Lokmat Sakhi >Beauty > How to Stop Hair Fall : खरंच कंडिशनर लावल्यानं केस खूप गळतात? काय आहे तथ्य, लावण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा

How to Stop Hair Fall : खरंच कंडिशनर लावल्यानं केस खूप गळतात? काय आहे तथ्य, लावण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा

How to Stop Hair Fall : कंडिशनरमुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो. केसांची चमक वाढते, केसांचे पोषण होते आणि केस गळणेही कमी होते. यासाठीच जाणून घ्या केसांना कंडिशनर कसं लावायचं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 01:19 PM2021-12-08T13:19:11+5:302021-12-08T13:27:43+5:30

How to Stop Hair Fall : कंडिशनरमुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो. केसांची चमक वाढते, केसांचे पोषण होते आणि केस गळणेही कमी होते. यासाठीच जाणून घ्या केसांना कंडिशनर कसं लावायचं

How to Stop Hair Fall : Conditioner is good or bad for hair fack check | How to Stop Hair Fall : खरंच कंडिशनर लावल्यानं केस खूप गळतात? काय आहे तथ्य, लावण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा

How to Stop Hair Fall : खरंच कंडिशनर लावल्यानं केस खूप गळतात? काय आहे तथ्य, लावण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा

केस गळण्याची समस्या सध्या कॉमन असून सर्वाधिक महिलांना जाणवते. केस गळायला सुरूवात झाली की घरगुती उपाय करणं, अनेकदा शॅम्पू बदलणं, तेल बदलणं सुरू होतं. काहीवेळा शॅम्पू बदलल्यानंतर केस आधीपेक्षा जास्त गळू लागतात. केस चमकदार, दाट मऊ असावे असं प्रत्येकाला वाटत असतं. (How to Stop Hair Fall)  पण त्यासाठी केसांची योग्य काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे.

शॅम्पू विथ कंडीशनरचा वापर अनेकजणी केसांची काळजी घेण्यासाठी करतात. कंडीशनर लावल्यानंतर केस गळतात अशी  तक्रार काहींजण करतात.  नेहमी केसांना कंडिशनर लावणं योग्य आहे की अयोग्य याबाबत अनेक मतं दिसून येतात. म्हणूनच केसांना कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत कोणती ते सांगणार आहोत.  (How to use conditioner)

केसांना  पोषण मिळावं कोरडे राहू नयेत यासाठी कंडिशनर लावण्याची शिफारस केली जाते. अनेकदा शॅम्पूच्या वापरानं केस कोरडे पडून तुटतात. केसांमध्ये गुंता होऊ नये सहज विंचरता यावेत यासाठी लोक कंडिशनर लावतात. पण मात्र कंडिशनर तुम्ही किती प्रमाणात, कसं लावता हे खूप महत्त्वाचे आहे. कंडिशनरमुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो. केसांची चमक वाढते, केसांना पोषण मिळते आणि केस गळणेही कमी होते. यासाठीच जाणून घ्या केसांना कंडिशनर कसं लावायचं

कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत

केसांना कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत  वापरल्यास होणारं नुकसान टाळता येऊ शकतं. केस धुतल्यावर आधी केसांमधील पाणी स्वच्छ करावे.

हाताने तुम्ही केसांमधील पाणी निथळू शकता. त्यानंतर केस कंगव्याने विंचरून घ्या,  कंडिशनर हातावर घेऊन ते पाणी घालून थोडे डायल्यूट करा आणि मग केसांना लावा.

स्काल्पला कंडीशनर लागू देऊ नका. नंतर ५ ते १० मिनिटांनी  केस पुन्हा पाण्यानं स्वच्छ करा. नंतर केसांना पुन्हा शॅम्पू लावू नका. घरी कंडिशनर नसेल तर तुम्ही  लिंबू, दही, दूध, कोरफडीचा गर यांचा वापर करून केस स्वच्छ करू शकता. 

Web Title: How to Stop Hair Fall : Conditioner is good or bad for hair fack check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.