आपण त्वचेची कितीही काळजी घेतली तरी काही भाग असे असतात. जे भाग काळपट पडायचे ते पडतातच. जसं की अनेकांना त्वचेवर डार्ग सर्कल्स येण्याची समस्या असते. (Skin Care Tips) तर काहींना पिंपल्स, तसंच ओठांच्या आजूबाजूची त्वचा काळपट पडल्याचं अनेकींच्या त्वचेवर दिसून येतं. नेहमी नेहमी पार्लरला जाऊन क्लिनअप किंवा फेशियल करणं शक्य होत नाही. अशावेळी तुम्ही घरगुती उपायांचा नियमित वापर करून त्वचेचा रंग उजळवू शकता. (How to remove tanning from face)
बटाट्याचा रस
बटाटा फक्त जेवणातच नाही सौदर्यांत भर पाडण्यासाठी महत्वाचा आहे. ओठांच्या आजूबाजूचा काळपटपणा काढून टाकण्यासाठी सगळ्यात आधी कच्चा बटाटा किसून घ्या. त्याचा रस काढा आणि तुमच्या ओठांजवळील भागावर लावा. तुम्ही कच्चा बटाटा चिरून त्याचे काप देखील या भागावर चोळू शकता. सुकल्यावर चेहरा स्वच्छ करा काही दिवसांमध्ये तुम्हाला चांगला फरक जाणवू लागेल.
चण्याच्या डाळीचं पीठ आणि हळद
दोन चमचे बेसन आणि चिमूटभर हळद एकत्र करा. गुलाबपाणी, दूध किंवा साध्या पाण्याने एक छान पेस्ट तयार करा. हे मिश्रण तुमच्या तोंडाजवळील भागावर लावा आणि पंधरा मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. २ आठवडे हा प्रयोग केल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल.
ग्लिसरिन
तोंडाजवळील भाग यामुळे काळपट झाला असेल तर तो भाग स्वच्छ करण्यासोबत त्वचा मऊ होईल याची काळजी देखील घ्यायला हवी. एक चमचा ग्लिसरिन आणि एक चमचा गुलाबपाणी एकत्र करा. हे मिश्रण हनुवटीजवळच्या काळपट भागावर लावा आणि थोडं मसाज करा. रात्री हे मिश्रण लावून झोपा आणि सकाळी चेहरा धुवून टाका. सतत एक आठवडा हा प्रयोग केल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल.
ओट्स
ओट्स फक्त ब्रेकफास्टसाठी नाही तर चांगल्या त्वचेसाठीसुद्धा फायद्याचे ठरतात. सगळ्यात आधी एक चमचा ओट्स वाटून घ्या आणि त्या पावडरमध्ये थोडं पाणी मिसळून पॅक तोंडाजवळील भागावर लावा. पंधरा मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवा.