डोळ्यांखालची काळी वर्तुळ (Dark circles Removal) महिलांसह पुरूषांमध्येही दिसून येतात. स्क्रिनचा जास्त वापर, झोप व्यवस्थित न घेणं, ताण-तणाव यामुळे डोळ्यांच्या खाली काळपटपणा येतो. यामुळे आपण थकलेले किंवा म्हातारे झालेले दिसतो. डार्क सर्कल्ससाठी तुम्ही वेगवेगळे उपाय करून थकला असाल तर घरगुती उपाय (Eye Care Tips) नक्की करून पाहा. कारण अनेकदा आपण महागड्या क्रिम्स, जेल यामध्ये पैसे घालवतो पण हवा तसा रिजल्ट मिळत नाही पण तुम्ही आपल्या जीवनशैलीत थोडासा बदल केला आणि घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर केला तर तुम्हाला चांगला परिणाम दिसू शकतो.
डार्क सर्कल्स का येतात?
डोळ्यांखाली काळी वर्तुळे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये आनुवंशिकता, वृद्धत्व, कोरडी त्वचा, जास्त रडणे, कंम्प्यूटरसमोर जास्त वेळ काम करणे, मानसिक आणि शारीरिक ताण, झोपेचा अभाव आणि चुकीच्या आहाराचा समावेश आहे. आरोग्य तज्ञांच्या मते, हे डार्क सर्कल वेगवेगळ्या वयोगटातील पुरुष किंवा महिलांमध्ये होऊ शकते.
१) बटाट्याचा रस आणि दूध
प्रथम बटाटा किसून घ्यावा. आता किसलेल्या बटाट्याचा रस काढून घ्या. एक चमचा बटाट्याचा रस थंड दुधात समान प्रमाणात मिसळा. हे मिश्रण कापसाच्या बोळ्याच्या मदतीनं डोळ्यांना लावा. १५ ते २० मिनिटांसाठी हे त्वचेवर लावलेलं असू द्या. नंतर चेहरा स्वच्छ धुवा. डार्क सर्कल्स काढण्यासाठी दिवसातून २ वेळा हा उपाय करता येऊ शकतो.
.....म्हणून मी पांढरे केस लपवत नाही! गरज काय सतत रंग चोपडायची? समीरा रेड्डीचा खुलासा
२) थंड दूध
सर्वप्रथम, एका भांड्यात थोडे थंड दूध घ्या आणि त्यात दोन कापसाचे बोळे भिजवा. कापसाचे बोळे डोळ्यांवर अशा प्रकारे ठेवा की ते काळी वर्तुळे झाकतील. त्यांना 20 मिनिटे सोडा आणि नंतर कापसाचे बोळे काढा. मग स्वच्छ पाण्याने धुवा आणि दररोज तीन वेळा हा प्रयोग करा. डार्क सर्कल काढण्यासाठी दुधाचा वापर करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.
३) दूध आणि गुलाबपाणी
थंड दूध आणि गुलाब पाणी समान प्रमाणात मिसळा. मिश्रणात दोन कापसाचे बोळे भिजवा. त्यांना तुमच्या डोळ्यांवर ठेवा. मग ते 20 मिनिटे सोडा. मग कापसाचे गोळे काढून टाका. डार्क सर्कल काढण्यासाठी तुम्ही दर आठवड्याला 3 वेळा दुधासह हा प्रयोग करू शकता.
४) बदाम तेल आणि दूध
बदामाचे तेल थंड दुधात समान प्रमाणात मिसळा आणि ते एकत्र करा. या तयार मिश्रणात कापसाचे दोन बोळे बुडवा. कापसाचे बोळे डोळ्यांवर अशा प्रकारे ठेवा की ते काळी वर्तुळे झाकतील. ते 15-20 मिनिटे राहूद्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा.
'या' ४ चुकांमुळे कमी वयातच चेहऱ्याची त्वचा सैल पडते; स्किन टाईटनिंगसाठी शेहनाज हुसैनच्या खास टिप्स
५) मध, लिंबू आणि कच्चं दूध
एक चमचा कच्चे दूध घ्या आणि त्यात 1/4 चमचे ताज्या लिंबाचा रस घाला. दुध फाटत आल्यावर त्यात एक चमचा मध घाला. डोळ्यांभोवती या मिश्रणनं 3-4 मिनिटांसाठी मालिश करा आणि ते 10 मिनिटे सोडा. यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. ग्लोईंग त्वचेसाठी आपण ही प्रक्रिया रोज करू शकता.