घनदाट केसांसाठी तेल लावून मालिश करणं गरजेचं आहे. केसांची निगा राखताना पौष्टीक पदार्थ यासह योग्य वेळेस तेल लावणं गरजेचं आहे. केसांना तेल लावल्याने पोषण तर मिळतेच, शिवाय केस गळण्यापासूनही थांबतात. तेलाचा फायदा फक्त केसांना नसून, टाळूला देखील होतो. स्काल्पला पोषण मिळते, ज्यामुळे केसांची मुळं अधिक घट्ट होतात. केसांना तेल लावण्याचे अनेक फायदे आहेत (Hair Care Tips). पण केसांना तेल कधी आणि कोणते लावावे? याबद्दलची माहिती कमी लोकांना आहे (Hair Oiling).
काही लोकं आठवड्याचे सातही दिवस केसांना तेल लावतात (Hair Care). तर काही लोकं आठवड्याचे २ दिवस केसांना तेल लावतात. पण केसांना पोषण मिळावे यासाठी किती दिवस तेल लावावे? तेल लावताना कोणत्या चुका टाळाव्या? पाहूयात(How Often Should You Oil Your Hair For Better Hair Growth).
आठवडाभरातून केसांना किती दिवस तेल लावावे?
- आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा केसांना तेल लावावे. यामुळे केसांना वेळोवेळी मॉइश्चरायझेशन मिळते आणि त्यांची योग्य वाढ होते. याशिवाय केस गळत नाही. यासह केसांवर स्प्लिट एंड्स तयार होत नाही.
- जर आपले केस ड्राय असतील तर, केसांवर ३ ते ४ वेळा तेलाचा वापर करावा.
पायांचे टॅनिंग घालवण्यासाठी तांदुळाच्या पिठात मिसळा ३ गोष्टी, स्वस्तात मस्त उपाय- पाय दिसतील स्वच्छ
- जर आपले केस ऑइली असतील तर, आठवड्यातून २ वेळा तेल लावा.
केसांना तेल लावताना घ्या 'या' गोष्टींची काळजी
धूळ साचलेल्या केसांवर तेल लावणे टाळा
तेल नेहमी स्वच्छ आणि साफ स्काल्पवर लावावे. बऱ्याचदा धूळ, माती आणि प्रदुषणामुळे केस खराब होतात. ज्यामुळे स्काल्पमध्ये कोंडा निर्माण होतो. केस आणि स्काल्पमध्ये जर धूळ जमा झाली असेल तर, त्यावर तेल लावू नये. घाण झालेल्या केसांना तेल लावल्याने कोंडा निर्माण होतो. शिवाय हा कोंडा अधिक वेळ राहतो. त्यामुळे स्वच्छ टाळूलाच तेल लावावे.
केस धुण्यापूर्वी तेल लावावे
शाम्पू लावण्यापूर्वी केसांना तेल लावल्याने स्काल्पला पोषण मिळते, यासह केसांचे आणि स्काल्पचे मॉइश्चरायझेशन होते. शिवाय केस धुण्याच्या काही वेळापूर्वी तेल लावल्याने केस गळती थांबते. स्काल्प निरोगी राहते. शिवाय तेल शाम्पूतील रसायनांपासून सरंक्षण करते.
अधिक वेळ केसांवर तेल लावून ठेऊ नका
काही लोकांना असे वाटते की, केसांवर अधिक वेळ तेल लावून ठेवल्याने स्काल्पला पोषण मिळते. पण असे होत नाही. अधिक वेळ केसांना तेल लावून ठेवल्याने धूळ जमा होते. यासह स्काल्प आणि त्वचा तेलकट होते. मुख्य म्हणजे केसांना तेल लावल्यानंतर कंगव्याने विंचरू नये. यासह घट्ट बांधू नये. यामुळे केस अधिक प्रमाणात गळू शकतात.
केस गळून भांग रुंद होत चालला आहे? स्काल्पवर लावा एक खास प्रकारचे पाणी; निरोगी केसांचं रहस्य
तेल कोमट करून लावावे
तेल कोणतेही असो, केसांना लावण्यापूर्वी कोमट करून लावावे. असे केल्याने तेलाचे कण टाळूद्वारे सहजपणे शोषले जातात. ज्यामुळे स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारते, आणि स्ट्रेस देखील कमी होते. त्यामुळे तेल लावताना या गोष्टी लक्षात ठेवा.