बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे केस लवकर पांढरे होतात. केस निर्जीव, केसात कोंडा, केस गळती, केस पातळ होणे या समस्येमुळे लोकं हैराण आहेत. केसांवर नैसर्गिक रंग यावा, यासह स्काल्पला थंडावा मिळावा यासाठी मेहंदी लावली जाते. मेहंदी लावण्याचे अनेक फायदे आहेत. केमिकल प्रॉडक्ट्स केसांवर लावण्यापेक्षा घरगुती मेहंदी लावणे उत्तम.
पण काही लोकं सतत केसांवर मेहंदी लावतात. जे केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. वारंवार केसांवर मेहंदी लावल्याने आपण आजारी देखील पडू शकता. केसांना मेहंदी कशी लावावी, केसांवर मेहंदी किती वेळ ठेवावी, मेहंदी लावण्याची योग्य पद्धत कोणती? यांसारख्या महत्वाच्या टिप्स जाणून घ्या, व त्याप्रमाणे केसांवर मेहंदीचा वापर करा(How Long To Keep Henna On The Hair & The Right Way To Apply).
किती दिवसांनी केसांवर मेहंदी लावावी
केसांवर मेहंदी तीन ते चार आठवड्यातून एकदाच लावा. किंवा महिन्यातून एकदाच लावा. जर केस पांढरे झाले नसतील तर लवकर मेहंदी लावू नका. केसांसाठी फक्त नैसर्गिक मेहंदी वापरावी, केमिकलयुक्त मेहंदी वापरणे टाळण्याचा प्रयत्न करा.
१ चमचा कॉफी-१ ग्लास पाणी, कॉफीच्या पाण्याने केस धुवून तर पाहा- केस चमकदार-सुंदर
केसांना मेहंदी कधी लावायची
काही लोकं कधीही मेहंदी लावतात. संध्याकाळी किंवा रात्री केसांना मेहंदी लावणे टाळा. मेहंदी थंड असते, ज्यामुळे स्काल्पला थंडावा मिळू शकतो. मेहंदी रात्री लावल्याने आपण आजारी पडू शकता. यामुळे आपल्याला सर्दी आणि फ्लूचा त्रास होऊ शकतो. मेहंदी कधीही दिवसा लावणे उत्तम.
५ मिनिटांत करा ३ हेअर स्टाईल, केस पातळ असतील तरीही दिसाल खूप सुंदर-स्टायलिश
केसांवर मेहंदी किती वेळ लावून ठेवावी
केसांवर मेहंदी लावल्यानंतर २ ते ३ तासांनी केस धुवा. जास्त वेळ केसांवर मेहंदी लावून ठेऊ नका. कारण स्काल्प मेहंदीचे पाणी शोषून घेते, ज्यामुळे आपण आजारी पडू शकता. त्यामुळे मेहंदी लावताना या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन मेहंदी लावा.
फक्त ४ आठवडे आणि २ चमचे चारोळ्या, गळणारे -बेजान केस विसरा! पाहा उपाय
मेहंदी ६ ते ७ तास भिजत ठेवा
काही लोकं मेहंदी भिजवल्यानंतर त्वरित केसांवर लावतात. मेहंदी भिजण्यासाठी किमान ६ ते ७ तासांचा कालावधी द्या. मेहंदी केसांवर लावण्याआधी रात्रभर किंवा दिवसभर मेहंदी भिजत ठेवा. मेहंदी भिजवण्यासाठी लोखंडी भांड्याचा वापर करा. ज्यामुळे केसांना उत्तम रंग चढतो.