Lokmat Sakhi >Beauty > Neck Tanning : 'या' ३ कारणांमुळे मानेवर येतात काळे पॅचेच; उजळदार मानेसाठी जाणून घ्या घरगुती उपाय

Neck Tanning : 'या' ३ कारणांमुळे मानेवर येतात काळे पॅचेच; उजळदार मानेसाठी जाणून घ्या घरगुती उपाय

How to remove Neck Tanning : एटॉपिक डर्मेटाइटिस हा त्वचेशी निगडीत एक आजार आहे.  धूळ, एलर्जीमुळे हे संक्रमण वाढत जातं. यामुळे त्वचेवर डाग, दाणे येतात. त्वचेवर ओलसरपणा असल्यास ही समस्या वाढत जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 06:44 PM2021-06-20T18:44:01+5:302021-06-20T18:55:32+5:30

How to remove Neck Tanning : एटॉपिक डर्मेटाइटिस हा त्वचेशी निगडीत एक आजार आहे.  धूळ, एलर्जीमुळे हे संक्रमण वाढत जातं. यामुळे त्वचेवर डाग, दाणे येतात. त्वचेवर ओलसरपणा असल्यास ही समस्या वाढत जाते.

How to remove Neck Tanning : : Home remedies to get rid of dark neck | Neck Tanning : 'या' ३ कारणांमुळे मानेवर येतात काळे पॅचेच; उजळदार मानेसाठी जाणून घ्या घरगुती उपाय

Neck Tanning : 'या' ३ कारणांमुळे मानेवर येतात काळे पॅचेच; उजळदार मानेसाठी जाणून घ्या घरगुती उपाय

Highlights कडक उन्हामुळे आपली त्वचा बर्‍याच वेळा जास्त गडद होते. याला पिग्मेन्टेशन म्हणतात, हेच त्वचेचा टोन गडद आणि मान काळी होण्याचे कारण आहे.हे काळ्या मानेमागचं हार्मोनल कारण आहे, जेथे लठ्ठपणा आणि इन्सुलिन रेजिस्टंटमुळे त्वचेवर मेलेनिन जमा होते.

मानेच्या काळपटपणाकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही.  दुर्लक्ष केल्यास  समोरच्या व्यक्तीला मान चेहऱ्याच्या त्वचेपेक्षा खूप काळी दिसू शकते. जास्तीत जास्त लोक मानेच्या काळपटपणानं  हैराण झालेले असतात. चेहऱ्याच्या त्वचेपेक्षा मानेची त्वचा काळी का दिसते? असा प्रश्न अनेकदा तुम्हाला पडला असेल. जसलोक रुग्णालयातील  त्वचा रोग तज्ज्ञ आणि संशोधन केंद्राचे सल्लागार डॉ.बानानी चौधरी यांनी सांगितले की मानेच्या काळपटपणामुळे त्वचेचे आजारही होऊ शकतात. त्यासाठी आधी कारणं समजून घ्यायला हवीत. आज आम्ही तुम्हाला मानेचा काळपटपणा दूर करण्यासाठी घरगुती उपायही सांगणार आहोत. 

सन एक्पोजर

आपल्या लक्षात आले असेल की कडक उन्हामुळे आपली त्वचा बर्‍याच वेळा जास्त गडद होते. याला पिग्मेन्टेशन म्हणतात, हेच त्वचेचा टोन गडद आणि मान काळी होण्याचे कारण आहे. हा काळपटपणा लवकर कमी होत नाही आणि आपण शक्य तितक्या लवकर यावर उपचार न केल्यास ते सहजपणे स्पष्ट होत नाही. डॉ. बनानी चौधरी म्हणतात की मान काळी होण्यामागे सूर्याची किरणं हे एक मोठे कारण आहे. सूर्यप्रकाशामुळे चेहर्‍यावर टॅनिंग होते आणि या टॅनिंगमुळे मानेवरची त्वचा देखील गडद होते. म्हणून, उन्हाच्या वातारवणात बाहेर पडताना नेहमी सनस्क्रिन लावायला हवे. 

एकँथोसिस नाइग्रिकन्स (Acanthosis nigricans)

हे काळ्या मानेमागचं हार्मोनल कारण आहे, जेथे लठ्ठपणा आणि इन्सुलिन रेजिस्टंटमुळे त्वचेवर मेलेनिन जमा होते. यामुळे, गळ्यासह अंडरआर्म्स आणि मांड्या सारखे इतर भाग देखील काळपट होतात. वजन कमी करणं आणि इंसुलिन रेजिस्टेंसचा उपचार केल्यामुळे मानेवरचा काळपटपणा कमी होऊ शकतो. 

