Lokmat Sakhi >Beauty > गुडघे फार काळेकुट्ट झाले? किचनमधल्या 'या' वस्तू पायांवर वापरा; काळेपणा गायब-चमकतील गुडघे

गुडघे फार काळेकुट्ट झाले? किचनमधल्या 'या' वस्तू पायांवर वापरा; काळेपणा गायब-चमकतील गुडघे

How Lighten Dark Dark Knees With These 5 Kitchen Ingredients : गुडघे काळे होण्यामागे अनेक कारणं असू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 05:31 PM2024-03-20T17:31:20+5:302024-03-20T20:20:13+5:30

How Lighten Dark Dark Knees With These 5 Kitchen Ingredients : गुडघे काळे होण्यामागे अनेक कारणं असू शकतात.

How Lighten Dark Dark Knees With These 5 Kitchen Ingredients | गुडघे फार काळेकुट्ट झाले? किचनमधल्या 'या' वस्तू पायांवर वापरा; काळेपणा गायब-चमकतील गुडघे

गुडघे फार काळेकुट्ट झाले? किचनमधल्या 'या' वस्तू पायांवर वापरा; काळेपणा गायब-चमकतील गुडघे

टॅनिंग (Tanning) ही  त्वचेसंबंधित एक समस्या आहे. जी चेहऱ्यापासून पायांपर्यंत कुठेही दिसते. आपण शरीराचे जे भाग नेहमीच कपड्यांनी कव्हर केलेले ठेवतो त्या ठिकाणीही त्वचेवर काळेपणा योतो. (How To Remove Tanning From Knees) गुडघे, कोपर, घोटे या  भागांची त्वचा शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत काळवंडलेली असते. ज्यामुळे गुडघे खूपच लवकर काळे होतात. गुडघे काळे होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. (Tanning Removal Tips)

शरीरात पाणी कमी असल्यामुळे हे उद्भवते, दिवसभरात कमीत १० ग्लास पाणी प्यायला हवं.  (How To Remove Tanning From knee) गुडघ्यांवर काळेपणा आला असेल तर तुम्ही शॉर्ट ड्रेसही घालू शकत नाही कारण ते दिसायला खूपच खराब दिसते. काही सोपे घरगुती  उपाय करून तुम्ही गुडघ्यांचा काळेपणा सहज काढू शकता. (How To Remove Tan From my Knees)

गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्याासाठी उपाय (Tan Removal Home Remedies)

१) एका वाटीत दूध घ्या त्यात थोडी हळद मिसळा. हे मिश्रण कॉटन बॉल्सच्या मदतीने गुडघ्यांना लावा. कमीत कमी १० मिनिटं असंच ठेवा. त्यानंतर घासून गुडघे स्वच्छ  करा. 

२) संत्रीची सालं गुडघ्यांवर घाला. जर तुम्ही एका संत्र्याचे सालं सुकवून दुध किंवा दह्याबरोबर मिसळून गुडघ्यांवर स्क्रब करा. यामुळे तुम्हाला बरेच फायदे मिळतील.

३) बटाटा सोलून त्यात मीठ मिसळा. २ मिनिटांसाठी रगडून पाण्याने गुडघे स्वच्छ  करा. असं केल्याने गुडघे स्वच्छ होतील. मीठात एक्सफोलिएटींग  पॉवर असते. ज्यामुळे गुडघे चांगले राहण्यास मदत होईल.

४) एलोवेरा जेलमध्ये चुटकीभर हळद मिसळा आणि मिश्रण गुडघ्यांना लावा. ज्यामुळे त्वचेवरील डेड स्किन सेल्स निघण्यास मदत होते. कोरडेपणा आल्यास काही घरगुती उपाय करून तुम्ही डेड स्किन रिमुव्ह करू शकता.

५) दह्यात ओट्स घालून स्क्रब  तयार करा. हे स्क्रब लावून गुडघे स्वच्छ करा. नियमित हा उपाय केल्यास टॅनिंग दूर होण्यास मदत होईल.

६) गुलाब पाण्यात व्हिटामीन ई कॅप्सूल घालून हे मिश्रण आपल्या गुडघ्यांना लावा. २ दिवसांत गुडघे स्वच्छ दिसतील आणि टॅनिंग कमी होईल. 

Web Title: How Lighten Dark Dark Knees With These 5 Kitchen Ingredients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.