तुरटी अनेकांच्या घरात सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे. तुरटीचा वापर अँटी-बॅक्टेरियाच्या गुणधर्मांमुळे शतकानुशतके अनेकांच्या घरात केला जात आहे. कधी दुखापतीनंतर रक्तस्त्राव थांबविण्याकरिता, कधी पावसादरम्यान पायातील संक्रमण कमी करणे आणि अँटी सेप्टिक म्हणून दाढी केल्यावर चेहऱ्यावर जळजळ होऊ नये म्हणून तुरटीचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला तुरटीचे अनेक फायदे सांगणार आहोत.
तुरटी काय आहे?
तुरटीचे वैज्ञानिक नाव पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट आहे. त्याला पोटॅश किंवा सरळ तुरटी देखील म्हणतात. नैसर्गिकरित्या सापडलेल्या तुरटीचे गोळे ते तयार करण्यासाठी वापरतात. तुरटीला तुरट आणि आम्लयुक्त चव असते. हे पांढर्या आणि फिकट गुलाबी रंगात दोन रंगात येते, परंतु घरात पांढर्या तुरटीचा वापर जास्त केला जातो.
नॅचुरल डियोड्रेंट
उन्हाळ्यामध्ये किंवा घामाच्या वासामुळे आपण त्रस्त असाल तर आपण दुर्गंधीनाशक तुरटी आपण वापरू शकता. आपण ते थेट आपल्या अंडरआर्म्सना देखील लावू शकता आणि त्याची पावडर बनवून ते आंघोळीच्या पाण्यात घालू शकता. तथापि, दररोज याचा वापर करणं हानिकारक ठरतं, म्हणून आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा.
रक्तप्रवाह थांबवता येतो
दुखापतीनंतर रक्तस्त्राव थांबविण्यास तुरटी फायदेशीर ठरते. जखमी झालेल्या भागावर चोळण्यामुळे रक्ताचा प्रवाह थांबू शकतो. तथापि, ही कृती केवळ किरकोळ जखमांवरच कार्य करते. परंतु जास्त वापर टाळा आणि लहान मुलांपासून दूर ठेवा.
माऊथ अल्सर
जर आपल्याला तोंडाच्या अल्सरमुळे त्रास होत असेल तर, तुरटीच्या पाण्याने गुळण्या करा. गरम पाण्यात तुरटी घाला आणि थोडावेळ तोंडात गुंडाळा. दिवसातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्यास परिणाम दिसून येईल.
युरिन इन्फेक्शन
आपण युरिन इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी आणि ते उद्भवल्यानंतर त्यातून मुक्त होण्यासाठी तुरटीचा वापर करू शकता. कोमट पाण्यात तुरटी फिरवा आणि त्यासह आपला खाजगी भाग स्वच्छ करा. त्याचे बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आपल्याला संसर्गाच्या समस्येपासून मुक्त करण्यास मदत करतात. जर आपल्याला वारंवार लघवीचे संक्रमण होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
फंगल इन्फेक्शन कमी होते
जर आपल्या पायांना दुर्गंधी येत असेल किंवा एखाद्या प्रकारचे बुरशीजन्य संसर्ग वाढत असेल तर तुरटीचा वापर करा. गरम पाण्यात तुरटी घाला आणि दररोज आपले पाय धुवा. नारळाच्या तेलात ही पावडर मिसळा आणि लावा. विश्रांती मिळेल.
केसांसाठी फायदेशीर
महिलांनांच नाही तर मोठ्या प्रमाणावर पुरूषांना सुद्धा या समस्येचा सामना करावा लागतो. दैनंदिन जीवनात आपण करत असलेल्या चुकांमुळे या केस पांढरे होण्याचा सामना करावा लागतो. तुरटीचा केसांवर वापर करण्यासाठी तुरटीचा एक लहानसा तुकडा फोडून बारिक करून घ्या. आणि त्यात १ चमचा गुलाबपाणी घाला. त्यानंतर ५ मिनिटांपर्यंत केसांवर मसाज करा. मग १ तासानी केसांना शॅम्पूने धुवून टाका. आठवड्यातून दोन ते तीन दिवस हा प्रयोग केल्यास पांढरे केस असण्याची समस्या कमी होत जाईल.
केस धुताना कोमट पाण्यात दळलेली तुरटी आणि कंडीशनर घाला. त्यासोबत मिक्स करा. हे मिश्रण केसांना खालपर्यंत लावा. त्यानंतर १० ते १५ मिनिटांनी थंड पाण्याने केस धुवून टाका. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल.
जर तुमच्या त्वचेवर डाग असतील तर त्यांना दूर करण्यासाठी तुरटी हा बेस्ट ऑप्शन आहे. त्यासाठी तुरटी बारिक करून पाण्यात मिसळून पेस्ट तयार करून घ्या. नंतर वीस मिनिटांनी चेहरा धूवुन टाका. जर तुमच्या चेहरा आणि मानेवर सुरकुत्या आल्या असतील तर त्वचा टाईट करण्यासाठी तुरटीचा वापर हा बेस्ट पर्याय आहे. त्यासाठी गुलाब पाण्याचा वापर तुरटीसह करावा.
(टिप- वरील माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारिरीक क्षमता वेगळी असते. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यायला हवा.)