एटॉपिक डर्मेटाइटिस (Atopic Dermatitis)

एटॉपिक डर्मेटाइटिस हा त्वचेशी निगडीत एक आजार आहे.  धूळ, एलर्जीमुळे हे संक्रमण वाढत जातं. यामुळे त्वचेवर डाग, दाणे येतात. त्वचेवर ओलसरपणा असल्यास ही समस्या वाढत जाते. कधीकधी स्टिरॉइड्स, फेनिटोइन आणि मलेरिया विरोधी रोगांसारख्या विशिष्ट औषधांच्या वापरामुळे त्वचेचे हायपरपीग्मेंटेशन देखील होऊ शकते. असे पिग्मेंटेशन  शरीरावर कुठेही दिसू शकते. औषधांचा वापर बंद झाल्यानंतर आपोआप हा त्रास कमी होतो. 

उपाय

मसाज करणं

मानेचं सौंदर्य वाढविण्यासाठी आणि सुंदर करण्यासाठी खोबऱ्याचं तेल, ऑलिव्ह ऑइल, बदामाचं तेल किंवा रोज ऑइलचा वापर करा. यामुळे मानेच्या त्वचेचं सौंदर्य आणखी खुलवण्यास मदत होते. हातावर तेल घेऊन मानेवर मसाज करा. रात्रभर तसचं ठेवा आणि सकाळी आंघोळ करताना व्यवस्थित स्वच्छ करा. 

मास्क

चेहऱ्यासोबत मानेसाठीही तुम्ही स्पेशल मास्क तयार करू शकता. तोही पूर्णपणे नॅचरली. त्यासाठी एक केळं स्मॅश करून घ्या आणि त्यामध्ये एक टिस्पून ऑलिव्ह ऑइल एकत्र करा. तयार पॅख मानेवर 10 ते 15 मिनिटांसाठी लावा आणि ओल्या नॅपकिनच्या मदतीने मान स्वच्छ करून घ्या. मानेसाठी अंड्याचा पॅकही अत्यंत फायदेशीर ठरतो. यासाठी अंड्याचा पांडरा भाग वेगळा करून घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मध एकत्र करा. तयार पॅक 10 ते 15 मिनिटांसाठी तसाच ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा. 

कोरफड

कोरफडीचे त्वचेला होत असलेले फायदे आपल्याला माहीत आहेत. अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये कोरफडीचा वापर केला जातो. त्यासाठी कोरफड जेल अंडरआर्म्सना लावून मसाज करा.  कोरफडमध्ये विटामिन-ई भरपूर प्रमाणात असतं. कोरफडमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे हे त्वचेला योग्य तऱ्हेने हायड्रेट करतं तेही कोणत्याही चिकटपणाशिवाय. कोरफड त्वचेची इलास्टिसिटी सुधारते आणि त्यामुळे फाईन लाईन्स, सुरकुत्या, चेहऱ्यावरील डाग यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.  कोरफड स्वच्छ धुवून साल काढून आतला भाग मानेला लावू शकता.

लिंबू

अंघोळीच्या दहा मिनिटं आधी घेऊन ५ मिनिटं आपल्या अंडरार्म्सना चोळा. त्यानंतर स्वच्छ अंघोळ करा. अंघोळीनंतर त्या भागाला बॉडी लोशन लावा. लिंबात सायट्रिक एसिड असतं. जे तुमच्या त्वचेवरील मेलानिन कमी करून फरक जाणवण्यासाठी फायदेशीर ठरत असतं. त्यामुळे आपली त्वचा फेअर होत जाते.  पण त्यासाठी सतत दोन आठवडे तुम्हाला हा उपाय करणं गरजेचं आहे. 

बेसन

त्वचेचा काळपटपणा कमी करण्यासाठी दोन मोठे चमचे बेसनामध्ये गुलाब पाण्यात घालुन पातळसर पेस्ट करून घ्यावी. हे मिश्रण मानेवर लावून वीस मिनिटं ठेवावे. त्यानंतर चेहरा धुवून टाकावा. ह्या मिश्रणामुळे त्वचेतील पी एच लेव्हल संतुलित राहतात. तसेच त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेण्याचे कामही बेसन करते.

मुलतानी माती

मुलतानी मातीचे सौंदर्याच्या दृष्टीने फार महत्व आहे. तुमची त्वचा तेलकट असल्यास, तुम्ही दोन चमचे मुलतानी माती त्यात एक मोठा चमचा टॉमेटो रस, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक मोठा चमचा मध घाला. आता हा पॅक आपल्या चेहऱ्यासह मानेला, अंडरआर्म्ससाठी तुम्ही वापरू शकता. सुकल्यानंतर थंड पाण्याने धुऊन टाका. 

मानेची स्वच्छता

सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानेची स्वच्छता राखणं अत्यंत आवश्यक असतं. तसेच दररोज आंघोळ करताना साबणाच्या मदतीने मान स्वच्छ करणंही आवश्यक आहे. यादरम्यान सर्क्युलर मोशनमध्ये मान स्वच्छ करा. पाण्याने धुतल्यानंतर मॉयश्चरायझर नक्की लावा. 
 

Web Title: How to remove Neck Tanning : : Home remedies to get rid of dark neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.