारीक करून दह्यामध्ये मिसळून खाज आलेल्या भागावर लावा.

मोहोरीचे तेल

मोहरीचे तेल हिवाळ्यात त्वचेवर लावण्यासाठी सर्वात उपयुक्त आहे. या तेलाने चेहरा आणि मान वगळता संपूर्ण शरीराला मसाज करा. 24 तासांच्या आत वेळ मिळेल तेव्हा मसाज करा. आंघोळ केल्यानंतर हे तेल अंगावर लोशनप्रमाणे लावा. यामुळे थंडीचा प्रभावही दूर होईल आणि त्वचेला मॉइश्चरायझेशनही मिळेल.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्य