Lokmat Sakhi >Beauty > How to remove tanning from neck : चेहरा गोरा अन् मान काळपटपण पडलीये? मानेवरचं टॅनिंग झटपट घालवण्यासाठी हे घ्या सोपे घरगुती उपाय 

How to remove tanning from neck : चेहरा गोरा अन् मान काळपटपण पडलीये? मानेवरचं टॅनिंग झटपट घालवण्यासाठी हे घ्या सोपे घरगुती उपाय 

How to remove tanning from neck : मानेवर काळेपणा येण्यामागे इतरही अनेक कारणे आहेत, ज्याबद्दल लोकांना माहिती नाही. त्याचबरोबर ही समस्या वयोमानानुसार वाढतच जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 12:10 PM2022-01-11T12:10:47+5:302022-01-11T12:11:25+5:30

How to remove tanning from neck : मानेवर काळेपणा येण्यामागे इतरही अनेक कारणे आहेत, ज्याबद्दल लोकांना माहिती नाही. त्याचबरोबर ही समस्या वयोमानानुसार वाढतच जाते.

How to remove tanning from neck : Dark neck treatment and causes by expert | How to remove tanning from neck : चेहरा गोरा अन् मान काळपटपण पडलीये? मानेवरचं टॅनिंग झटपट घालवण्यासाठी हे घ्या सोपे घरगुती उपाय 

How to remove tanning from neck : चेहरा गोरा अन् मान काळपटपण पडलीये? मानेवरचं टॅनिंग झटपट घालवण्यासाठी हे घ्या सोपे घरगुती उपाय 

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी बहुतेक मुली वेगवेगळ्या प्रकारचे स्किन केअर रूटीन फॉलो करतात. महिला क्वचितच शरीराच्या इतर भागाकडे लक्ष देतात. मान हा त्या भागांपैकी एक आहे, ज्याच्या सौंदर्याकडे अनेक मुली दुर्लक्ष करतात. नियमित काळजी  न घेतल्यामुळे घाण साचते, त्यामुळे मानेवर काळेपणा येऊ लागतो. याशिवाय मानेवर काळेपणा येण्यामागे इतरही अनेक कारणे आहेत, ज्याबद्दल लोकांना माहिती नाही. त्याचबरोबर ही समस्या वयोमानानुसार वाढतच जाते. (How to remove tanning from neck) 

तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल, तर त्याचे निराकरण करण्यापूर्वी तुम्हाला त्याची कारणे समजून घेणे आवश्यक आहे.  काहीवेळा आरोग्याच्या समस्येमुळेही मान काळी पडू लागते. अलीकडेच डॉ जयश्री शरद यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. काळपट मानेमागचे कारण काय आणि ते कसे दुरुस्त करता येईल हे त्यांनी या पोस्टद्वारे सांगितले. (Skin Care Tips)

मान काळी होण्याची कारणं

अनुवांशिक समस्या

लठ्ठपणा 

इन्सुलिन प्रतिकार

PCOD समस्या

डायबिटीस 

हायपोथायरॉईडीझम 

परफ्यूम किंवा केसांच्या रंगाची ऍलर्जी

लाइकेन प्लानस पिगमेंटोसासारख्या स्थिती.

जास्त एक्सफ्लोसिएट  करू नका

जेव्हा मान काळी पडते तेव्हा स्त्रिया त्वचेला एक्सफोलिएट करू लागतात. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे करणे पुरेसे आहे, परंतु दररोज असे केल्याने त्वचेवर पुरळ किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. जास्त एक्सफोलिएट केल्यानेही मान काळी पडते.

डार्क सर्कल्समुळे चेहरा थकल्यासारखा, वयस्कर वाटतोय? 'या' उपायांनी चुटकीसरशी मिळेल काळेपणापासून सुटका

त्वचा रब करू नका

काळी मान दिसल्यानंतर महिला विविध घरगुती उपाय करू लागतात. पुन्हा पुन्हा स्क्रब करण्याशिवाय मसाजही करतात. अशा स्थितीत वारंवार चोळल्याने मान आणखी काळी पडू शकते. त्यामुळे पुन्हा पुन्हा चोळण्याची चूक करू नका.

लॅक्टिक एसिडयुक्त क्रिम  किंवा लोशनचा वापर

हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होते, अशा परिस्थितीत महिला त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी क्रीम किंवा लोशनचा वापर करतात. जर तुम्हाला मानेवरील काळपटपणा दुरुस्त करायचा असेल तर लॅक्टिक ऍसिड असलेले क्रीम किंवा लोशन वापरा.

सतत पिंपल्स येतात, काळे डागही पडतात? घरीच या पद्धतीनं हळद लावून मिळवा डागविरहीत ग्लोईंग चेहरा

सनस्क्रिनचा वापर

तोंडाच्या त्वचेशिवाय शरीराच्या इतर भागांनाही सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवण्याची गरज आहे. काळ्या मानेमागे टॅनिंग हे देखील कारण असू शकते. अशा परिस्थितीत घरातून बाहेर पडण्यापूर्वी १५ मिनिटे आधी चेहऱ्यावर तसेच मानेवर सनस्क्रीन लावायला विसरू नका. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि टॅनिंगची समस्या उद्भवणार नाही.

Web Title: How to remove tanning from neck : Dark neck treatment and causes by expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.