Lokmat Sakhi >Beauty > How to stop aging naturally : चेहऱ्यावरील म्हातारपणाच्या खूणा घालवण्यासाठी खास आयुर्वेदिक लेप; वयापेक्षा १५ वर्षांनी लहान दिसाल

How to stop aging naturally : चेहऱ्यावरील म्हातारपणाच्या खूणा घालवण्यासाठी खास आयुर्वेदिक लेप; वयापेक्षा १५ वर्षांनी लहान दिसाल

How to stop aging naturally : तुम्ही बाजारातून आणलेल्या अँटी-एजिंग प्रोडक्ट्समध्ये भरपूर केमिकल्स वापरलेले असू शकतात. ते तुमची त्वचा बाहेरून चकाकणारी दाखवतात पण तुमच्या त्वचेची स्थिती आतून खराब करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 05:00 PM2021-12-17T17:00:15+5:302021-12-17T17:29:34+5:30

How to stop aging naturally : तुम्ही बाजारातून आणलेल्या अँटी-एजिंग प्रोडक्ट्समध्ये भरपूर केमिकल्स वापरलेले असू शकतात. ते तुमची त्वचा बाहेरून चकाकणारी दाखवतात पण तुमच्या त्वचेची स्थिती आतून खराब करतात.

How to stop aging naturally : Ayurvedic anti ageing face pack recipe use lal chandan kasturi manjal and rose petal powder with honey | How to stop aging naturally : चेहऱ्यावरील म्हातारपणाच्या खूणा घालवण्यासाठी खास आयुर्वेदिक लेप; वयापेक्षा १५ वर्षांनी लहान दिसाल

How to stop aging naturally : चेहऱ्यावरील म्हातारपणाच्या खूणा घालवण्यासाठी खास आयुर्वेदिक लेप; वयापेक्षा १५ वर्षांनी लहान दिसाल

आपण सर्वजण अँटी एजिंग स्किन (Anti ageing) केअर उत्पादने वापरतो. विशेषत: वयाच्या 25 वर्षानंतर तरुणांना या उत्पादनांची गरज भासू लागते. कारण कामानिमित्त बाहेर गेल्याने सूर्यप्रकाश, प्रदूषणामुळे त्वचा खराब होऊ लागते. कामाचा ताण त्वचेचं आतून नुकसान करतो. अशा वेळी वयाचा प्रभाव वेळेआधीच चेहऱ्यावर दिसू लागतो.
तुम्ही बाजारातून आणलेल्या अँटी-एजिंग प्रोडक्ट्समध्ये भरपूर केमिकल्स वापरलेले असू शकतात. ते तुमची त्वचा बाहेरून चकाकणारी दाखवतात पण तुमच्या त्वचेची स्थिती आतून खराब करतात. अशा स्थितीत, आपल्याला असे काही फेस पॅक आणि घटक हवे आहेत जे आपली त्वचा चमकदार आणि सुंदर बनवतील, तसेच तिच्या आरोग्याची काळजी घेतील. जेणेकरून तुम्हाला त्वचेशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागणार नाही. (How to stop aging naturally )

ब्युटी गुरू वसुधा राय यांनी काही दिवसांपूर्वी फेसपॅक लावलेला स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये त्यांनी सांगितले की त्यांच्या चेहऱ्यावर लावलेला पॅक हा आयुर्वेदिक पेस्ट आहे, ज्यामध्ये ते घटक वापरले गेले होते, जे एंटी एजिंग गुणधर्मांनी समृद्ध आहेत. 

कसा बनवायचा हा एंट एजिंग पॅक

या गोष्टींचा वापर चेहऱ्यावरील वृद्धत्वाचा प्रभाव थांबवत असलेल्या आयुर्वेदिक पेस्ट बनवण्यासाठी केला जातो. लाल चंदन, कस्तुरी मंजल, मध, गुलाबाच्या पाकळ्याची पावडर. या सर्व गोष्टी तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहज मिळतील. 

 फायदे

लाल चंदन हे वृद्धत्व विरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. हे त्वचेत खोलवर काम करते आणि वृद्धत्वाची सर्व चिन्हे काढून टाकण्याचे काम करते. त्वचा घट्ट करते, त्वचेची चमक आणि गोरेपणा वाढवते. लाल चंदन हे एक नैसर्गिक औषध आहे, जे आयुर्वेदिक औषधात देखील वापरले जाते.

कस्तुरी मंजलला वन हळदी असेही म्हणतात. हे हळदीचे एक रूप आहे, जे नैसर्गिकरित्या वृद्धत्व विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. ही हळद आणि तिची पावडर तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात सहज मिळेल. तुम्ही ते ऑनलाइनही ऑर्डर करू शकता.

कस्तुरी मंजल हे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्मांनी समृद्ध आहे. हेच कारण आहे की जेव्हा तुम्ही त्याची पेस्ट तुमच्या त्वचेवर लावता तेव्हा ते तुमची त्वचा निरोगी राहून चमक वाढते. लाल चंदन, कस्तुरी मंजल, गुलाबाच्या पाकळ्या आणि मध या सर्व गोष्टी तुमची त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि निरोगी बनवतात. जेव्हा तुम्ही ही आयुर्वेदिक पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आठवड्यातून किमान दोनदा नियमितपणे लावाल, तेव्हा अवघ्या ४ आठवड्यांत तुम्हाला तुमच्या त्वचेवर नवी चमक दिसून येईल. 

Web Title: How to stop aging naturally : Ayurvedic anti ageing face pack recipe use lal chandan kasturi manjal and rose petal powder with honey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.