Lokmat Sakhi >Beauty > तुमच्या स्किन टाइपनुसार करा चेहऱ्यावर स्क्रबिंग, ‘इतक्या’ दिवसांनी केलं तरच मिळतील स्क्रबिंगचे फायदे-पाहा कसे...

तुमच्या स्किन टाइपनुसार करा चेहऱ्यावर स्क्रबिंग, ‘इतक्या’ दिवसांनी केलं तरच मिळतील स्क्रबिंगचे फायदे-पाहा कसे...

How To Exfoliate Safely According To Your Skin Type : How Often Should You Actually Exfoliate Your Face : How many times to use scrub on face : चेहऱ्याला नेमकं किती दिवसांच्या अंतराने स्क्रबिंग करावे, त्यासाठी परफेक्ट वेळ वेळ कोणती हे समजून घेऊयात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2024 05:28 PM2024-09-26T17:28:25+5:302024-09-26T17:39:40+5:30

How To Exfoliate Safely According To Your Skin Type : How Often Should You Actually Exfoliate Your Face : How many times to use scrub on face : चेहऱ्याला नेमकं किती दिवसांच्या अंतराने स्क्रबिंग करावे, त्यासाठी परफेक्ट वेळ वेळ कोणती हे समजून घेऊयात...

How Often Should You Actually Exfoliate Your Face How many times to use scrub on face How To Exfoliate Safely According To Your Skin Type | तुमच्या स्किन टाइपनुसार करा चेहऱ्यावर स्क्रबिंग, ‘इतक्या’ दिवसांनी केलं तरच मिळतील स्क्रबिंगचे फायदे-पाहा कसे...

तुमच्या स्किन टाइपनुसार करा चेहऱ्यावर स्क्रबिंग, ‘इतक्या’ दिवसांनी केलं तरच मिळतील स्क्रबिंगचे फायदे-पाहा कसे...

आपल्या त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. त्वचा सुंदर दिसावी यासाठी त्वचेची काळजी घेताना आपण फेशियल, स्क्रब, क्लिनअप असे वेगवेगळे उपाय करतो. आपल्या त्वचेवर जमा झालेली धूळ, डेड स्किन किंवा त्वचेतील इतर घाण वेळीच काढून टाकणे आवश्यक असते. त्वचा खोलवर आतून स्वच्छ करण्यासाठी आपण त्वचेला स्क्रबिंग करण्याचा पर्याय निवडतो(How Often Should You Actually Exfoliate Your Face).

स्क्रबिंग केल्यावर आपली त्वचा अ‍ॅक्टिव्ह होते आणि इतर स्किन प्रॉडक्ट्स  त्वचेत शोषून घेऊ शकते. अनेकदा आपण स्क्रबिंग करताना काही लहान - मोठ्या चुका करतो. ज्यामुळे त्याचे परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतात. अनेकदा चुकीच्या पद्धतीने आणि वारंवार स्क्रबिंग केल्याने आपली त्वचा खराब होऊन इतर अनेक स्किन समस्या निर्माण होऊ शकतात. असे असले तरीही आपल्या त्वचेवर स्क्रबिंग नेमकं किती दिवसांनी करावं, एकदा स्क्रबिंग केल्यानंतर परत पुन्हा स्क्रबिंग करण्यात नेमकं किती दिवसांचं अंतर असावं (How many times to use scrub on face) असे प्रश्न बऱ्याचजणींना नेहमी पडतात. आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये स्क्रबिंगचा समावेश कसा करावा, किती दिवसांच्या गॅपने स्क्रबिंग करावे याची योग्य माहिती अनेकींना नसते. यासाठीच नेमकं किती दिवसांनी स्क्रबिंग करावे ते पाहूयात(How To Exfoliate Safely According To Your Skin Type).

स्किन टाइपनुसार नेमकं किती दिवसांनी स्क्रबिंग करावे... 

आठवड्यातून जास्तीत जास्त दोन वेळा स्क्रबिंग करणे योग्य मानले जाते. परंतु जर स्किन टाइपनुसार स्क्रबिंग करायचे असेल तर, सेंन्सेटिव्ह स्किन असणाऱ्यांनी आठवड्यातून फक्त एकदाच स्क्रबिंग करावे. याउलट, नॉर्मल स्किनटाइप असणाऱ्यांनी आठवड्यातून दोन वेळा स्क्रबिंग केले तरी चालेले. ऑयली स्किन असणाऱ्यांच्या त्वचेवर सीबम जास्त प्रमाणात तयार होते यामुळे त्वचेवर डेड स्किन सेल्स सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर तयार होतात यामुळे ऑयली स्किन असणाऱ्यांनी देखील आठवड्यातून दोन वेळा स्क्रबिंग करायला हरकत नाही. 

बॉलिवूड अभिनेत्रीही आता म्हणतात हेअर ट्रिटमेंट नको, नीता अंबानींचा हेअर स्टायलिस्ट सांगतो मुख्य कारण... 

स्क्रबिंग कसे करावे... 

 स्क्रबिंग करण्यासाठी बोटावर थोडेसे स्क्रब घ्या. त्यानंतर हे स्क्रब त्वचेवर सर्क्युलर मोशनमध्ये लावून घ्या. त्वचेवर स्क्रबिंग फक्त दोन ते तीन मिनिटेच करावे. यापेक्षा जास्तवेळ स्क्रबिंग केल्यास आपल्या त्वचेचा बाहेरचा थर डॅमेज होऊ शकतो. स्क्रबिंग केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. 

१ चमचा किसलेले गाजर आणि खोबरेल तेल लावा रोज, लोक तुमचं वय ओळखूच शकणार नाहीत!

नखं वाढतच नाहीत, वारंवार तुटतात? हे घ्या होममेड सुपर हेल्दी ऑईल-नखं चमकतील...

स्क्रबिंग केल्यानंतर फॉलो करा या टिप्स... 

स्क्रब केल्याने आपली त्वचा डिप क्लिन होते. यामुळे आपल्या त्वचेतील इनर पोर्स स्वच्छ होतात. त्यामुळे अशी त्वचा कुठल्याही प्रकारचे स्किन प्रॉडक्ट् चांगल्या पद्धतीने शोषून घेण्यास तयार असते. स्क्रबिंग केल्यानंतर त्वचेला सुट होणार मॉइश्चरायझर लावा. जेणेकरून स्किन चांगली हायड्रेटेड होईल आणि ग्लोइंग दिसू लागेल.

Web Title: How Often Should You Actually Exfoliate Your Face How many times to use scrub on face How To Exfoliate Safely According To Your Skin Type

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.