Join us  

Nail Polish Making : आता घरच्याघरी तयार करा तुमची आवडती नेलपेंट शेड; 'या' घ्या सोप्या ट्रिक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 1:01 PM

How to make nail polish at home : नेलपॉलिश लावण्याआधी काही तास रूम टेम्परेचरवर ठेवून तुम्ही नखांवर अप्लाय करू शकता. 

नेलपेंट लावण्याची आवड सगळ्याच मुलींना असते. आपल्याला हवा तसा शेड मिळण्यासाठी खूप शोधाशोध करून मुली आवडता शेड निवडतात. पण  एखाद्या ड्रेसवर तुम्हाला अगदी हवी तशी नेलपेंट शेड हवी असेल तर ती तुम्ही घरी देखील तयार करू शकता. बाजारात जाऊन तासनतास वेळ घालवण्याची काहीही गरज लागणार नाही.  दोन ते तीन वस्तू वापरून तुम्ही घरच्याघरी नेलपेंट तयार (how to make nail polish at home) करू शकता. नेलपॉलिश लावण्याआधी काही तास रूम टेम्परेचरवर ठेवून तुम्ही नखांवर अप्लाय करू शकता. 

साहित्य

घरीच नेलपेंट तयार करण्यासाठी तुम्हाला क्लिअर नेलपॉलिश अथवा व्हाईट नेलपेंट, तुम्हाला हवा असलेल्या रंगाची आयशॅडो, कॉटन  इअर बड आणि पेपरची आवश्यकता असेल. 

अशी बनवा नेलपेंट

सगळ्यात आधी नेलपेंटची एखादी ट्रांसपरंट बॉटल पूर्ण रिकामी करून स्वच्छ करून घ्या जेणेकरून तुम्हाला हव्या असलेल्या रंगाची नेलपेंट त्यात बनवता येईल. 

नंतर तुमच्या आवडत्या रंगाचा आयशॅडो पॅलेटमध्ये काही प्रमाणात क्रश करून घ्या. बारीक पावडर तयार करा. इअरबड, पेपरच्या मदतीनं तुम्ही आयशॅडोची पावडर बाहेर काढून घ्या. आयशॅडोचे तुकडे त्यात असू नयेत अन्यथा नेलपेंटचा रंग व्यवस्थित दिसणार नाही. 

पेपर गोल करून किंवा चमच्याच्या मदतीनं आयशॅ़डो पावडर नेलपेंटच्या बॉटलमध्ये भरा. मग नेलपेंटच्या बॉटलचं झाकण बंद करा आणि बॉटल व्यवस्थित हलवून घ्या. तुम्ही जेवढ्या ताकदीने बॉटल हलवाल तेवढाच व्यवस्थित शेड तयार होईल. तुम्हाला डार्क शेड हवी असल्यास जास्त प्रमाणात आयशॅडो वापरा.  जुना आयशॅडो पॅलेट आणि व्हाईट आणि क्लिअर नेलपॉलिश तुमच्याजवळ असायला हव्या. 

ग्लिटर नेलपेंट बनवण्यासाठी तुमच्या आवडीचे ग्लिटर, आयशॅडो आणि क्लिअर नेलपेंट समप्रमाणात घ्या.ग्लिटर नेलपॉलिश तयार करण्यासाठी देखील समान पद्धत वापरा. ग्लिटर नेहमी बॉटलच्या खाली जमा होते यासाठी वापरण्यापूर्वी बॉटल व्यवस्थित हलवून घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने  तयार केलेलं नेलपेंट बोटांवर लगेच सुकतं आणि बाजारात मिळणाऱ्या इतर नेलपॉलिशप्रमाणेच दिसतं. नेलपेंट चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका. यामुळे खराब होण्याची शक्यता असते. 

१)

२) 

३) 

टॅग्स :ब्यूटी टिप्स