Join us  

आठवड्यात किती वेळा केस धुणे योग्य? सतत धूत असाल तर किंवा आठवड्यातून एकदाच नहात असाल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 3:19 PM

How Often Should You Wash Your Hair? आपले केस आठवड्यातून किती वेळा धुवावेत? कोणत्या पाण्याने केस धुणे योग्य? जास्त वेळा धुतले तर काय होतं?

शरीराची सफाई ही खूप महत्वाची आहे. यासाठी आपण नियमित आंघोळ करतो. व शरीर फ्रेश ठेवतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासोबत शरीर व केसांची देखील काळजी घेणं महत्वाचं आहे. अनेक जण केसात येणाऱ्या घामामुळे व स्काल्पवर साचलेल्या घाणीमुळे त्रस्त आहेत. ज्यामुळे केस गळती, केसात कोंडा, केस पांढरे होणे या समस्या निर्माण होतात. पण या समस्या सोडवण्यासाठी आपण नियमित हेअर वॉश करत नाही. असे म्हणतात नियमित हेअर वॉश केल्याने केस गळतीची समस्या निर्माण होते. मग हेअर वॉश आठवड्यातून किती वेळा करावे असा प्रश्न निर्माण होतो(How Often Should You Wash Your Hair?).

आठवड्यातून किती दिवस हेअर वॉश करावे?

केस दररोज धुतल्याने केस गळतीची समस्या निर्माण होऊ शकते. केसांची मुळे सैल होतात, ज्यामुळे ते गळतात. म्हणून आठवड्यातील ३ दिवस आपण हेअर वॉश करू शकता. जर आपल्या केसातून घामामुळे दुर्गंधी पसरत असेल किंवा स्काल्प ऑईली होत असेल तर, आठवड्यातील ४ दिवस हेअर वॉश करा. 

कापूर करतो केसांवर जादू, ५ रुपयाच्या कापराचा पाहा सोपा उपाय

काही महत्वाचे टिप्स

काही लोकं थोडे केस चिपचिपित झाले की हेअर वॉश करतात. ज्यामुळे त्यांना वारंवार केस धुण्याची सवय लागते. सतत केस धुतल्याने केस खूप गळतात. बरेच दिवस केस धुतले नाही तरी देखील याचा थेट दुष्परिणाम केसांवर होतो. त्यामुळे केस धुण्यासाठी एक टाईम टेबल तयार करा. व त्याच दिवशी केस आठवणीने धुवा.

जर आपल्या स्काल्पवर सतत खाज सुटत असेल तर, दर २ दिवसांनी केस धुवा, केस धुण्यासाठी माईल्ड शॅम्पूचा वापर करा. व केस धुताना डायरेक्ट केसांवर शॅम्पू लावणे टाळा. पाण्यात मिसळून केसांवर शॅम्पू लावा.

आठवड्यातून एकदाच केस धुतल्याने केसांचे खूप नुकसान होते. धूळ, माती, प्रदूषण, घामामुळे केस चिपचिपित व खराब होतात. त्यामुळे आठवड्यातून निदान ३ ते ४ वेळा केस धुवा. 

फक्त १ चमचाभर मेथी दाणे घ्या, जाड घट्ट लांब केसांसाठी ३ सोपे उपाय

केस धुताना गरम पाण्याचा वापर करणे टाळा. गरम पाण्यामुळे केसांचे मुळे सैल होतात. ज्यामुळे केस गळतात. गरम पाण्याऐवजी थंड पाणी वापरा. व केस धुतल्यानंतर लगेच टॉवेलने केस पुसून बांधून ठेऊ नका. नैसर्गिक हवे खाली केस सुकवून घ्या.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी