कामाचा ताण, घरच्या जबाबदाऱ्या, या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. वारंवार टेंशन असेल तर आपल्या चेहऱ्यावरही कुठेतरी जाणवू लागतं. तेलकट चेहरा, डोळ्यांखालची डार्क सर्कल्स आपला संपूर्ण लुक बिघडवतात. जर आपण वेळीच लक्ष दिलं नाही तर डार्क सर्कल्सच्या खुणा जास्त दिसू लागतात. जरी आपण फेअरनेस क्रिम लावली तरी डोळ्यांखालचा काळपटपणा तसाच दिसतो. आज आम्ही तुम्हाला डार्क सर्कल्स टाळण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. याशिवाय कारणंही लक्षात घेणं गरजेचं आहे. जेणेकरून डार्क सर्कल्सासाठी कारणीभूत ठरत असलेल्या गोष्टींबाबत माहिती मिळवता येऊ शकते.
कारणं
हायपरपिगमेंटेशन
अनॅमिया
ताण-तणाव
स्मोकिंग
डिडायड्रेशन
डोळ्यांवर जास्त ताण येणं
झोप पूर्ण न होणं
वाढत्या वयात आपण डोळ्यांखाली कोलेजेन आणि फॅट्स कमी होऊ लागतात. परिणामी, त्वचा पातळ होते. रोजचा थकवा, कामाचा त्वचेवर अधिक परिणाम होतो. व्हिटॅमिन ए त्वचेसाठी अॅंटी-ऑक्सिडेंट्ससारखं काम करतं. त्यामुळे या व्हिटॅमिनचा नियमित आहारात समावेश करायला हवा. कारण व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे डार्क सर्कलची समस्या होऊ शकते. व्हिटॅमिन ए मुळे त्वचेचं तारूण्य वाढतं आणि ब्लड सर्कुलेशनही योग्य प्रकारे होतं. तसेच याने शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर काढले जातात. त्यामुळे डाएटमध्ये गाजर, कलिंगड, पपई यांसारख्या फळांचा समावेश करावा.
अनेकदा या फायदेशीर व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात. व्हिटॅमिन सी त्वचेसाठी हेल्दी आणि त्वचेला निरोगी ठेवण्याचं महत्वाचं व्हिटॅमिन आहे. याच्या सेवनाने नसा मजबूत होतात. तसेच त्वचा लवचिक होते आणि डोळ्यांखालील त्वचेवर आलेली सूजही दूर होते. त्यामुळे डार्क सर्कलची समस्या दूर करायची असेल तर वेगवेगळ्या फळांसोबतच हिरव्या पालेभाज्यांचंही सेवन करावं. त्यात संत्री, लिंबू, फ्लॉवर, ब्रोकली यांचा समावेश करावा. यातून तुम्हाला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळेल.
उपाय
काकडी
अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्येही काकडीचा फ्रेशनेससाठी उपयोग करण्यात येतो. तुम्ही काकडीचा स्प्रे तयार करू शकता. काकडीपासून तयार करण्यात आलेला स्प्रे तुम्हाला दिवसभर फ्रेश राहण्यास मदत करेल. त्यासाठी सर्वात आधी काकडीचा तुकडा घ्या. त्याची साल काढून मिक्सरमध्ये बारिक करून पेस्ट तयार करा. त्यानंतर गाळणीच्या साहाय्याने गाळून रस वेगळा करून घ्या. या रसामध्ये लिंबाचा रस, गुलाबपाणी आणि कोरफडीचा गर व्यवस्थित एकत्र करा. तयार मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये ओतून फ्रिजमध्ये ठेवा. या स्प्रेचा डोळे बंद करून तोंडावर मारल्यानं तुम्हाला फ्रेशनेस जाणवेल.
टि बॅग्स
टी बॅग आणि सौंदर्य खुलवणं याचा काय संबंध असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल पण, टी बॅगचा वापर करून तुम्ही सौंदर्य खुलवू शकता. टी बॅग्ज घेऊन त्यामध्ये ओट्स, मध,लिंबू पिळून त्याचा एक चांगला मास्क तयार करुन घ्या. हा मास्क चेहऱ्याला लावा. साधारण १५ मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. शक्य असल्यास चेहरा स्वच्छ झाल्यानंतर ग्रीन टी सीरम किंवा टोनर लावा. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि डोळ्यांखालचा काळपटपणा दूर होण्यास मदत होईल.
पुदिन्याची पानं
त्यात मेन्थॉल असते जे रक्ताभिसरण सुधारते, त्वचेला शांत करते आणि त्वचा पुन्हा जिवंत करते. तसेच, पुदीनातील व्हिटॅमिन सी डोळ्यांभोवतीची त्वचा उजळ बनवते. पुदीनाची पाने वाटून घ्या आणि त्यांना १० मिनिटे डार्क सर्कलवर लावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्यान धुवून टाका.
दूध
डोळ्यांवरचा ताण दूर करण्याचा हा सुद्धा एक चांगला उपाय आहे. फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलेले दुध एका चमच्यात घ्या. आता त्यात कापसाचा बोळा भिजवा. 3 ते 4 मिनिटे हा बोळा डोळ्यांवर ठेवा आणि नंतर बोळा बाजूला करून पाण्याने डोळे स्वच्छ धुवा. यामुळे डोळे आणि संपूर्ण शरीरात उत्साह येऊन डोळ्यांचा थकवा कमी होईल.
बदामाचं तेल
बदाम तेलात असलेल्या अँटी ऑक्सीडंट्समुळे तुमच्या त्वचेसाठी ते फारच उपयुक्त आहे. जर तुमची त्वचा काळी पडली असेल किंवा त्वचेवर ग्लो आणायचा असेल तर रोज चेहऱ्यावर बदाम तेलाने मालीश करा. यामुळे चेहऱ्यावरील ग्लो वाढेल. बदामात असलेल्या रेटिनॉल, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के या सर्व गोष्टी आपल्या डोळ्याखालील नाजूक त्वचेला गुळगुळीत करतात. आपल्या डोळ्याभोवती बदामाचे तेल आणि लिंबाचा रस या मिश्रणानं 2 मिनिटांसाठी मालिश करा. नंतर १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाका.