Join us  

काजोलचे देखणे रूप वयाच्या 48 व्या वर्षीही मोहक, तिच्या सौंदर्याचं रहस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2022 5:15 PM

How Kajol Manages to Look So Young at her 48 : काय आहेत काजोलच्या सौंदर्यामागच्या खास टिप्स

ठळक मुद्देयोग्य झोप मिळाल्याने शरीराचा आणि मनाचा थकवा दूर होतो आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर तसेच चेहऱ्यावर दिसून येतो.सौंदर्य कायम टिकवायचे असेल तर व्यायामाला पर्याय नाही हेच खरे.

ऐश्वर्या रॉय असो नाहीतर माधुरी दिक्षित या अभिनेत्रींचे सौंदर्य कायमच आपले लक्ष वेधून घेणारे असते. तरुणींमध्ये तर अभिनेत्रींच्या सौंदर्याबाबत कायमच उत्सुकता पाहायला मिळते. मग ती मलायका अरोरा असो किंवा काजोल, वयाच्या ४५ वर्षानंतरही या अभिनेत्री इतक्या सुंदर कशा दिसतात याचे कोडे काही केल्या आपल्याला उलगडत नाही. प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिचा ५ ऑगस्ट रोजी वाढदिवस झाला आणि तिने वयाची ४८ वर्षे पूर्ण केली. मात्र या वयातही काजोलचे सौंदर्य तसूभरही कमी झालेले नाही. वय झाले की आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, केस पांढरे होतात किंवा आणखी काही. असे व्हायला लागले की आपण काहीसे अस्थिर होतो आणि वाढलेले वय लपवण्यासाठी काय करायल हवे यावर उपाय शोधतो. पण काजोलच्या सौंदर्यात तिच्या वाढत्या वयाचा विशेष परिणाम झाला नसल्याचे दिसते. आता यामागे नेमकी कोणती कारणे आहेत आणि काजोल असे कोणते रुटीन फॉलो करते ज्यामुळे तिचे सौंदर्य आहे तसेच टिकून आहे ते पाहूया (How Kajol Manages to Look So Young at her 48)...

(Image : Google)

१. झोपताना मेकअप काढणे (Remove Makeup while sleeping)

मेकअप हा अभिनेत्रींच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. मेकअप शिवाय त्या बहुतांश वेळा बाहेर पडत नाहीत. त्यामुळे आपला लूक कायम राहावा यासाठी त्या अनेक सौंदर्य उत्पादने नियमितपणे वापरत असतात. मेकअप करणे ठिक आङे पण घरी आल्यावर कितीही थकलेले असलो तरी मेकअप आठवणीने चेहऱ्यावरुन काढणे हे एक अतिशय महत्त्वाचे काम असते. काजोल मेकअप काढल्याशिवाय कधीच झोपत नाही. कितीही दमून आलेली असली तरी ती आधी चेहऱ्यावरचा मेकअप साफ करते आणि मगच झोपते. यामुळे चेहऱ्याची रंध्रे ओपन होतात आणि त्वचेला फ्रेश हवा मिळण्यास मदत होते. चेहरा फ्रेश राहण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण असू शकते. 

२. CTM (क्लिंजिंग, टोनिंग, मॉइश्चरायजिंग) रुटीन (Cleansing, Toning, Moisurising)

चेहरा नियमितपणे क्लिंजिंगने साफ करणे त्यानंतर त्याला टोनर लावणे आणि मॉइश्चरायजर लावणे हे स्कीन रुटीन काजोल सहसा चुकवत नाही. त्यामुळे तिच्या चेहऱ्याचा ग्लो कायम राहण्यास मदत होते. या तिन्ही गोष्टी स्कीन रुटीनमधील अतिशय महत्त्वाच्या असून त्या योग्य पद्धतीने केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. 

३. भरपूर पाणी पिणे (Keep Body Hydrated)

सततचे शूटींग, कामाचा ताण, घरातील जबाबदाऱ्या या सगळ्या व्यस्त दिनक्रमातही काजोल भरपूर प्रमाणात पाणी पिते. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि त्वचा नितळ व्हायला त्याची अतिशय चांगली मदत होते. भरपूर पाणी प्यायल्याने तुमचा चेहरा नकळत फ्रेश आणि ग्लोइंग राहतो. यामुळे नकळतच तुम्ही सतेज आणि ताजेतवाने दिसण्यास मदत होते. 

४. नियमित व्यायाम (Regular Exercise)

व्यायाम हा आपल्या आरोग्यासाठी ज्याप्रमाणे चांगला असतो त्याचप्रमाणे त्वचेसाठी किंवा सौंदर्यासाठीही व्यायाम अतिशय गरजेचा असतो. त्यामुळे काजोल नियमितपणे १ ते १.५ तास व्यायाम करतेच करते. व्यायामामुळे आपल्याला भरपूर घाम येतो आणि शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडण्यास मदत होते. बॉडी डीटॉक्स होण्यासाठी व्यायामासारखा दुसरा चांगला मार्ग नसल्याचे काजोलचे म्हणणे आहे. त्यामुळे सौंदर्य कायम टिकवायचे असेल तर व्यायामाला पर्याय नाही हेच खरे.

५. रोज ८ तासांची झोप (Regular 8 Hrs Sleep)

आजकाल अनेक जणांचं नाईट लाईफ खूप वाढलं आहे. यात सगळ्यात जास्त संख्येने पंचविशीतल्या आत- बाहेरची तरूणाई दिसून येते. पण आरोग्यासोबतच त्वचा चांगली ठेवायची असेल तर ८ ते १० तासांची रात्रीची झोप दररोज घ्यायलाच हवी. योग्य झोप मिळाल्याने शरीराचा आणि मनाचा थकवा दूर होतो आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर तसेच चेहऱ्यावर दिसून येतो. त्यामुळे आपल्या झोपेला कायम प्राधान्य देणे आवश्यक आहे.     

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकाजोल