केस लहान असो किंवा मोठे केसांचा छान गोलाकार, गच्च अंबाडा घालणे हीच अनेकींची आवडती हेअर स्टाईल असते. बऱ्याचजणींना केसांचा अंबाडा घालण्याची सवय असते. काम करताना केस मध्ये मध्ये येऊ नयेत, तसेच केस मोकळे ठेवून मानेवर घाम येऊ नये यांसारख्या अनेक कारणांसाठी आपण केसांचा अंबाडा बांधणे पसंत करतो. आजकाल घर असो किंवा ऑफिस तसेच कुठे बाहेर जायचे असले तरीही अनेकजणी केसांचा बन घालणेच पसंत करतात, कारण ही हेअर स्टाईल झटपट तर होतेच तसेच यात कम्फर्टेबल वाटण्यासोबतच चेहऱ्याचे सौंदर्य देखील खुलून येते. शक्यतो घरी असताना अनेकजणी केसांचा अंबाडा घालूंनचं ठेवतात(Bun Hairstyles Are Secretly Harming Your Hair).
सकाळी एकदा केस विंचरले की, सरळ एका हाताने केसांना पीळ द्यायचा आणि गोल गोल करत वर अंबाडा बांधून टाकायचा. केस एकत्रित करुन केसांचा अंबाडा बांधून काम करणं कितीही सोयीचं असलं तरी केसांसाठी ते मुळीच योग्य नसते. सतत केसांचा अंबाडा बांधून ठेवणं अतिशय सोपं असल्यामुळे यासाठी जास्त वेळ द्यावा लागत नाही. मात्र या हेअर स्टाईलने केसांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. केसांचा सतत असा घट्ट आणि उंच अंबाडा बांधून ठेवण्याने केसांच्या आरोग्यावर नेमके कोणत्या प्रकारचे दुष्परिणाम होतात ते पाहूयात(Bun hairstyle side effects to hair).
सतत केसांचा अंबाडा बांधण्याचे दुष्परिणाम कोणते ?
१. केसांच्या आरोग्याचे नुकसान :- केस बराच वेळ असे वर गच्च बांधून ठेवल्याने केसांचा गुंता होतो. यामुळे केसांची मूळ कमकुवत होतात. फार मोठ्या प्रमाणावर केस तुटू लागतात. सतत केसांचा असा घट्ट अंबाडा बांधून ठेवल्यास केसांवर ताण येतो आणि केस गळतात. तसेच कपाळावरच्या केसांची हेअर लाईन विरळ होत जाते. केस बराच वेळ बांधून ठेवल्याने केसांचा गुंता होण्याची शक्यता असते. त्यामुळे केस सोडल्य़ानंतर कितीतरी वेळ केस विंचरले तरी हा गुंता निघत नाही. अशावेळी केसात जाळ्य़ा होणे. केसांचा गुंता काढताना केस तुटणे असे समस्या होऊ शकतात. त्यामुळे जास्त वेळ केसांचा अंबाडा बांधून न ठेवता ते काही वेळासाठी थोडे मोकळे सोडणे देखील गरजेचे आहे.
२. डोकेदुखी :- केसांचा सतत असा उंच अंबाडा बांधून ठेवल्यास आपल्याला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. अनेकदा घट्ट धरून बांधलेल्या केसांच्या या अंबाड्यामुळे आपल्याला डोकेदुखी होत आहे, हे देखील आपल्या लक्षात येत नाही. जर आपण अंबाडा किंवा बन जास्त वेळ घट्ट बांधून ठेवला तर त्यामुळे केसांमध्ये तणाव निर्माण होतो ज्यामुळे डोकेदुखी होते. त्यामुळे सतत एकदम उंचावर अंबाडा बांधण्यापेक्षा कधी कधी थोडा खाली म्हणजेच मानेवर किंवा डोक्याच्या मागच्या भागावर बांधवा.
१ चमचा अळशी - १ चमचा तांदुळाचे पीठ, उपाय साधा- चेहऱ्यावरून तुमचं वय ओळखता येणार नाही...
३. रक्ताभिसरण कमी होते :- केसांच्या अंबाड्याच्या घट्टपणामुळे डोक्याच्या स्कॅल्पमध्ये रक्तप्रवाह मर्यादित प्रमाणात होऊ शकतो. जेव्हा रक्ताभिसरणात कमतरता येते तेव्हा केसांची मूळ कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे केस पातळ होतात आणि केस गळणे अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
४. शिरा सुजू शकतात :- जर तुम्ही तुमच्या केसांचा सतत अंबाडा बांधून ठेवत असाल तर त्यामुळे तुमच्या नसांमध्ये वेदना होऊन सूज येऊ शकते. यामुळे तुमच्या डोळ्यांवर ताणही येऊ शकतो. तसेच, तुम्हाला सतत त्रासदायक वेदना जाणवू शकतात.
५. इनफेक्शनचा धोका :- इतर हेअर स्टाईलपेक्षा केसांचा सतत अंबाडा घातल्याने तुम्हाला इनफेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. कारण या हेअर स्टालमध्ये स्कॅल्पला हवा लागत नाही. केसांमध्ये घाम साचल्यामुळे तुमच्या केसांमध्ये वास आणि चिकटपणा निर्माण होतो. ज्याचा परिणाम केसांमध्ये इनफेक्शन होण्याची शक्यता वाढते. यासाठी नेहमी केस वर घट्ट बांधून ठेवणे योग्य नाही.
६. केस पातळ होतात :- सतत हाय बन किंवा घट्ट अंबाडा घातल्यामुळे तुमचे केस पातळ होतात. हेअर लाईन पातळ झाल्यामुळे कालांतराने तुमचे पुढच्या दिशेने टक्कल दिसू लागते. याचं कारण केस घट्ट बांधल्यामुळे ताणले जातात आणि कमजोर होत तुटतात. यासाठी सतत केस वर बांधून ठेवू नयेत.
जान्हवी कपूर सांगते, आईने तिला शिकवलेला खास उपाय! चेहऱ्यावर श्रीदेवीसारखा ग्लो हवा तर..