Join us  

'या' कारणांमुळे काखेत येऊ शकतात गाठी; इन्फेक्शन टाळण्यासाठी वेळीच जाणून घ्या लक्षणांसह उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 5:16 PM

How to stay away from skin infection : जर तुम्हाला काखेत कोणत्याही प्रकारच्या पुळ्या किंवा खाज येत नसेल याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःच्या शरीराला व्यवस्थित स्वच्छ ठेवता.

ठळक मुद्देआर्मप‍िट लम्‍प म्हणजे  बगलातील एक गाठ. रक्तवाहिन्या आणि लहान त्वचेच्या पेशी एकत्रितपणे गाठी  तयार करतात.

काखेत गाठी, पुळ्या येणं  हे सामान्य आहे. कारण कित्येक तास काखेत घमा झालेला असतो. पण अनेकदा याच गाठी इन्फेक्शनचं कारण ठरू शकतात. फंगल, बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे जखम वाढण्याचा धोका असतो. अनेकदा काखेतले केस काढत असताना रेजर वापरताना या पुळ्या, गाठी (armpit lump) निघून जातात. परिणामी हातांमध्ये वेदनाही होऊ शकते. काही दिवसांनी बरं वाटू लागतं. पण थोड्या दिवसांनी पुन्हा त्या ठिकाणी गाठी येत असतील तर तुम्ही डॉक्टरांना दाखवायलाच हवं. याबाबत वरिष्ठ कंसलटेंट डर्मेटोलॉज‍िस्‍ट डॉ देवेश मिश्रा यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. 

काखेत येणारी गाठ किंवा आर्मपीट नक्की काय असते? (What is armpit lump)

आर्मप‍िट लम्‍प म्हणजे  बगलातील एक गाठ. रक्तवाहिन्या आणि लहान त्वचेच्या पेशी एकत्रितपणे गाठी  तयार करतात.  हे कोणत्याही ठिकाणी होऊ शकते, परंतु काखेतील असल्यास त्याला आर्मपिट लम्प म्हणतात. तेव्हा सूजेमुळे त्वचा लाल होते आणि आतून त्वचा फुगलेली दिसते.

आर्मपिट लम्पची लक्षणं  काय आहेत? (Symptoms of armpit lump)

जर तुम्हाला काखेत कोणत्याही प्रकारच्या पुळ्या किंवा खाज येत नसेल याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःच्या शरीराला व्यवस्थित स्वच्छ ठेवता. जर तुम्हाला आर्म्समध्ये काही वेगळंपण जाणवत असेल तर या लक्षणांनी आर्मपिट लम्प आहे की नाही हे ओळखा येऊ शकतं. 

१) काखेत वेदना होणं, सूज येणं

२) काखेची त्वचा आतून गोल, मांस फुगलेलं दिसणं

३) आर्मपिट उद्भवल्यास अनेकांना तापही येतो. 

४) आर्मप‍िट असल्यास गोल गाठी येतात. या गाठी आकारानं लहान किंवा मोठ्याही असू शकतात. 

५) आर्मपिट गाठ झाल्यास तुम्हाला वेदनेसह जळजळीचाही सामना करावा लागू शकतो. 

कारणं

१) बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे या गाठी येऊ शकतात. 

२) वैयक्तीक स्वच्छता न ठेवणं 

३) रेजरनं केस काढल्यानंतरही बारीक बारीक गाठी येऊ शकतात.

४) सिस्ट इन्फेक्सनमुळे पस तयार होऊ शकतो, त्यानंतर गाठ येते.

५) डिओ, साबणाच्या एलर्जीमुळेही पुळ्या येऊ शकतात.

६) व्हायरल किंवा फंगल इन्फेक्शनमुळे आर्मपिट गाठी तयार  होऊ शकतात. 

आर्मपिट गाठी झाल्यानंतर काय करायचं 

आयुर्वेदिक डॉक्टर गाठ झाल्यानंतर हळद लावण्याचा सल्ला देतात. कोमट पाण्यात हळद एकत्र करून त्यांची पेस्ट तयार करून काखेत लावता येऊ शकते. या उपायानं तुम्हाला आराम मिळू शकतो. कमी तीव्रतेच्या गाठी असती तर त्या आपोआप ठीक होतात पण गाठ जास्त मोठी असेल तर डॉक्टर एंटी बॅक्टेरिअल औषधं देतात.

ही समस्या उद्भवल्यास डॉक्टरांकडून पेनक‍िलर, क्रीम या वॉर्म कंप्रेसर किंवा हिट पॅकचा वापर करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. गाठ दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत असेल तर तुम्ही त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. वेळेवर उपचार घेतल्यास आजार वाढण्यापासून रोखता येऊ शकतं. औषधांशिवाय डॉक्टरांकडून सीबीसी टेस्‍ट, बायोप्‍सी, मेमोग्राम या चाचण्या करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. 

बचावाचे उपाय

१) काखेत गाठी होऊ नयेत यासाठी वैयक्तिक स्वच्छता ठेवायला हवी.

२) उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला जास्त घाम येत असेल तर तुम्ही दोनवेळा अंघोळ करू शकता.

३) घाम जास्त आल्यानं इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं. म्हणून स्वच्छ, रोजच्यारोज धुतले जाणारे कपडे वापरा.

४) काखेत जास्त प्रमाणात परफ्यूम किंवा डिओ लावू नका. यातील केमिकल्स गाठींचे कारण ठरू शकते.

५) अंघोळ करताना आर्मपीट साफ करा. घाणेरडेपणामुळे बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. 

६) एलर्जी होत असेल तर साबण बदलून पाहायला हवा. 

७) गरज नसल्यास काखेत रेजर फिरवू नका, वारंवार रेजर फिरवल्यानंही गाठी येऊ शकतात. 

८) केस काढून टाकण्यासाठी ट्रिमरचा वापर करू शकता. रेजर किंवा कात्री वापरत असाल तर स्वच्छ असेल याची खात्री करून घ्या.

९) जोपर्यंत आर्मपीटच्या गाठी बऱ्या होत नाही तोपर्यंत लूज आणि कॉटनचे कपडे घाला.  

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यब्यूटी टिप्स