थंडीच्या दिवसात आपण चेहरा, केस यावर जसं लक्ष केंद्रित करतो, तसं काही आपण हाताच्या बाबतीत करत नाही. हाताकडे जरा दुर्लक्षच होतं आणि त्यामुळे मग हातावर (winter care tips for hands) डेड स्किनचा थर साचत जातो. यामुळे साहजिकच मग हात काळे पडतात आणि कोरडे, रखरखीत होत जातात. हातांसाठी आपण खूप काही स्पेशल करण्याची अजिबात गरज नसते. आठवड्यातून एकदा जरी या पद्धतीने स्क्रब (how to make natural scrub at home) करत गेलात, तरी देखील तुमचे हात मऊ, मुलायम होतील आणि काळवंडलेले हात स्वच्छ दिसू लागतील. हातांना नियमित स्क्रब (home remedies) केल्यामुळे हाताची त्वचा एक्सफोलिएट होते आणि छिद्रांमधील घाण बाहेर पडून हात स्वच्छ होतात.
हातांवरची डेड स्किन काढून टाकणारे ३ प्रकारचे स्क्रब (natural scrub for hands)
१. लिंबू, साखर आणि मध (sugar, lemon and honey)
साखर हे सगळ्यात चांगल नॅचरल स्क्रबर मानलं जातं. साखरेमध्ये ग्लायकोलिक ॲसिड मोठ्या प्रमाणात असतं. हे ॲसिड त्वचेला स्वच्छ करून मऊपणा देतं. लिंबामध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्याने ते आपल्या त्वचेसाठी उत्तम आहे. त्यामुळे लिंबू, साखर आणि मध यांचा वापर करून तयार करण्यात आलेलं स्क्रब नक्कीच तुमच्या हातांना स्वच्छ, चमकदार बनवेल.
त्वचा सैल झाली? स्किन टाइटनिंगसाठी करा ३ व्यायाम... तरुण त्वचेचं सिक्रेट
हे स्क्रब तयार करण्यासाठी अर्धी वाटी साखर, ७ ते ८ लिंबांचा रस आणि चार टेबलस्पून मध हे सगळं साहित्य एका बाऊलमध्ये एकत्र करा. हात पाण्याने थोडे ओले करून घ्या आणि त्यानंतर हे स्क्रब हातांवर चोळा. हलक्या हाताने गोलाकार दिशेने ८ ते १० मिनिट हातांना मसाज करा.
२. बीट आणि साखर (beet root and sugar)
या दोन्ही गोष्टींचा वापर करून तुम्ही हातांसाठी घरच्या घरी उत्तम स्क्रब तयार करू शकता. यासाठी मध्यम आकाराचे दोन बीट आणि अर्धी वाटी साखर लागेल. बीट किसून घ्या. त्यामध्ये साखर टाका. आता या स्क्रबने तुमच्या हातांना मसाज करा. साधारण एकेका हाताला ७ ते ८ मिनिट हलक्या हाताने मसाज करा. यामुळे हाताच्या त्वचेखाली रक्ताभिसरण उत्तम होईल आणि हात चमकदार, नितळ दिसतील.
३. हरबरा डाळीचे पीठ, हळद आणि दूध (besan, turmeric and milk)
हरबरा डाळीच्या पीठाचा म्हणजेच बेसन पीठाचा उपयोग तर त्वचेसाठी फार पुर्वीपासून केला जातो. आपल्या आई, आजीकडूनही बेसन पीठाचे घरेलू नुस्के अनेक जणांनी ऐकले असतील. त्यामुळे आता आपल्या हातांना स्वच्छ करण्यासाठी हाच उपाय करा. यासाठी अर्धी वाटी बेसन घ्या. यामध्ये दोन टी स्पून हळद टाका. दूध टाकून याची पेस्ट बनवा. ही पेस्ट हातांवर चोळा. हा उपाय केल्याने हात स्वच्छ, चमकदार दिसू लागतील.