केसांची योग्य ती निगा राखण्यासाठी आपण वेळच्यावेळी केसांची स्वच्छता ठेवतो. केसांची निगा राखण्यासाठी केसांना तेल लावणे, शॅम्पू लावून स्वच्छ धुणे, कंडिशनिंग करणे यांसारख्या अनेक गोष्टी आपण करतो. शरीराच्या स्वच्छतेबरोबरच केसांची देखील तितकीच काळजी घेतली पाहिजे. केसांच्या स्वच्छतेसाठी बाजारात अनेक प्रकारचे शॅम्पू उपलब्ध असतात. अनेकांना वेळेअभावी नियमित केस धुणे शक्य होत नाही. त्यामुळे केसांचे आरोग्य (Hair Care) बिघडू शकते. केसांची स्वछता राखण्यासाठी त्यांना तेलाने मसाज करणे, शॅम्पूने स्वच्छ धुणे, कंडिशनिंग करणे असे अनेक सोपस्कार करावे लागतात. या सगळ्या गोष्टींसाठी काहीवेळा आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो. अशावेळी आपल्यापैकी काहीजण ड्राय शॅम्पूचा पर्याय निवडतात.
ड्राय शॅम्पू (Dry Shampoo) हे केसांसाठी वापरले जाणारे असे प्रॉडक्ट आहे जे आपल्या केसांमधील तेल, चिकटपणा आणि घाण कमी करण्यास मदत करते. ओले शॅम्पू आणि कंडिशनर वापरण्यासाठी आपल्याला केस आधी ओले करावे लागतात आणि मग धुवावे लागतात. पण ड्राय शॅम्पू हे केस कोरडे असताना केसांना लावले जाऊ शकतात म्हणून त्यांना ड्राय शॅम्पू असे म्हणतात. ड्राय शॅम्पू लावल्यावर केस धुण्याची गरज नसते. ड्राय शॅम्पू हे बऱ्याचदा स्प्रे स्वरूपात असतात आणि ते आपण आपल्या केसांवर स्प्रे करायचे असतात. परंतु या ड्राय शॅम्पूचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्यास काहीवेळा केसांवर त्यांचे दुष्परिणाम दिसून येतात. ड्राय शॅम्पूचा वापर करताना तो नेमका किती प्रमाणांत वापरावा हे एक्सपर्ट्स कडून समजून घेऊयात(How often should you use dry shampoo Experts say pros and cons).
ड्राय शॅम्पू म्हणजे नेमकं काय ?
ड्राय शॅम्पू हे असे प्रॉडक्ट आहे ज्याचा वापर आपण पाण्याशिवाय करू शकता. याच्या वापरामुळे केसांमधील तेलकटपणा दूर होण्यास मदत होते. ड्राय शॅम्पूला हायब्रीड शाम्पू असेही म्हणतात. ड्राय शॅम्पू पावडर स्वरूपात उपलब्ध असतात. बहुतेकदा याची निर्मिती कॉर्न स्टार्च किंवा तांदूळ स्टार्चपासून केली जाते. ड्राय शॅम्पू पावडर स्वरूपात असतो आणि रेग्युलर शॅम्पू द्रव स्वरूपात असतो.
रिबॉन्डिंग केसांची काळजी नेमकी कशी घ्यावी? ६ सोप्या टिप्स, हेयर रिबॉन्डिंग केसांवर टिकून राहील...
ड्राय शॅम्पू केसांवर कसे काम करतो ?
केस रोज धुणे, ब्लो-ड्रायिंग आणि स्टाइलिंगसाठी खूप वेळ लागतो. अशावेळी ड्राय शॅम्पूची गरज भासू लागते. आपण जर आपले केस स्वच्छ करण्यासाठी वेळ देऊ शकत नसाल तर केस स्वच्छ करण्यासाठी ड्राय शॅम्पू हा चांगला पर्याय आहे. कोरड्या शैम्पूमध्ये केसांतील तेल आणि घाम शोषण्यासाठी अल्कोहोल- किंवा स्टार्च-आधारित सक्रिय घटक असतात. बर्याच ड्राय शैम्पूमध्ये सुगंध देखील असतो, ज्यामुळे केसांना फ्रेश लूक मिळू शकतो आणि आपल्याला फ्रेश वाटू शकते. ड्राय शॅम्पूचा स्प्रे केल्यानंतर, बोटांच्या मदतीने ते टाळूमध्ये मसाज केले जाते. ते नीट लावल्यावर टाळूचे तेल, घाण या गोष्टी शोषले जाते. यामुळे केस शॅम्पू केल्यानंतर दिसतात अगदी तसेच दिसतात. ड्राय शॅम्पूचे वैशिष्ट्य म्हणजे ते लावल्यानंतर केस धुवावे लागत नाहीत.
मेहेंदी लावताय की केमिकल लावताय केसांना? पाहा घरी ‘कशी’ भिजवायची मेहेंदी-केस काळेभोर...
ड्राय शॅम्पूचा दररोज वापर करणे योग्य आहे का?
ड्राय शॅम्पूचे अनेक फायदे असले तरी, त्याचा जास्त वापर केल्याने समस्याही निर्माण होऊ शकतात. याच्या अधिक वापरामुळे केसांची वाढ थांबू शकते. त्यामुळे दोनदा केस धुतल्यानंतर एकदाच ड्राय शॅम्पूचा वापर करणे उचित ठरू शकते. ड्राय शॅम्पू केसांवर किती प्रमाणांत वापरावा याबद्दल मणिपाल हॉस्पिटल व्हाइटफिल्डचे, त्वचारोगतज्ज्ञ, डॉ. प्रवीण भारद्वाज सांगतात, ड्राय शॅम्पू आठवड्यातून एक किंवा दोनदा वापरता येतो, सलग दोन दिवसांपेक्षा जास्त वेळा हा ड्राय शॅम्पू वापरु नये. याशिवाय ते तीन महिने वापरणे सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ड्राय शॅम्पूबाबत लोकांमध्ये क्रेझ असताना एकीकडे काहींच्या मनात याबाबत भीती आहे. याबाबत तज्ज्ञांचे मतही जाणून घ्यायचे होते. यावर भारद्वाज यांनी स्पष्ट केले की ड्राय शॅम्पू हा खरं तर शॅम्पू नसून ते केसांची काळजी घेणारे उत्पादन आहे, जे स्कॅल्पमधील अतिरिक्त तेल काढून टाकते आणि केसांना छान फ्रेश लूक देते. त्यामुळे ड्राय शॅम्पू कमी प्रमाणात वापरणेच योग्य ठरते.