'मेकअप' हा सगळ्याच महिलांचा अगदी आवडता विषय आहे. कुठलाही खास प्रसंग किंवा सण, समारंभ असू दे सगळ्याचजणी हौसेने मेकअप करतात. एवढंच नव्हे तर डेली रुटीनमध्ये कॉलेज किंवा ऑफिसला जाताना देखील मेकअप केला जातो. आपल्यापैकी सगळ्याचजणींच्या बॅगेत एक छोटे मेकअप पाऊच कायम असते. या मेकअप पाऊचमध्ये आपल्याला मेकअपसाठी लागणारे सगळे साहित्य असते. अगदी अचानक मेकअप करण्याची वेळ आली तर बॅगेतील हा छोटा मेकअप पाऊच फारच उपयोगी पडतो(How to prevent bottles from leaking).
या मेकअप पाऊचमध्ये आपण काजळपासून लिपस्टिकपर्यंत सगळ्याच गोष्टी ठेवतो. हा मेकअप पाऊच अगदी आयत्यावेळी उपयोगी येत असला तरीही एक अडचण येते. ही अडचण म्हणजे या मेकअप पाऊचमध्ये आपण एकाचवेळी अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्स कोंबून भरतो. याचबरोबर काहीवेळा या पाऊचमध्ये ठेवलेल्या ब्यूटी प्रॉडक्ट्सची झाकण उघडून हे प्रॉडक्ट्स पाऊचमध्ये सांडतात. कधी फाउंडेशन उघडून सांडते तर कधी लिप्स्टिकचे कव्हर उघडून सर्वत्र पाऊचला लागून पसरते. यामुळे आपला मेकअप पाऊच व आतील सगळे प्रॉडक्ट्स खराब होतात. काहीवेळा असा खराब झालेला मेकअप पाऊच स्वच्छ करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो. यासाठी मेकअप पाऊचमधील प्रॉडक्टस सांडून पाऊच खराब होऊ नये म्हणून आपण एका सोप्या ट्रिकचा वापर करु शकतो(No more cosmetic bottle spills during travel).
मेकअप पाऊच खराब होऊ नये म्हणून...
बरेचदा प्रवासांदरम्यान आपल्या बॅगेतील मेकअप पाऊच मधील प्रॉडक्ट्स सांडून पाऊच खराब होण्याची शक्यता असते. काहीवेळा या ब्यूटी प्रॉडक्ट्सची झाकणं सतत वापरुन लूज पडतात तर कधी झाकण व्यवस्थित न लागल्याने पाऊचमध्ये हे प्रॉडक्ट्स सांडून ते खराब होते. यामुळे पाऊचही खराब होते सोबतच महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स देखील वाया जातात, असे होऊ नये म्हणून वापरा ही एक सोपी ट्रिक. alshihacks या इंस्टाग्राम पेजवरुन ही साधीसोपी ट्रिक शेअर करण्यात आली आहे. ही ट्रिक फॉलो केल्याने मेकअप पाऊच मधील ब्यूटी प्रॉडक्ट्सचे झाकण उघडले तरी ते पाऊचमध्ये सांडणार नाही, सर्वत्र पाऊचमध्ये पसरणार नाहीत.
साडीची घडी ‘अशी’ घाला झटपट, पाहा भन्नाट ट्रिक! कपाटही दिसेल आवरलेलं- साड्या राहतील नव्याकोऱ्या...
यासाठी आपल्याला एक रबरी फुगा लागणार आहे. एक रबरी फुगा घेऊन तो बरोबर मधोमध कात्रीने कापावा. त्यानंतर कापून घेतलेला हा फुगा ब्यूटी प्रॉडक्ट्स क्रिम, फाउंडेशन, ट्यूब यांच्या झाकणावर व्यवस्थित बसवून घ्यावा. त्याचा तळाकडील गोल फुगीर भाग वर येईल अशाप्रकारे तो झाकणांवर व्यवस्थित बसवून मग बोटांच्या मदतीने थोडा ट्विस्ट देत गोल फिरवून घ्यावा. या सोप्या ट्रिकमुळे पाऊचमधील ब्यूटी प्रॉडक्ट्स पाऊचमध्ये न सांडता पाऊच आतून स्वच्छ राहील. याचबरोबर, जर या ब्यूटी प्रॉडक्ट्सची झाकण लूज होऊन सारखी निघत असतील तर तसे न होता फुग्याच्या मदतीने ही झाकण फिट बसतील.
कोरड्या-काळ्यानिळ्या पडलेल्या नखांवर चमकच नाही? ‘हे’ ५ उपाय करा- नखं दिसतील गुलाबी सुंदर...
मस्कारा पसरुन पापण्यांवर जाड थर दिसतो? या ७ चुका टाळा, डोळे दिसतील टप्पोरे सुंदर...
इतरही गोष्टी लक्षात ठेवा...
१. वापरुन झाल्यावर ब्यूटी प्रॉडक्ट्स पाऊचमध्ये ठेवताना त्याचे झाकण व्यवस्थित लागले आहे ना याची आधी खात्री करा. आणि मगच ते पाऊचमध्ये ठेवा.
२. एखाद्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचे झाकण जर लूज झाले असेल तर वेळीच ते बदला किंवा हे प्रॉडक्ट्स एका वेगळ्या पाऊचमध्ये ठेवा.
३. मेकअप पाऊचमध्ये तळाशी एखादा टिश्यू पेपर किंवा कॉटनचा रुमाल अंथरुन मग त्यावर हे प्रॉडक्ट्स ठेवा.