Join us  

पार्लरला जायला वेळ नाही ? ४ सोप्या स्टेपमध्ये वापरा एलोवेरा जेल, ऐन दिवाळीत येईल चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2023 9:00 AM

How To Use Aloe Vera For Your Skin : सणावाराच्या निमित्ताने कामाच्या गडबडीत पार्लरमध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळ नाही, अशा परिस्थितीत एलोवेरा जेलचा वापर करुन हरवलेला ग्लो परत आणू शकतो...

सध्या सगळीकडेच दिवाळी (Diwali 2023) सणाची धामधूम पहायला मिळत आहे. दिवाळीची तयारी, शॉपिंग, साफसफाई करण्यात आपण एवढे व्यस्त होऊन जातो की आपल्याला स्वतःकडे पहायला वेळ देखील मिळत नाही. या सगळ्या कामात आपले शरीर इतके थकून जाते की स्वतःसाठी वेळच उरत नाही. सततचा हा थकवा आल्यामुळे आपल्या चेहेऱ्यावरचा स्किन ग्लो हळुहळु कमी होऊ लागतो. चेहऱ्यावरचा स्किन ग्लो कमी झाल्यामुळे ऐन दिवाळीत (How can I use aloe vera to whiten my skin fast) आपली स्किन डल, निस्तेज व रुक्ष दिसू लागते. अशावेळी इतर कामाच्या गडबडीत आपल्याला पार्लरमध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळ देखील नसतो. अशा परिस्थितीत घरच्या घरी कोरफडीच्या गराचा वापर करुन आपण आपला हरवलेला ग्लो परत आणू शकतो(How do you use aloe vera for instant glowing skin).  

आजकाल बहुतेक ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये एलोवेरा जेलचा वापर फार मोठ्या प्रमाणांत केला जातो. त्वचेच्या अनेक लहान - सहान समस्या दूर करण्यासाठी एलोवेरा जेल हा अत्यंत फायदेशीर ठरतो. त्वचेच्या अनेक समस्यांवर वेगवेगळे उपचार शोधण्यापेक्षा कोरफडीचा (How to Use Aloe Vera for Clear Glowing Spotless Skin) एकच उपाय करणं फायदेशीर मानला जातो. सणांच्या तयारी करण्याच्या गडबडीत जर आपल्याला पार्लरला जायला वेळ नसेल तर आपण घरीच एलोवेरा जेलचा वापर करु शकतो. या जेलचा वापर करून आपण घरीच होममेड फेशियल ( 4 Steps To Use Aloe Vera Gel for Face) करु शकतो. या एलोवेरा जेल वापर करून आपण चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणू शकतो. यंदाच्या दिवाळी पार्लरला न जाता घरच्या घरीच करा होममेड फेशियल, आणि मिळवा इन्स्टंट ग्लो(How To Use Aloe Vera For Your Skin). 

एलोवेरा फेशियल नेमके कसे करावे ? 

स्टेप १ :- सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ करण्यासाठी एका बाऊलमध्ये एलोवेरा जेल घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळून घ्यावा. आता हे मिश्रण चेहऱ्याला लावून घ्यावे. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करावा. एलोवेरा जेल व लिंबाच्या रसात असणारे अँटीऑक्सिडंट्स आपली त्वचा स्वच्छ करण्यास मदत करतात. यामुळे आपल्या त्वचेतील घाण निघून जाण्यास मदत होते. 

आयब्रो थ्रेडिंगनंतर येणारी सूज, जळजळ, रॅशेज कमी करण्यासाठी सोपे ५ उपाय, आता पेनलेस आयब्रो करा बिनधास्त...

स्टेप २ :- आता चेहऱ्याची स्वच्छता करुन घेतल्यानंतर त्वचेचे स्क्रबिंग करावे. स्क्रबिंग करण्यासाठी एका बाऊलमध्ये एलोवेरा जेल घेऊन त्यात लिंबाचा रस व तांदुळाचे पीठ मिसळून घ्यावे. हे तयार मिश्रण चेहऱ्यावर लावून घ्यावे. यानंतर या मिश्रणाने हलक्या हाताने चेहऱ्यावर स्क्रबिंग करुन घ्यावे. स्क्रबिंग करुन मसाज  केल्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होईल. चेहऱ्यावरील डेड स्किन निघून गेल्यामुळे त्वचेवरील काळपटपणा दूर होऊन त्वचा अधिक चमकदार होते. 

अभ्यंगस्नानासाठी नेमके कोणते तेल वापरावे ? तेल गरम करण्याची योग्य पद्धत, त्वचेला होतील अनेक फायदे...

स्टेप ३ :- यानंतर एलोवेरा जेल घेऊन त्यात मध घालावे. या मिश्रणाने चेहऱ्याला १० ते १५ मिनिटे मसाज करुन घ्यावा. त्यानंतर चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. यामुळे त्वचेतील ब्लड सर्क्युलेशन हे सुरळीत होऊन त्वचेला पुरेशा प्रमाणांत ऑक्सिजन मिळतो. यामुळेच आपली त्वचा अधिक मुलायम होऊन चमकदार दिसू लागते. 

सणासुदीसाठी मेकअप करताना ४ सोप्या स्टेप्समध्ये फाउंडेशन लावण्याची योग्य पद्धत, चेहरा दिसेल उजळ...

स्टेप ४ :- सगळ्यात शेवटी फेसमास्क तयार करण्यासाठी एलोवेरा जेल घेऊन त्यात चंदन पावडर व गुलाबपाणी मिसळून घ्यावे. हे मिश्रण एकजीव करुन घेऊन त्याची पेस्ट तयार करावी. हा फेसमास्क चेहऱ्याला लावून तो सुकेपर्यंत किंवा १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर तसाच ठेवून द्यावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. चेहरा पुसून कोरडा केल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावून मसाज करावा. 

चुकूनही गुलाब पाण्यात हे ४ पदार्थ मिसळून चेहऱ्याला लावू नका, ऐन दिवाळीत चेहरा होईल निस्तेज आणि खरखरीत...

अशाप्रकारे आपण एलोवेरा जेल वापरुन घरच्या घरी एलोवेरा फेशियल करुन त्वचेवर इन्स्टंट ग्लो आणू शकतो.

टॅग्स :दिवाळी 2023ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी