Lokmat Sakhi >Beauty > How Stop Gray Hairs Naturally : पांढरे केस कमीच होत नाहीयेत? ३ घरगुती उपाय, म्हातारे होईपर्यंत केस राहतील काळेभोर

How Stop Gray Hairs Naturally : पांढरे केस कमीच होत नाहीयेत? ३ घरगुती उपाय, म्हातारे होईपर्यंत केस राहतील काळेभोर

How Stop Gray Hairs Naturally : केस काळे करण्यासाठी तुम्ही ब्लॅक टी आणि कॉफी वापरू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 11:35 AM2022-05-26T11:35:32+5:302022-05-26T12:02:08+5:30

How Stop Gray Hairs Naturally : केस काळे करण्यासाठी तुम्ही ब्लॅक टी आणि कॉफी वापरू शकता.

How Stop Gray Hairs Naturally : Tips to get rid of the problem of white hair problem solution | How Stop Gray Hairs Naturally : पांढरे केस कमीच होत नाहीयेत? ३ घरगुती उपाय, म्हातारे होईपर्यंत केस राहतील काळेभोर

How Stop Gray Hairs Naturally : पांढरे केस कमीच होत नाहीयेत? ३ घरगुती उपाय, म्हातारे होईपर्यंत केस राहतील काळेभोर

वाढते प्रदूषण आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल लोकांचे केस कमी वयात पांढरे होऊ लागले आहेत. अशा स्थितीत लोक पांढरे केस लपवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधतात. काही लोक केसांचा रंगही वापरतात. पण  हेअर डाई वापरल्याने केस खराब होतात. (How Stop Gray Hairs Naturally) कारण यामध्ये अनेक प्रकारची रसायने वापरली जातात. अशा स्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्हाला पांढरे केस काळे करण्याचे उपाय सांगणार आहोत. (Tips to get rid of the problem of white hair problem solution)

1) ब्लॅक टी आणि कॉफी वापरा (Black Tea And Coffee)

केस काळे करण्यासाठी तुम्ही ब्लॅक टी आणि कॉफी वापरू शकता. यासाठी तुम्ही ३ चमचे कॉफी बीन्स घ्या, आता ते चांगले बारीक करा. आता बीन्स ३ कप पाण्यात उकळा. यानंतर त्यात तीन ब्लॅक टी बॅग्स टाका. यानंतर पाण्याला चांगली उकळी आल्यावर थोडा वेळ थंड करा. यानंतर ब्रशच्या मदतीने हे मिश्रण केसांना लावा. आता ते तासभर केसांवर राहू द्या. आणि आता आपले केस धुवा. असे केल्याने केस पांढरे होण्याची समस्या दूर होईल.

2) काळा चहा आणि तुळस (Black Tea and Basil)

पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुळस आणि काळ्या चहाचाही वापर करू शकता. यासाठी एक कप पाण्यात 5 चमचे ब्लॅक टी टाका. आता त्यात ५ तुळशीची पाने टाका आणि चांगले उकळा, पाण्याला उकळी आल्यावर त्यात काही थेंब लिंबाचा रस घाला. आता ही पेस्ट केसांना लावा. असे केल्याने तुमचे केस पांढरे होणे थांबेल.

3) ब्लॅक टी (Black Tea)

पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही ब्लॅक टी वापरू शकता. या चहामध्ये भरपूर टॅनिक अॅसिड असते जे तुमचे केस काळे करण्याचे काम करते. ते लावण्यासाठी तुम्ही २ कप पाणी घ्या. त्यात ५ ते ६ चमचे चहाची पाने टाका. आता हे पाणी चांगले उकळून घ्या, त्यानंतर अर्धा तास या पाण्यात केस भिजवा, नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. हा प्रयोग आठवड्यातून 4 वेळा करू शकता.अशा प्रकारे तुम्ही पांढरे केसांच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
 

Web Title: How Stop Gray Hairs Naturally : Tips to get rid of the problem of white hair problem solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.