स्ट्रेच मार्क्सचं दिसले की नेहमीच कपाळावर आठ्या येतात. साडी, कुर्ता किंवा कोणताही नवीन फॅशनचा ड्रेस घालायचा म्हटलं तर टेंशन येतं. पोटावरच्या, हातांवरच्या या खुणा पटकन कोणाच्याही दिसण्यात येतात. त्यामुळे चारचौघात लाज वाटते. काय केल्यानं स्ट्रेच मार्क्स कमी होतील असं घरोघरच्या बायकांना वाटत असतं. गर्भावस्थेनंतर महिलांना स्ट्रेच मार्क्सच्या समस्येचा सामना करावा लागतो.
पाठ, छाती, पोट, कंबर आणि हातांवर स्ट्रेच मार्क येतात. अचानक वजन वाढल्यामुळे आणि कमी झाल्याने तसेच टीनएजर्समध्ये होणाऱ्या हार्मोन चेंजेंसमुळेदेखील स्ट्रेच मार्क्स येतात. एखादया तज्ज्ञाकडे जाऊन ट्रिटमेंट घ्यायची म्हटलं तर बराच खर्च येतो. मग अशावेळी स्वतःच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांचा वापर करू शकता. ओन्लीमाय हेल्थ शी बोलताना डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर पूजा चोपडा यांनी ही माहिती दिली आहे.
साधारणपणे लेझर ट्रिटमेंटसोबत ट्रेटिनोईन आधारित क्रीम, जेल आणि लोशनच्या मदतीनं स्ट्रेच मार्क कमी होण्यास मदत मिळू शकते. स्ट्रेच मार्क्स येऊ नयेत, यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल करावा. वजन नियंत्रणात राहील अशी लाईफस्टाईल ठेवायचा प्रयत्न करा. तेलकट त्वचेऐवजी कोरड्या त्वचेवर लवकर स्ट्रेच मार्कची समस्या निर्माण होते. आपल्या डॉक्टरांना भेटून त्यांच्या सल्ल्यानुसार डाएट फॉलो करावा.
पुरेसं पाणी प्या त्वचा डिहायड्रेट होऊ देऊ नका
स्ट्रेच मार्क्स दूर करायचे असतील तर पाणी तुम्हाला मदत करेल. हे फक्त तुमची त्वचाच नाहीतर संपूर्ण आरोग्यासाठी बेस्ट गिफ्ट आहे. पाण्यामुळे तुमची स्किन हायड्रेट आणि हेल्दी होण्यास मदत होते. जास्तीत जास्त पाणी प्यायल्यानं शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जाण्यास मदत होईल.
चांगला आहार
तुम्हाला हेल्दी खाण्यावर लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. जेवणामध्ये अशा पदार्थांचा समावेश करावा. ज्यांमध्ये भरपूर झिंक आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असेल. हे न्यूट्रियंट्स कोलेजन तयार करण्यासाठी मदत करतात. कोलेजन एक प्रकारचं प्रोटीन आहे. जे स्किनची इलास्टिसिटी मेन्टेन करण्यासाठी मदत करतं.
लिंबाचे साल
स्ट्रेचमार्क्सचे डाग घालवण्यासाठी लिंबाची साल प्रभावी ठरू शकते. यासाठी लिंबाची साल वाळवून बारीक वाटून घ्या. आता दोन चमचे बदाम पावडर आणि गुलाबजल मिसळा. तयार पेस्ट आपल्या खुणांवर 15 मिनिटांसाठी लावा. मग धुवा.
स्क्रब
स्क्रबच्या मदतीनेदेखील चट्टे देखील मिटविल्या जाऊ शकतात, आपण आक्रोड किंवा जर्दाळू स्क्रब वापरू शकता. जर तुम्ही या खुणांवर 10 थेंब मेहंदी आणि दोन चमचे बदाम तेल लावले तर खुणा कमी होऊ लागतील.
तेलानं मालिश
आहारात व्हिटॅमिन सी असलेल्या पोषक घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे. याशिवाय ओटीपोटात व्हिटॅमिन ई च्या तेलाची मालिश केल्यास चट्टेही दूर होतात. चट्टे काढण्यासाठी ऑलिव्ह ऑईल देखील खूप प्रभावी आहे. यासाठी आपल्याला ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब घालावे लागतील. लॅव्हेंडर तेलाने मालिश करणे फायदेशीर ठरेल.
एलोवेरा
एलोवेरा स्ट्रेच मार्क्स घालाविण्यासाठी फायदेशीर ठरतं. जेल वापरण्याच्या तुलनेत कोरफडीचा वापरणे जास्त चांगले. एलोवेरातील गर काढून घेऊन स्ट्रेच मार्क्स वर लावावा. हा गर स्ट्रेच मार्क्स वर दोन ते तीन तास लावून ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने पुसा. असे केल्याने काही महिन्यात तुमचे स्ट्रेच मार्क नाहीसे होतील.
व्हिटामीन सी
आहारात व्हिटॅमिन सी असलेल्या पोषक घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे. याशिवाय ओटीपोटात व्हिटॅमिन ई च्या तेलाची मालिश केल्यास चट्टेही दूर होतात. चट्टे काढण्यासाठी ऑलिव्ह ऑईल देखील खूप प्रभावी आहे. यासाठी आपल्याला ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब घालावे लागतील. लॅव्हेंडर तेलाने मालिश करणे फायदेशीर ठरेल.