Lokmat Sakhi >Beauty > How Grow Hair Very Fast : केस खूपच पातळ झालेत, टक्कल पडण्याची भिती वाटतेय? दाट, लांब केसांसाठी करा ४ उपाय

How Grow Hair Very Fast : केस खूपच पातळ झालेत, टक्कल पडण्याची भिती वाटतेय? दाट, लांब केसांसाठी करा ४ उपाय

How Grow Hair Very Fast : शरीरात पोषक तत्वांची कमतरता आणि खराब आहार यांचाही केसांवर परिणाम होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 01:56 PM2022-04-27T13:56:10+5:302022-04-27T14:11:08+5:30

How Grow Hair Very Fast : शरीरात पोषक तत्वांची कमतरता आणि खराब आहार यांचाही केसांवर परिणाम होतो.

How Grow Hair Very Fast : Hair fall baldness remedies treatment cure fenugreek onion juice amla aloevera gooseberry | How Grow Hair Very Fast : केस खूपच पातळ झालेत, टक्कल पडण्याची भिती वाटतेय? दाट, लांब केसांसाठी करा ४ उपाय

How Grow Hair Very Fast : केस खूपच पातळ झालेत, टक्कल पडण्याची भिती वाटतेय? दाट, लांब केसांसाठी करा ४ उपाय

आजकाल केस गळण्याच्या समस्येचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो. महागडे प्रोडक्ट्स वापरूनही केस चांगले राहत नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की केस गळण्याची अनेक कारणे आहेत, परंतु सर्वात मोठे कारण म्हणजे बिघडलेली जीवनशैली आणि तणाव हे मानले जाते. (Hair Care Tips)  

शरीरात पोषक तत्वांची कमतरता आणि खराब आहार यांचाही केसांवर परिणाम होतो. (How Grow Hair Very Fast )  हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की जर त्याच वेळी या केसांच्या समस्यांकडे लक्ष दिले गेले नाही तो समस्या  वाढतात. म्हणूनच या लेखात केसांचं गळणं कमी करण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत. (How to stop Hair fall)

केस गळण्याची कारणं (Causes of hair fall) 

तणाव

 शरीरातील पोषक तत्वांची कमतरता

एनीमिया

 मेनोपॉज

प्रेग्नेंसी आणि बर्थ कंट्रोल औषधांचे सेवन

 थायरॉयडची समस्या

केसांचं गळणं थांबवण्यासाठी घरगुती उपाय

१) मेथी 

मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी मेथी दाणे बारीक करा नंतर त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि खोबरेल तेल घाला. ही पेस्ट केसांच्या मुळांवर लावा. ते कोरडे होईपर्यंत केसांवर ठेवा. त्यानंतर पाण्याने धुवा. काही दिवसात तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल.

पांढरे केस जास्तच वाढत चाललेत? ३ प्रकारच्या तेलांनी मसाज करा, काळ्याभोर केसांसाठी सोपा उपाय

२) आवळा

आवळा पावडरमध्ये शिककाई आणि रेठा घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावा आणि कोरडे होईपर्यंत राहू द्या. त्यानंतर केस पाण्याने धुवा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसेल.

३) एलोवेरा

कोरफडीची पाने मधोमध कापून त्याचा लगदा काढा. आता लगदा केसांच्या मुळांना लावून मसाज करा. साधारण अर्ध्या तासानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. केस गळतीपासून काही दिवसांत आराम मिळेल.

उन्हामुळे चेहरा निस्तेज, काळपट झालाय? फक्त शिळा भात या पद्धतीनं वापरून मिळवा ग्लोईंग त्वचा

४) कांदा

कांदा बारीक करून त्याचा रस काढा. ते केसांच्या मुळांवर लावून मसाज करा. साधारण अर्ध्या तासानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. असे केल्याने तुम्हाला आराम मिळेल.
 

Web Title: How Grow Hair Very Fast : Hair fall baldness remedies treatment cure fenugreek onion juice amla aloevera gooseberry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.