Join us  

How to Remove Facial Hairs : चेहऱ्यावरचे नको असलेले केस विचित्र दिसतात? 'हे' घरगुती उपाय देतील केसविरहीत ग्लोईंग स्किन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 1:34 PM

How to Remove Unwanted Facial Hairs : चेहऱ्यावरील केस काढण्याचे हे उपाय खूप सोपे आहेत आणि त्वचेला हानी पोहचवत नाहीत.

ठळक मुद्देएकदा काढल्यानंतर पुन्हा पुन्हा ते केस काढावे लागतात अन्यथा चेहरा चांगला दिसत नाही. कधी कधी रेजरचा वापर केल्यानंतर उगवणारे केस खूप जाड असतात.

महिला असो किंवा पुरुष, प्रत्येकाच्या अंगावर केस येतात. महिलांचे केस अगदी हलके आणि पातळ असतात. जे सहजपणे पाहिले जाऊ शकत नाहीत. पण काही लोकांना हे केस काढून त्वचा पूर्णपणे गुळगुळीत करायची असते. ज्यासाठी ते थ्रेडिंग किंवा शेव्हिंगची मदत घेतात. हे केस निघून गेल्यानंतर त्वचेवर वेगळी चमक दिसून येते. पण जसजसे केस पुन्हा येऊ लागतात चेहरा विचित्र दिसू लागतो. 

पार्लरला जायला वेळ नसेल तर कित्येक दिवस चेहरा असाच राहतो. एकदा काढल्यानंतर पुन्हा पुन्हा ते केस काढावे लागतात अन्यथा चेहरा चांगला दिसत नाही. कधी कधी रेजरचा वापर केल्यानंतर उगवणारे केस खूप जाड असतात.  चेहऱ्यावरील अनावश्यक केसांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही 3 घरगुती (Skin Care Tips) उपाय वापरू शकता. (How to Remove Unwanted Facial Hairs ) चेहऱ्यावरील केस काढण्याचे हे उपाय खूप सोपे आहेत आणि त्वचेला हानी पोहचवत नाहीत.

फेशियल केस कसे काढावेत?

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी किंवा लपवण्यासाठी, थ्रेडिंग, शेव्हिंग आणि ब्लीचिंगऐवजी खालील उपाय करा.

१) लिंबू आणि साखर

नको असलेले केस काढण्यासाठी 500 ग्रॅम साखर घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिसळा. दोन्ही गोष्टी एकत्र करा आणि साखरेचा पाक जाड होईपर्यंत गॅसवर गरम करा. यानंतर, हे मिश्रण गॅसवरून काढून घ्या आणि ग्लिसरीन घाला. आता हे मिश्रण मेणासारखे बनेल. चेहऱ्याच्या नको असलेल्या केसांवर हे होममेड मेण लावा आणि वॅक्सिंग स्ट्रिप्सच्या मदतीने ते काढा. केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने या स्ट्रिप्स खेचा.

२) मूग डाळ आणि संत्र्याचं साल

चेहऱ्यावरील केस काढून टाकण्याच्या या पद्धतीमध्ये तुम्ही हिरव्या मूग डाळीची पावडर घ्या आणि त्यात संत्र्याच्या साल पावडर, चंदन पावडर, लिंबाचा रस आणि गुलाबपाणी चांगले मिसळा. ही पेस्ट चेहऱ्याच्या नको असलेल्या केसांवर सुमारे 15 मिनिटे सोडा आणि जेव्हा ती सुकेल तेव्हा ती पेस्ट बोटांच्या मदतीने गोलाकार हालचालीत चोळून काढून टाका.

३) बेसन आणि दूध

घरी चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी दुधात बेसन मिसळा आणि जाड पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांवर लावा. पेस्ट सुकल्यानंतर त्या भागावर हलक्या हाताने गोलाकार फिरवत मसाज करा. अनावश्यक केस काढण्यासाठी ही पद्धत अत्यंत सोपी आहे.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी