कधी वाढत्या वयामुळे तर कधी, प्रदूषण, केसांची योग्य निगा न राखणे, किंवा आनुवंशिकतेमुळे केसांचे प्रचंड नुकसान होते (Hair care Tips). आजकाल कमी वयात केस पांढरे होतात. यासह केसात कोंडा, केस निर्जीव दिसणे, यासह इतर समस्या उद्भवतात (Hair fall Problem). केसांची योग्य निगा राखण्यासाठी आपण सरळ ब्यूटी पार्लरमध्ये धाव घेतो (Grey Hairs). पण ब्यूटी पार्लरमध्ये धाव न घेता, आपण घरगुती उपाय करूनही केसांची योग्य काळजी घेऊ शकतो.
आजकाल बऱ्याच कारणांवरून केस पांढरे होतात. केस काळे करण्यासाठी आपण मेहेंदी किंवा डायचा वापर करतो. पण डाय किंवा मेहेंदीचा वापर न करताही आपण केस काळे करू शकता. यासाठी काही घरगुती टिप्स फॉलो करून पाहा. या घरगुती टिप्सचा वापर करून आपण हेअर डाय तयार करू शकता. घरगुती डाय कशा पद्धतीने तयार करायचे? पाहा(How long does henna hair dye last and can you make it last longer?).
घरगुती हेअर करण्यासाठी लागणारं साहित्य
मेहेंदी
इंडिगो पावडर
आवळा पावडर
शाहरुख खान आणि गौरीचा ३३ वर्षांचा संसार, गरिबीतही तिने त्याची साथ सोडली नाही आणि..
पाणी
दही
कॉफी पावडर
अशा पद्धतीने तयार करा हेअर डाय
घरगुती हेअर डाय करण्यासाठी आपण मेहेंदीचा वापर करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये मेहेंदी पावडर घ्या. त्यात इंडिगो पावडर घालून मिक्स करा. नंतर त्यात आवळा पावडर घालून मिक्स करा. आणि पाणी घालून चमच्याने पेस्ट तयार करा. मेहेंदीमध्ये जास्त पाणी घालणं टाळा. अशा प्रकारे घरगुती हेअर डाय तयार. १५ मिनिटांसाठी हेअर डाय तसेच ठेवा.
फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल
१५ मिनिटांनंतर केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत लावा. ४५ - ६० मिनिटे तसेच ठेवा. नंतर हेअर डाय पाण्याने धुवा. शाम्पूचा वापर टाळा. दुसऱ्या दिवशी शाम्पूने केस धुवा. यामुळे केसांवर लाल नसून काळा रंग चढेल. शिवाय केस शाईन करतील. आपण त्यात कॉफी पावडर किंवा दही देखील मिक्स करू शकता. महिन्यातून एकदा आपण या हेअर डायचा वापर करू शकता.