अंडरआर्म्समध्ये आणि मानेवर काळपटपणा जाणवणं हे काही नवीन नाही पण नेहमीच त्यामुळे आपण चिंतेत असतो. स्लिव्हजलेस टॉप, ब्लाऊज घातल्यानंतर अंडरआर्म्सचा काळपटपणा खूप विचित्र वाटतो. अनेकदा वॅक्सिंग, क्रिम्सचा वापर करूनही त्वचेवर काहीच फरक पडत नाही. रेजरचा वारंवार वापर केल्यानंही त्वचा काळी पडते. सतत पार्लरला जाऊन महागड्या ट्रिटमेंट्स घेणंही परवड्यासारखं नसतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता.
बटाटा
सगळ्यांच्याच स्वयंपाकघरात बटाटा असतो. कच्चा बटाटा सौंदर्याच्या दृष्टीने महत्वाचा समजला जातो. त्यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाही फक्त एक बटाटा कापावा लागेल. त्या बटाट्याने फक्त तुम्हाला अंडरआर्म्सना चोळायचं आहे. बटाट्याचा रस थंड करून त्वचेवर लावल्याने काळपटपणा दूर होतो. रोज हा प्रयोग केल्यानं फरक दिसून येईल.
कोरफड
कोरफडीचे त्वचेला होत असलेले फायदे आपल्याला माहीत आहेत. अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये कोरफडीचा वापर केला जातो. त्यासाठी कोरफड जेल अंडरआर्म्सना लावून मसाज करा. कोरफडमध्ये विटामिन-ई भरपूर प्रमाणात असतं. कोरफडमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे हे त्वचेला योग्य तऱ्हेने हायड्रेट करतं तेही कोणत्याही चिकटपणाशिवाय. कोरफड त्वचेची इलास्टिसिटी सुधारते आणि त्यामुळे फाईन लाईन्स, सुरकुत्या, चेहऱ्यावरील डाग यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. कोरफड स्वच्छ धुवून साल काढून आतला भाग मानेला आणि काखेत लावू शकता.
संत्र्याची सालं
संत्री खाल्यानंतर सालं फेकून दिली जातात. पण घरगुती उपयांमध्ये संत्र्याच्या सालीचे खूप फायदे आहेत. 2 चमचा संत्र्याच्या सालीची पावडर घ्या आणि त्यामध्ये 2 चमचे दही मिक्स करा. याची एक पातळ पेस्ट बनवा. ही पेस्ट अंडरआर्म्ससह मानेला लावा. 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने हा भाग स्वच्छ करा. २ आठवडे हा प्रयोग केल्यास तुम्हाला चांगला फरत जाणवेल.
लिंबू
अंघोळीच्या दहा मिनिटं आधी लिंबू घेऊन ५ मिनिटं आपल्या अंडरार्म्सना चोळा. त्यानंतर स्वच्छ अंघोळ करा. अंघोळीनंतर त्या भागाला बॉडी लोशन लावा. लिंबात सायट्रिक एसिड असतं. जे तुमच्या त्वचेवरील मेलानिन कमी करून फरक जाणवण्यासाठी फायदेशीर ठरत असतं. त्यामुळे आपली त्वचा फेअर होत जाते. पण त्यासाठी सतत दोन आठवडे तुम्हाला हा उपाय करणं गरजेचं आहे.
बेसन
त्वचेचा काळपटपणा कमी करण्यासाठी दोन मोठे चमचे बेसनामध्ये गुलाब जल घालुन पातळसर पेस्ट करून घ्यावी. हे मिश्रण मानेवर अंडरआर्म्सवर लावून वीस मिनिटं ठेवावे. त्यानंतर चेहरा धुवून टाकावा. ह्या मिश्रणामुळे त्वचेतील पी एच लेव्हल संतुलित राहतात. तसेच त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेण्याचे कामही बेसन करते.
मुलतानी माती
मुलतानी मातीचे सौंदर्याच्या दृष्टीने फार महत्व आहे. तुमची त्वचा तेलकट असल्यास, तुम्ही दोन चमचे मुलतानी माती त्यात एक मोठा चमचा टॉमेटो रस, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक मोठा चमचा मध घाला. आता हा पॅक आपल्या चेहऱ्यासह मानेला, अंडरआर्म्ससाठी तुम्ही वापरू शकता. सुकल्यानंतर थंड पाण्याने धुऊन टाका.
मसूर डाळ
काळपटपणा घालवण्यासाठी मसुराची डाळ वापरू शकता. यासाठी रात्रभर मसुरची सोललेली डाळ भिजत घालून सकाळी ती वाटून घ्यावी. यात किंचित गुलाबपाणी घालून हलक्या हाताने त्वचेवर लावावी. यावेळी वरच्या बाजूने मसाज करत मानेला, इतर तेलकट भागांवर हा पॅक नीट चोळून घ्यावा. यामुळे काळपटपणा कमी होऊन चेहरा तजेलदार दिसण्यास मदत होते.