केस गळण्याची समस्या घरोघरच्या बायका आणि पुरूषांमध्ये दिसून येतं. शॅम्पू, कंडिशनर, स्पा सगळं काही ट्राय करून झालेलं असतं पण तरिही परिणाम दिसत नाही. जावेद हबीब अनेकदा आपले चाहते आणि ग्राहकांसाठी केसांची निगा राखण्यासाठी टिप्स देतात. आज आम्ही तुमच्यासाठी जावेदची हेअर ग्रोथ ट्रीटमेंट घेऊन आलो आहोत, जर आठवड्यातून एकदा हा उपाय केला तर तुमचे केस लवकर वाढण्यास नक्कीच मदत होईल. हे उपचार करणे खूप सोपे आहे कारण त्यासाठी केवळ 15 मिनिटे लागतात. अशा वेळी, आपण हा उपाय केल्यानंतर काही वेळानं तुम्ही केस धुवून स्वच्छ करू शकता.
हबीबनं सांगितलं सिक्रेट
जावेद हबीब म्हणाले की, ''घरी कोणत्याही केमिकल्सशिवाय केसांच्या वाढीस वेग देता शकतो. यासाठी आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या दोन कच्च्या भाज्यांची आवश्यकता असेल आणि या दोघांचे अर्क मिश्रणात मिसळून केसांवर लावावे लागतात.''
कांदा आणि आलं
हबीबने आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितले की कांदा आणि आले किसून त्यांचा रस बनवा. मग या दोघांना एकत्र मिसळा. या मिश्रणामध्ये 50 टक्के कांद्याचा रस आणि 50 टक्के आल्याचा रस असावा. हे लक्षात ठेवा की हा कांदा आणि आल्याचा रस पूर्णपणे ताजा असावा. कारण हे पूर्णपणे हर्बल आणि ताजे केस ग्रोथ लिक्विड असेल, त्याचा परिणाम त्वरीत केसांवर दिसून येईल.
असा करावा लागेल उपयोग
कांदा आणि आले यांचे पातळ मिश्रण केसांच्या मुळांवर लावा. कारण केसांच्या वाढीसाठी, मुळांना योग्य पोषण मिळणं आणि टाळूवरचा संसर्ग बरा करणं आवश्यक आहे. तरच केस लांब वाढतात. आपल्याला हे मिश्रण फक्त 10 मिनिटांसाठी आपल्या केसांमध्ये ठेवावे लागेल. यानंतर आपल्याला केस स्वच्छ धुवून टाका.
आठड्यातून फक्त एकदा करावा लागणार हा उपाय
जावेद मोठ्या विश्वासानं लोकांना सांगतात की, ''केवळ १० मिनिटांच्या या उपायानं तुम्हाला फरक दिसून येईल. काही आठवड्यातच केसांची चांगली वाढ होईल. त्यासाठी आठवड्यातून एकदा तुम्हाला हा उपाय करायला हवा.''
अशी घ्या काळजी
केस धुतल्यानंतर जर ते नीट सुकले नाही. तर केसांमध्ये आणि स्काल्पवर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. जर ते इन्फेक्शन पसरले तर केस मोठ्या प्रमाणात गळू शकतात आणि त्यामुळे डोक्यात खाज येणे कोंडा होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. धुतलेले केस जास्त वेळ ओले राहीले तर सर्दी , ताप यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. अॅलर्जीही निर्माण होऊ शकते.
तसंच शांपू, कंडिशनर, यांच्या जास्त वापराने केस कोरडे होतात. डोक्यावरील त्वचासुद्धा आजारी पडते. केसांची मुळे नष्ट होतात. केस पातळ होऊन टक्कल लवकर पडू शकते. केस लवकर पिकतात. त्यामुळे केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी रात्री केसांना आवळ्याचा रस लावावा. तसेच कच्चा कोबी, कांदा व कच्चा पालक,अंडी यांचे सेवन केल्याने केस चांगले राहतात.
सकाळी केस धुतल्यानंतर अनेक महिला आणि पुरूष ड्रायरचा वापर करतात. त्यामुळे केस जास्त कोरडे होतात. केस गळण्याची समस्याही ड्रायरचा रोज वापर केल्यामुळे उद्भवू शकते. कधीतरी ड्रायरचा वापर करणं ठीक आहे. पण नेहमी केस धुतल्यानंतर आपोआप सुकेपर्यंत वाट पाहा सतत ड्रायर फिरवू नका.
अनेक महिला या सकाळी केस धुतात. तर काहीजणी या सकाळी उठल्यानंतर घाई होऊ नये. म्हणून रात्रीच केस धुतात. पण रात्री केस धुतल्याने काही समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांमुळे त्वचेचं तसंच केसांचं नुकसान होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया रात्री केस धुतल्यास केसांवर काय परिणाम होतो जाणून घेऊया.
रात्री केस धुतल्याने केसांची मुळं ही कमजोर होतात. त्यामुळे केस गळायला लागतात. रात्री केस धुवून झोपल्यानंतर केसात गुंता होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे केस कंगव्याने विंचरताना मोठ्या प्रमाणात तुटतात. केसांचे होणारे नुकसान टाळण्यसाठी केस रात्री धुणे टाळा. रात्री केस धुतल्यानंतर ते ओले असतात. त्यामुळे केस रुक्ष पडून कोरडे पडण्याची शक्यता असते.