Lokmat Sakhi >Beauty > How to remove pimples : तेलकट पदार्थं खाल्ल्यानं चेहऱ्यावर पिंपल्स येतात? अंगावर खाजही येते? जाणून घ्या खरंच असं होतं का

How to remove pimples : तेलकट पदार्थं खाल्ल्यानं चेहऱ्यावर पिंपल्स येतात? अंगावर खाजही येते? जाणून घ्या खरंच असं होतं का

How to remove pimples : प्रत्येक व्यक्तीला तेलकट पदार्थ खाल्ल्यानं पिंपल्स येतात असं नाही.  तेलकट पदार्थांमुळे शरीरात अधिक प्रमाणात तेल जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 01:10 PM2021-10-12T13:10:08+5:302021-10-12T13:16:55+5:30

How to remove pimples : प्रत्येक व्यक्तीला तेलकट पदार्थ खाल्ल्यानं पिंपल्स येतात असं नाही.  तेलकट पदार्थांमुळे शरीरात अधिक प्रमाणात तेल जाते.

How to remove pimples : Can oily food cause pimples on face | How to remove pimples : तेलकट पदार्थं खाल्ल्यानं चेहऱ्यावर पिंपल्स येतात? अंगावर खाजही येते? जाणून घ्या खरंच असं होतं का

How to remove pimples : तेलकट पदार्थं खाल्ल्यानं चेहऱ्यावर पिंपल्स येतात? अंगावर खाजही येते? जाणून घ्या खरंच असं होतं का

Highlightsपिंपल्स दोन प्रकारचे असतात. नॉन-इंफ्लेमेटरी आणि इंफ्लेमेटरी. व्हाइटहेड्स आणि ब्लॅकहेड्स नॉन-इंफ्लेमेटरी पिंपल्स असतात. मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर पाळीच्या आधी त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात. जर तुम्ही एखाद्या औषधांचे सेवन करत असाल तर उष्णता वाढल्यानं पिंपल्स येतात. 

सध्याच्या जीवनशैलीत लोकांमध्ये फास्ट फूड खाण्याचं प्रमाण वाढलंय. पण घरात जर सणासुदीला पूरी, पापड, कुरडया, भजे असे  तेलकट पदार्थ बनवले असतील खूप लोक खाताना बराच विचार करतात. तेलकट खाल्यानं खाज येते, त्वचेवर पुळ्या येतात, खोकला येतो म्हणून तेलकट खाऊ की नको असा संभ्रम अनेकांच्या मनात असतो.  म्हणून आज आम्ही खरंच पिंपल्स तेलकट खाल्यामुळे येतात का याबाबत योग्य माहिती देणार आहोत. 

तेलकट खाल्यानं पिंपल्स येतात का?

प्रत्येक व्यक्तीला तेलकट पदार्थ खाल्ल्यानं पिंपल्स येतात असं नाही.  तेलकट पदार्थांमुळे शरीरात अधिक प्रमाणात तेल जाते. तेलाच्या अति सेवनामुळे त्वचेवरील पोअर्समध्ये तेल जाते आणि त्यामुळे त्वचेवर पिंपल्स येतात. असा समज आहे. पण पिंपल्स आणि तेलकट पदार्थ यांचा कोणताही संबंध नाही.  तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे पोटात बॅड फॅट्स पदार्थ जातात. जे तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी नुकसानकारक असतात. त्यामुळे तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे पिंपल्स येतात असं म्हणणं योग्य ठरत नाही. खूप थकल्यासारखं वाटतं, हाडंही ठणकताहेत? मग अंगातलं रक्त स्वच्छ, निरोगी ठेवण्यासाठी खा हे १० पदार्थ

पिंपल्स का येतात?

चेहऱ्यावर मुरुम येण्याची समस्या सहसा किशोरवयीन मुलांशी जोडल्याने दिसून येते. हे घडते कारण या वयात आपल्या शरीरात जलद हार्मोनल बदल होतात. यामुळे, हार्मोन लेव्हलच्या गडबडीमुळे, आपल्या त्वचेवर मुरुम वाढू लागतात. 

आपल्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समतोल राखणे फार महत्वाचे आहे, जर आहारात त्यांचे प्रमाण जास्त असेल तर मुरुमांची समस्या  येते.

रोज संध्याकाळी जंक फूड खाल्याने तुमचे वजन तर वाढतेच पण तुम्हाला मुरुमांच्या समस्येचाही सामना करावा लागतो. 

स्वच्छता ही पिंपल्ससाठी कारणीभूत ठरते. जर तुम्ही रोज व्यवस्थित २ ते ३ वेळा चेहरा धुवत नसाल तर चेहऱ्यावर घाण जमा होते. त्यामुळे तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात. याशिवाय जास्त ताण घेतल्यानं त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात. 

मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर पाळीच्या आधी त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात. जर तुम्ही एखाद्या औषधांचे सेवन करत असाल तर उष्णता वाढल्यानं पिंपल्स येतात.  

उपाय

पिंपल्स दोन प्रकारचे असतात. नॉन-इंफ्लेमेटरी आणि इंफ्लेमेटरी. व्हाइटहेड्स आणि ब्लॅकहेड्स नॉन-इंफ्लेमेटरी पिंपल्स असतात. तर इंफ्लेमेटरीमध्ये पॅप्युल्स, पस्ट्यूल, नोड्यूल आणि सिस्ट असतात. ज्यामुळे दाग आणि सूज येण्याची समस्या उद्भवते. 

खोबऱ्याचं तेल

खोबऱ्याचं तेल पिंपल्सवर लावून रात्रभर ठेवा आणि सकाळी पाण्याने धुवून टाका. यामध्ये असणारे अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन-ई त्वचेवरील पिंपल्स दूर करतात. तसेच अ‍ॅक्नेही दूर होतात.

व्हिनेगर

कापसाच्या मदतीने सफरचंदाचं व्हिनेगर पिंपल्सवर लावा. त्यानंतर 10 ते 15 मिनिटं पाण्याने धुवून घ्या. यामध्ये असणारे अॅन्टी-मायक्रोबियल गुणधर्म पिंपल्सपासून सुटका करण्यासाठी मदत करतात.

कोरफड

कोरफडीचा गर पॉलीसॅकराइड आणि जिबरेलिंस यांसारख्या पिंपल्सपासून सुटका करण्यासाठी मदत करतात. तसेच यामुळे स्किन हायड्रेट राहते आणि तजेलदारही होते.

संत्र्याची साल

संत्र्याच्या सालीची पावडर आणि मध एकत्र करून लावल्याने पिंपल्स दूर होतात. त्याचबरोबर त्वचा उजळण्यासही मदत होते.

बेकिंग सोडा

पाण्यामध्ये 2 टिस्पून बेकिंग सोडा एकत्र करून पिंपल्सच्या डागांवर लावा. सुकल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या. हे त्वचेच्या मृत पेशी दूर करण्यासोबतच पीएच लेव्हल संतुलित करतं.

Web Title: How to remove pimples : Can oily food cause pimples on face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.