Join us  

चेहऱ्याला लावा माती! मातीचे २ लेप , फायदे ५- चेहरा होईल सुंदर-नितळ-तेजस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2022 6:39 PM

त्वचा नैसर्गिकरित्या शुध्द (detoxify skin) करण्यासाठी, खोलवर जावून त्वचा जपण्यासाठी , त्वचा जपता जपता त्वचेचे लाड पुरवण्यासाठी ' मड मास्क' म्हणजे मातीचे लेप (mud mask) फायदेशीर असतात. मड मास्क लावल्याने (benefits of mud mask) त्वचेस अनेक फायदे मिळतात.

ठळक मुद्देमड मास्कमुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते.त्वचेचा पोत समान आणि चांगला करण्यासाठी मड मास्कचा उपयोग होतो.त्वचा शुध्द होण्यासाठी आणि त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यासाठी चेहेऱ्यास मातीचे लेप लावावेत. 

त्वचेची काळजी घेण्याचे बरेच मार्ग ( skin care)  आणि उत्पादनं उपलब्ध आहेत. पण त्वचा नैसर्गिकपणे जपण्यासाठी आणि शुध्द करण्यासाठी केमिकलयुक्त उत्पादनांची नाही तर नैसगिक गोष्टींचीच गरज असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी मातीला खूप महत्व आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी मुल्तानी मातीचा लेप सामान्यपणे लावला जातो. पण केवळ  मुल्तानी मातीच नाही तर इतर प्रकारचे मातीचे लेपही (mud mask)  त्वचेस फायदेशीर असतात. त्वचा नैसर्गिकरित्या शुध्द करण्यासाठी, खोलवर जावून त्वचा जपण्यासाठी , त्वचा जपता जपता त्वचेचे लाड पुरवण्यासाठी ' मड मास्क' म्हणजे मातीचे लेप फायदेशीर असतात.  मड मास्क लावल्याने त्वचेस अनेक फायदे (benefits of mud mask)  मिळतात.

Image: Google

मड मास्कचे फायदे

1. मड मास्कमध्ये जिवाणुविरोधी गुणधर्म असतात. तसेच त्वचेला मातीचा लेप लावल्यानं त्वचा खोलवर स्वच्छ होते. त्वचेवर नैसर्गिक चमक आणि तेज येतं. 

2. त्वचेवरील अशुध्द घटक घालवण्यासाठी मड मास्कचा उपयोग होतो. मातीचा लेप लावल्याने  त्वचेवरची रंध्र मोकळी होतात. त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषलं जातं. 

3. मातीच्या लेपात सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ही महत्वाची खनिजं विपूल प्रमाणात असतात. मातीच्या लेपातील हे घटक त्वचा खोलवर स्वच्छ करतात आणि त्वचेचा पोत समान आणि चांगला होतो. 

4. त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी, त्वचा तरुण दिसण्यासाठी मातीच्या लेपांचा उपयोग होतो. त्वचेला तरुण करणारे घटक मातीच्या लेपांमध्ये असल्याने ॲण्टि एजिंग ट्रीटमेण्टमध्ये मड मास्कचा उपयोग केला जातो. 

5. त्वचेतील अशुध्द आणि विषारी घटक बाहेर काढून त्वचा शुध्द करण्यासाठी मातीच्या लेपांचा उपयोग होतो. ज्या मातीच्या लेपांमध्ये मॅग्नेशियम हा घटक असतो असे मास्क त्वचेसाठी जास्त फायदेशीर असतात. कारण मॅग्नेशियममुळे ॲण्टिऑक्सिडण्टच्या निर्मितीला चालना मिळते. त्वचेखालील रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक प्राप्त होते. 

Image: Google

त्वचा शुध्द करणारा मड कोल मास्क

मड कोल मास्क तयार करण्यासाठी मुल्तानी माती, ॲक्टिवेटेड चारकोल, हेजलनट आणि टी ट्री ऑइल या सामग्रीची आवश्यकता असते. एका भांड्यात 3 चमचे मुल्तानी माती घ्यावी. त्यात 1 चमचा ॲक्टिव्हेटेड चारकोल आणि 3 चमचे हेजल आणि टी ट्री ऑइल घालावं. हे सर्व नीट एकत्र करुन घ्यावं. सर्वात आधी चेहेरा स्वच्छ धुवावा. चेहेरा रुमालानं टिपून घ्यावा. नंतर तयार केलेला मड कोल मास्क चेहेऱ्यावर लावून वाळू द्यावा. लेप वाळल्यानंतर पाण्यानं चेहेरा धुवावा. मड कोल मास्कमुळे त्वचा शुध्द होते तसेच त्वचेवरील अतिरिक्त तेलही निघून जातं. 

Image: Google

चेहेऱ्याचा काळपटपणा घालवणारा काॅफी मड मास्क

काॅफी आणि माती यांच्यातील गुणांचा एकत्रित फायदा मिळवण्यासठी काॅफी मड मास्क चेहेऱ्यास लावण्याचा सल्ला सौंदर्य तज्ज्ञ देतात. काॅफी मड मास्क तयार करण्यासाठी 2 ते 3 चमचे ग्रीन क्ले ,  1 चमचा काॅफी, 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा गुलाब पाणी आणि 1 चमचा टी ट्री ऑइल घालून सर्व सामग्री नीट एकत्र करुन घ्यावी. हा लेप चेहेऱ्यावर लावून वाळू द्यावा. 15 ते 20 मिनिटांनी चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. काॅफी मड मास्कमुळे चेहेऱ्यावरील काळपटपणा दूर होतो. त्वचेवर नैसर्गिकरित्या चमक येण्यासाठी हा लेप आठवड्यातून किमान एक वेळा तरी लावावा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी