Lokmat Sakhi >Beauty > तेलकट त्वचेच्या समस्याच फार.. करा मधाच्या 3  फेसपॅकचा सोपा उपाय 

तेलकट त्वचेच्या समस्याच फार.. करा मधाच्या 3  फेसपॅकचा सोपा उपाय 

त्वचा तेलकट असल्यास (oily skin problem) अनेक सौंदर्य समस्या निर्माण होतात. त्वचेचा तेलकटपणा आटोक्यात आणून सौंदर्य समस्या सोडवण्यासाठी मधाच्या सहाय्यानं प्रभावी(honey for oily skin) उपाय करता येतात. तेलकट त्वचेला फायदेशीर असे मधाचे 3 लेप ( honey face pack for oily skin) तयार करुन लावल्यानं त्वचा स्वच्छ आणि सुंदर होते. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2022 01:59 PM2022-08-24T13:59:28+5:302022-08-24T14:09:18+5:30

त्वचा तेलकट असल्यास (oily skin problem) अनेक सौंदर्य समस्या निर्माण होतात. त्वचेचा तेलकटपणा आटोक्यात आणून सौंदर्य समस्या सोडवण्यासाठी मधाच्या सहाय्यानं प्रभावी(honey for oily skin) उपाय करता येतात. तेलकट त्वचेला फायदेशीर असे मधाचे 3 लेप ( honey face pack for oily skin) तयार करुन लावल्यानं त्वचा स्वच्छ आणि सुंदर होते. 

How honey face pack helps oily skin to look clean-clear and beautiful | तेलकट त्वचेच्या समस्याच फार.. करा मधाच्या 3  फेसपॅकचा सोपा उपाय 

तेलकट त्वचेच्या समस्याच फार.. करा मधाच्या 3  फेसपॅकचा सोपा उपाय 

Highlightsत्वचा तेलकट असल्यास चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येणं, व्हाइटहेड्स, ब्लॅकहेड्स या समस्याही निर्माण होतात.तेलकटपणामुळे त्वचेवर निर्माण होणारे घातक जिवाणू मधाच्या सहाय्याने घालवता येतात.नुसतं मध चेहेऱ्याला लावलं तरी चालतं. पण मधाच्या लेपाची गुणवत्ता वाढवण्यासाठी केळे, ओट्स आणि हळद यांचा वापर करावा. 

तेलकट त्वचेच्या समस्येला  (oily skin problem) अनेकांना तोंड द्यावं लागतं. सकाळी उठल्यानंतर चेहेरा धुतलावरही जर त्वचेवर तेल दिसत असेल तर त्वचा तेलकट आहे असं समजावं. या प्रकारच्या त्वचेवर सीबम या तेल ग्रंथीची निर्मिती अधिक होते. त्वचा तेलकट असेल तर चेहेरा तेलकट दिसण्यासोबतच चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येणं, व्हाइटहेड्स, ब्लॅकहेड्स या समस्याही निर्माण होतात. त्वचेवरच्या रंध्रामाध्ये तेलामुळे घाण जमा होवून रंध्र बंद होतात. आहारात तेलकट- तूपकट , मसालेदार पदार्थ जास्त असल्यास त्वचा तेलकट होते तसेच ऋतू बदलल्यानेही त्वचा तेलकट होते. तेलकट त्वचेवर मधाच्या सहाय्यानं (honey for oily skin) प्रभावी उपाय करता येतात. मधामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेलाची समस्या नियंत्रणात येते, त्वचा स्वच्छ आणि सुंदर दिसण्यास मदत होते.

Image: Google

तेलकट त्वचेसाठी मध फायदेशीर ठरतं. मधामध्ये जिवाणुविरोधी गुणधर्म असतात. तेलकटपणामुळे त्वचेवर निर्माण होणारे घातक जिवाणू मधाच्या सहाय्याने घालवता येतात. मधामध्ये अति सूक्ष्म जिवाणुंशी लढण्याची ताकद असते. त्यामुळे त्वचेचं अति सूक्ष्म जिवाणुंपासूनही संरक्षण होतं.  मधामुळे त्वचेवरील हानिकारक जिवाणुंची वाढ रोखली जाते. नुसतं मध चेहेऱ्याला लावलं तरी फायदेशीर ठरतं किंवा ते केळ/ हळद/ ओट्स पावडर यात मिसळून लावलं तरी चालतं. यामुळे मधाच्या लेपाची गुणवत्ता वाढून सौंदर्य समस्या तर दूर होतातच सोबतच त्वचेचं पोषणही होतं. मधाचे लेप तयार करुन चेहेऱ्याला लावणं अतिशय सोपं आणि फायद्याचं काम आहे. 

Image: Google

मध आणि केळे

मध आणि केळाचा लेप तयार करण्यासाठी एका मोठ्या वाटीत दीड चमचा मध घ्यावं. त्यातच अर्धे केळे कुस्करावे. हा लेप लावण्याआधी चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. चेहेरा रुमालानं टिपून घेतल्यानंतर हा लेप चेहेऱ्यास लावून 15-20 मिनिटं ठेवावा. आठवड्यातून दोनवेळा हा लेप चेहेऱ्याला लावल्यास यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेलाची समस्य तर सुटतेच सोबतच चेहरा ओलसर आणि आर्द्र राहातो.

Image: Google

मध आणि ओट्स

मध आणि ओट्सचा लेप तयार करण्यासाठी 2 चमचे ओटमील पावडर किंवा ओटस घ्यावे. नुसते ओट्स घेतल्यास ते मिसरमधून बारीक करुन आधी त्याची पावडर करुन घ्यावी. यात 1 चमचा मध मिसळून ते ओट्स पावडरमध्ये एकजीव करावं.  हे मिश्रण स्क्रबसारखं तयार होतं. ते चेहेऱ्याला हलक्या हातानं मसाज करत लावावं. 10-12 मिनिटं ओट्स आणि मधाच्या मिश्रणानं चेहेऱ्याचा मसाज करावा.  नंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. हा उपाय् आठवड्यातून एक वेळा करावा. 

Image: Google

मध आणि हळद

तेलकट त्वचा उजळ दिसण्यासाठी, त्वचेवर चमक येण्यासाठी मध आणि हळदीचा लेप चेहेऱ्यावर लावावा. हा लेप तयार करण्यासाठी एका वाटीत 1 चमचा मध आणि त्यात अर्धा चमचा हळद घालावी. मधात हळद एकजीव करुन ग घ्यावी. हे मिश्रण चेहेऱ्यास लावून 20 मिनिटं ठेवावं. नंतर चेहेरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा. या उपायामुळे त्वचेला संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. अथवा संसर्ग झाला असल्याससतो दूर होण्यास या लेपानं मदत होते.
 

Web Title: How honey face pack helps oily skin to look clean-clear and beautiful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.