Lokmat Sakhi >Beauty > आंघोळीनंतर स्किनकेअर रुटिन नेमकं कसं असावं? वेळ चुकली तर त्वचेचे आजार छळतात कारण...

आंघोळीनंतर स्किनकेअर रुटिन नेमकं कसं असावं? वेळ चुकली तर त्वचेचे आजार छळतात कारण...

How long should you wait after each skin care step : This is How Long You Should Wait Between Each Step of Your Skincare Routine : How Long Should You Wait Between Applying Skin-Care Products : स्किनकेअर रुटीन नेमकं कधी करावं? त्वचेवर क्रिम्स,लोशनचा वापर करताना मध्ये किती वेळाच अंतर असावं यासाठी खास टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2024 04:10 PM2024-10-17T16:10:21+5:302024-10-17T16:22:56+5:30

How long should you wait after each skin care step : This is How Long You Should Wait Between Each Step of Your Skincare Routine : How Long Should You Wait Between Applying Skin-Care Products : स्किनकेअर रुटीन नेमकं कधी करावं? त्वचेवर क्रिम्स,लोशनचा वापर करताना मध्ये किती वेळाच अंतर असावं यासाठी खास टिप्स...

How long after a shower should you do skincare This is How Long You Should Wait Between Each Step of Your Skincare Routine | आंघोळीनंतर स्किनकेअर रुटिन नेमकं कसं असावं? वेळ चुकली तर त्वचेचे आजार छळतात कारण...

आंघोळीनंतर स्किनकेअर रुटिन नेमकं कसं असावं? वेळ चुकली तर त्वचेचे आजार छळतात कारण...

सकाळची आंघोळ झाल्यानंतर आपण दिवसाचे स्किनकेअर रुटीन फॉलो करतो. स्किनकेअर रुटीन फॉलो करताना आपण त्वचेला टोनिंग, मॉइश्चरायझिंग करुन अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्वचेची काळजी घेतो. चांगल्या आणि निरोगी त्वचेसाठी काही बेसिक गोष्टींची काळजी घेणं, त्वचेचे पोषण आणि स्वच्छता याकडे विशेष लक्ष देणे खूप महत्त्वाचे असते. शक्यतो आपण सकाळच्या आंघोळीनंतर स्किनकेअर रुटीनला सुरुवात करतो. पण आंघोळीनंतर स्किनकेअर रुटीनला नेमकी कधी सुरुवात करावी याची योग्य वेळ कुणालाच माहित नसते. परिणामी, या  स्किनकेअर रुटीनचा आपल्या त्वचेवर योग्य तो परिणाम दिसून येत नाही(This is How Long You Should Wait Between Each Step of Your Skincare Routine).

स्किनकेअर रुटीन करताना आपण त्वचेला क्लिंझिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग अशा काही बेसिक स्टेप्स फॉलो करतो. त्याचप्रमाणे या स्किनकेअर रुटीनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिम्स, सिरम, लोशन यांसारख्या अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करतो. हे ब्यूटी प्रॉडक्ट्स आपण एका मागून एक असे त्वचेवर लावतो. परंतु स्किनकेअर रुटीनमधील या स्टेप्स फॉलो करताना आपण ज्या क्रिम्स, लोशन वापरतो, त्यांचा वापर नेमका अंघोळीनंतर कसा आणि कितीवेळाने करावा हे माहित नसते. तसेच एखादी क्रिम किंवा लोशन त्वचेला लावल्यानंतर किती वेळ थांबून दुसऱ्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करावा याबद्दलची माहिती नसल्याने कितीही योग्य पद्धतीने स्किनकेअर रुटीन फॉलो केले तरी त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येत नाही. यासाठीच अंघोळीनंतर स्किनकेअर  रुटीन नेमकं कधी करावं आणि त्वचेवर क्रिम्स, लोशनचा वापर करताना मध्ये किती वेळाच अंतर असावं ते पाहूयात(How long after a shower should you do skincare).

१. आंघोळीनंतर स्किन केअर रुटीनला नेमकी कधी सुरुवात करावी ? 

आंघोळीला आपण शक्यतो गरम पाणी वापरतो. या गरम पाण्याने आंघोळ केल्याने आपल्या शरीराचे तापमान वाढून शरीर आणि त्वचा देखील गरम होते. यामुळे आंघोळ करून बाहेर आल्यानंतर आपली त्वचा बाहेरच्या वातावरणाशी आणि तापमानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते. अशावेळी आपल्या त्वचेची छिद्र म्हणजेच पोर्स प्रसरण पावतात आणि त्यामार्गे घाम बाहेर पडू लागतो. अशाप्रकारे आपल्या शरीरातील घाम बाहेर पडताना जर आपण स्किन केअर रुटीनला सुरुवात केली तर या घाम बाहेर टाकण्याच्या प्रोसेसमध्ये अडथळा निर्माण होतो. यामुळे आंघोळीनंतर लगेच स्किनकेअर रुटीनला सुरुवात केल्यास येणाऱ्या घामावाटे स्किनकेअर रुटीन नीट करता येते नाही. तसेच सतत या येणाऱ्या घामामुळे त्वचेवर लावलेल्या क्रिम्स आणि लोशन संपूर्णपणे निघून जातात. त्यामुळे स्किनकेअर रुटीन फॉलो करून देखील त्याचा काहीच उपयोग होत नाही. यासाठीच आंघोळ केल्यानंतर किमान १५ ते २० मिनिटे कोणत्याही प्रकारच्या स्किनकेअर रुटीनला सुरुवात करु नये. आपल्या त्वचेला बाहेरच्या वातावरणाशी मॅच होण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा आणि मगच स्किनकेअर रुटीनला सुरुवात करावी. अशाप्रकारे आंघोळीनंतर १५ ते २० मिनिटांनंतरच स्किन केअर रुटीनला सुरुवात करावी.

केसांना लिंबाचा रस लावावा का? थांबा, स्किन स्पेशालिस्ट काय सांगतात पाहा, डोक्यावरचे केस जाण्यापूर्वी करा...

 २. दोन वेगवेगळ्या प्रकारचे क्रिम्स, लोशन लावताना यामध्ये नेमकं किती वेळाचे अंतर असावे ? 

१. क्लिन्झर :- स्किनकेअर रुटीन फॉलो करताना आपण आधी क्लिन्झर लावून त्वचा स्वच्छ करतो. क्लिन्झर लावल्यानंतर थोडावेळ थांबण्याची गरज नाही. यानंतर आपण लगेच दुसरी स्टेप फॉलो करु शकतो. 

२. सिरम :- त्वचेवर सिरम लावल्यानंतर १० ते १५ सेकंद ते सिरम त्वचेत चांगल्या पद्धतीने शोषून घेण्यासाठी वेळ दिला पाहिजे. 

रात्री झोपताना चेहऱ्यावर ‘हा’ घरगुती स्लिपिंग मास्क लावा, सकाळी चेहरा इतका चमकेल की पाहा तेज!

३. मॉइश्चरायझर :- त्वचेवर मॉइश्चरायझर लावल्यानंतर ३० सेकंद थांबून मगच पुढचे स्किन केअर रुटीन फॉलो केले पाहिजे. मॉइश्चरायझर त्वचेत मुरण्यासाठी ३० सेकंदांचा वेळ पुरेसा असतो. 

४. सनस्क्रीन :- सनस्क्रीन लावल्यानंतर १ मिनिटे थांबून मग पुढचे स्किनकेअर रुटीन किंवा मेकअपला सुरुवात करावी.


Web Title: How long after a shower should you do skincare This is How Long You Should Wait Between Each Step of Your Skincare Routine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.