Join us  

How to get black hair naturally : केस फार पांढरे झालेत? मेहेंदी लावताना फक्त १ गोष्ट मिसळा अन् मिळवा दाट, काळेभोर केस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 3:39 PM

How to get black hair naturally : मेहेंदीमध्ये मिसळून घ्या फक्त 'हे' पदार्थ; म्हातारपणातही काळेभोर राहतील केस

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत खूप कमी वयातच मुला- मुलींचे केस पांढरे व्हायला सुरूवात होते. पार्लरच्या ट्रिटमेंट्स, केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर यामुळे केसांची नैसर्गिक चमक कमी होऊन केस गळायला सुरूवात होते. (How to get black hair naturally) अनेकदा केस काळे करण्यासाठी हेअर डाई किंवा हेअर कलर वापरल्यास केसांचे नुकसान होते आणि केस झपाट्याने गळू लागतात.  पांढरे केस काळे करण्यासाठी नैसर्गिक पद्धतींचा अवलंब केल्यास चांगला परिणाम दिसून येतो.  (Simple Natural Home Remedies to Get Black Hair)

बदामाचे तेल आणि मेहेंदी

केस काळे आणि घट्ट होण्यासाठी बदामाचे तेल मेहेंदी पावडरसोबत वापरा. एका भांड्यात पाणी घालून मंद आचेवर गरम करा. त्यात मेहेंदी पावडर आणि बदामाचे तेल घाला. ते चांगले मिसळा आणि थोडा वेळ थंड होऊ द्या. मेहेंदी आणि बदामाच्या तेलाने बनवलेली ही पेस्ट केसांना लावा आणि काही वेळ तशीच ठेवा. केसांचा मास्क अर्धा तास ठेवा आणि नंतर केस धुवा. आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क वापरा. यामुळे केस मजबूत, दाट आणि काळे होतील.

वाढलेली शुगर लेव्हल झटपट कमी करतील हे ६ पदार्थ; अचानक डायबिटीस वाढण्याचा टळेल धोका

मेथीची पावडर आणि मेहेंदी

मेहेंदी भिजवण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये मेथीच्या दाण्यांची पावडर आणि कॉफी पावडर एकत्र करून 2 ते 3 मिनिटांपर्यंत गॅसवर उकळत ठेवा. त्यानंतर त्यामध्ये लवंगाची पावडर एकत्र करून 3 मिनिटांसाठी पुन्हा उकळून घ्या. तयार मिश्रण गॅस बंद करून बाजूला ठेवा. मेथीच्या दाण्यांची पावडर केसांना नॅचरली मजबूत आणि काळे करण्यासाठी मदत करते. तर कॉफी पावडर मेहंदीचा रंग डार्क करण्यासाठी मदत करते. तसेच लवंगाची पावडर केसांना मुळापासून मजबुत करते. 

 सर्दी, खोकला झालाय; अधून मधून घसाही दुखतो? रोजचा त्रास टाळण्यासाठी काय खायचं काय टाळायचं; वाचा

पांढरे केस काळे करण्यासाठी हे उपाय करा

केसांना सुंदर बनवण्यासाठी तिळाचे तेल लावा. यामुळे केस लांब आणि दाट होतील.

केस धुण्यासाठी शिककाई पावडर किंवा सौम्य शॅम्पू वापरा.

केस धुण्यापूर्वी एक कप चहाचे पाणी उकळून त्यात एक चमचा मीठ टाका.  केस धुण्याच्या एक तास आधी हे मिश्रण केसांना लावा.

आले बारीक करून त्यात थोडा मध मिसळून केसांना लावा. यामुळे केस काळे होण्यास मदत होईल.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्सत्वचेची काळजी