केस गळणे (Hair Fall) ही तरुणींमध्ये एक कॉमन समस्या बनली आहे. वेळेअभावी तुम्ही अनेकदा केसांची काळजी घेणं शक्य होत नाही. केस एकदा गळायला लागले आणि त्याकडे आपण लक्ष दिलं नाही तर खूप पातळ होऊ लागतात. म्हणूनच आज तुम्हाला केसांची काळजी घेण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही तुमचे केस दाट, लांबसडक बनवू शकता. (How To Stop Hair fall)
पातळ केसांना दाट बनवण्याचा उपाय (Remedies for stop Hair loss)
पातळ केस झटपट जाड आणि झुपकेदार दिसण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे रिव्हर्स कॉम्बिंग. तुम्ही नेहमी तुमच्या केसांना समोरून मागच्या बाजूला विंचरत असाल पण जेव्हा तुम्हाला केस दाट आणि भरलेले दिसावेत असं वाटत असेल, तेव्हा तुम्ही केसांना मागून पुढे विंचरू शकता आणि नंतर केसांना स्टाइल करू शकता. फरक स्पष्टपणे दिसून येईल.
केस दाट दिसण्यासाठी हेअर स्प्रे चा वापर कसा केला जातो पाहा.
एमाने दिलेली केस दाट करण्याची ट्रिक फॉलो करण्यासाठी, सर्वप्रथम, तुमच्या केसांमध्ये भांग पाडा. मग चिमूटभर केस हातात धरून केस फवारणी करा. तुम्ही हे तुमच्या केसांमध्ये केवळ पुढच्या बाजूलाच नाही तर मागच्या बाजूनेही करू शकता. यामुळे तुमचे केस जाडही दिसतील आणि हेअरस्टाईलही एकदम नवीन दिसेल. नेहमीच्या हेअरस्टाईलमध्ये छोटे बदल करून तुम्ही तुमचे केस दाट मिळवू शकता. म्हणजेच, जर तुम्ही दररोज डाव्या बाजूने भांग पाडतअसाल तर कधी उजव्या बाजूनं पाडा.
शिळी चपाती खाता की टाकून देता? शिळ्या चपातीचे 5 फायदे, फेकून द्यायचा विचारच सोडा
हेअर एक्सपर्ट्स जावेद हबीबनं सांगितलेल्या युक्तीनुसार जर तुम्हाला रोज केस धुवायला आवडत असेल तर दररोज केस धुण्यापूर्वी डोक्याला मोहरीच्या तेलाने मसाज करा आणि 5 मिनिटे सोडल्यानंतर पुन्हा शॅम्पू करा. फक्त एका आठवड्याच्या आत, तुम्हाला दिसेल की तुमचे केस अधिक चमकदार आणि दाट दिसत आहेत. केसांना नियमितपणे मोहरीचे तेल लावल्याने तुमचे केस नैसर्गिकरित्या दाट होतील.