सुंदर, टोकदार नखं कोणाला नाही आवडत. अनेक जणांना वाटते की आपली नखं सुंदर आणि आकर्षित दिसावे. पण नखांची हवी तशी काळजी घ्यायला जमत नाही. कधी रोजची कामं करताना नखं तुटतात. तर, कधी त्यात घाण अडकल्याने नखांचा रंग बदलतो. बऱ्याचदा नखं काळपट आणि पिवळट दिसू लागतात. नखांच्या टोकांवर घाण साचल्यानं कापण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही.
काही वेळेस हातांच्या नखांऐवजी पायांची नखे काळपट आणि खराब दिसतात. पायांच्या नखांची योग्य वेळेस काळजी नाही घेतल्यास त्यात बुरशी जमा होऊ लागते. वाढ होण्याआधीच तुटतात. पायांची नखे स्वच्छ करण्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो. फक्त नखं स्वच्छ करण्यासाठी खूप पैसेही खर्चही करतो (Beauty Tips). पण पैसे न खर्च करताही आपण घरगुती साहित्यात पायांची नखं स्वच्छ करू शकता. ते कसे पाहा(How Do You Get Rid of Yellow Toenails).
कोमट पाणी, गुलाब जल किंवा लिंबाचा रस
अनेकांच्या पायांची नखं घाणेरडी आणि काळपट दिसू लागतात. अशावेळी ज्यांना पार्लरमध्ये जायला जमत नाही, किंवा नखांसाठी पैसे खर्च करायचं नसेल तर, कोमट पाण्याचा वापर करून पाहा. कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवा. काही वेळानंतर पायांची नखं ब्रशने घासून घाण काढा, व टॉवेलने नखं पुसा.
रोज फक्त १ चमचा ‘ही’ पावडर खा, आयुष्यात कधी केस गळण्याची समस्या छळणार नाही!
नखे स्वच्छ आणि चमकदार करण्यासाठी, आपण लॅव्हेंडर तेलाचा वापर करू शकता. यामुळे नखांना मॉइश्चरायझेशन मिळते. आणि नखांची मालिशही होते. आपण लॅव्हेंडर तेलाऐवजी गुलाब जल आणि लिंबाच्या रसाचा देखील वापर करू शकता.
खोबरेल तेल
नखांमध्ये बुरशी येण्याचे कारण म्हणजे त्यांची नीट स्वच्छता न करणे. पायांच्या नखांची स्वच्छता करण्यासाठी आपण खोबरेल तेलाचा वापर करू शकता. यासाठी पाय स्वच्छ धुवून घ्या. त्यावर खोबरेल तेल लावा. काही वेळेनंतर नखं ब्रशने घासा, मग पाण्याने नखं धुवून घ्या. खोबरेल तेलातील गुणधर्मामुळे नखं निरोगी आणि स्वच्छ होतील.
घरीच करता येईल २ बदामांचं काजळ, डोळे दिसतील पाणीदार-सुंदर- केमिकलचाही धोका नाही
नखांचे क्यूटिकल्स नेहमी साफ करा
नखांची काळजी घेताना क्यूटिकल्सची साफसफाई करण खूप गरजेचं असतं. यामुळे इन्फेक्शन होत नाही आणि नखांना एक वेगळा सुंदर लूक येतो.