लांब, काळेभोस केस असावेत ही प्रत्येक मुलीची इच्छा असते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी बहुतेक मुली विविध प्रकारचे शॅम्पू, केसांचे तेल आणि हेअर केअर उत्पादने वापरतात. (Hair Care Tips) मात्र, त्यांना विशेष फायदा होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी असा आयुर्वेदिक हेअर मास्क बनवण्याची आणि लावण्याची पद्धत सांगणार आहोत. ज्याचा वापर स्वत: आयुर्वेद तज्ञ डॉ. रेखा करतात. (How to stop hair fall)
हा आयुर्वेदिक हेअर मास्क बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे सांगताना डॉ. रेखा लिहितात की हे केसांची काळजी घेण्याचे त्यांचे स्वतःचे एक सिक्रेट आहे. खरंच, डॉक्टर रेखाचे केस खूप सुंदर आणि दाट आहेत. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून तुम्ही हा हेअर मास्क तयार करू शकता. (how to grow long hair)
केस गळणे, केस पातळ होणे, केसांची लांबी कमी किंवा न वाढणे आणि केस अकाली पांढरे होणे. या आजच्या काळातील सामान्य समस्या आहेत, ज्यामुळे बहुतेक लोक त्रस्त आहेत. अशा स्थितीत केसांचे सौंदर्य वाढवणारा हा हेअर मास्क तुम्ही नक्की ट्राय करून पाहायला हवा.
साहित्य
3 टीस्पून मेथी दाणे
एक अंडं
1 टीस्पून दही
अर्धा टीस्पून तेल
10 ग्रॅम ज्येष्ठमध पावडर
कृती
हा आयुर्वेदिक हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम 3 चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी बारीक करून पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये एक अंडे फेटून मिक्स करा. जर तुम्हाला अंडी वापरायची नसतील तर तुम्ही फ्लेक्ससीड्स वापरू शकता. हे अंड्यांसाठी चांगले पर्याय आहेत पण या केसांच्या मास्कमध्ये अंडी अधिक प्रभावी आहेत. आता त्यात एक चमचा दही घालून अर्धा चमचा तेल मिसळा. हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही तेल वापरू शकता. (तुमचे केस कोरडे असतील तर तेल मिसळा. नाहीतर सोडून द्या.)
हा हेअर मास्क तुमच्या केसांवर लावण्यासाठी, सर्वप्रथम, तुमचे केस लहान भागात विभागून घ्या. यानंतर, प्रथम ब्रशच्या मदतीने हा मास्क केसांच्या मुळांवर आणि टाळूवर लावा. त्यानंतर केसांच्या लांबीवर लावा. चांगल्या प्रभावासाठी, केसांवर मास्क कमीतकमी 30 मिनिटांसाठी लावावा. आठवड्यातून एकदा हेअर मास्क वापरणे आवश्यक आहे. तुमचे केस अकाली पांढरे होऊ नयेत म्हणून हेअर मास्क फायदेशीर ठरू शकतो.