ऐरवी केसांचा बन किंवा साधी रोजची हेअरस्टाईल करत असलो तरी सणासुदीला केस मोकळे ठेवावेत काहीतरी नवीन हेअरस्टाईल करायला हवी असं सगळ्यांनाच वाटतं. पण केसातला कोंडा, गळणारे केस यामुळे काही नवीन करण्याचा उत्साह फारसा राहत नाही. केसांचं गळणं तुम्ही २ आठवड्यात ९० टक्क्यांपर्यंत कमी करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही घरगुती उपाय वापरावे लागतील. म्हणजेच केसांना केमिकल फ्री उपचार मिळतील आणि जास्त पैसेही खर्च करावे लागणार नाहीत. या ३ घरगुती उपयांनी तुम्ही गळणारे केस रोखू शकता.
१) नारळाचं दूध
नारळाचं दूध केसांना लावल्यानं केस गळणं थांबवता येतं. जर तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केला तर एकाच आठवड्यात तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल. केसांमध्ये नारळाचे दूध लावण्यासाठी, अर्धा कप नारळाचे दूध घ्या आणि 1 चमचे मध घालून चांगले मिसळा. आता हे मिश्रण केसांमध्ये लावा आणि अर्ध्या तासानंतर केस हर्बल शॅम्पूने धुवा. तुमचे केस गळणे पूर्णपणे थांबेल आणि केसांची वाढ देखील दुप्पट वेगाने वाढेल. अचानक निपल्स दुखतात, तर कधी खाज येते? सांगता न येणारा हा त्रास टाळण्यासाठी हे घ्या उपाय
२) रात्री झोपण्याआधी हा उपाय करा
कोरफडीचा रस रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर लावा. डोक्यावर तेल लावल्याप्रमाणे हा रस केसांवर लावा. हा रस केसांच्या मुळांमध्ये लावा. खूप हलक्या हातानं सौम्यपणे मसाज करा. केसांना लावलेला हा रस 10 ते 15 मिनिटात सुकतो. त्यानंतर तुम्ही झोपायला जा आणि सकाळी उठून शॅम्पू करा.
आपण ही पद्धत आठवड्यातून 3 वेळा वापरता येईल. जेव्हा आपण पहिल्यांदा ही पद्धत वापरता तेव्हा आपले केस शॅम्पूने धुवा. एका दिवसानंतर, जेव्हा तुम्ही ते पुन्हा वापरता, तेव्हा फक्त तुमचे केस स्वच्छ पाण्याने धुवा आणि शॅम्पू लावू नका. नंतर एका दिवसानंतर जेव्हा तुम्ही त्याचा वापर कराल तेव्हा शॅम्पू लावा. या प्रक्रियेचा अवलंब केल्याने तुमचे केस गळणे एका आठवड्यात थांबेल. डायबिटीक रुग्णांसाठी गुणकारी पनीरचं फूल; शुगर लेव्हल कंट्रोल करण्याचा रामबाण उपाय
शॅम्पू लावण्याच्या १५ मिनिटं आधी हा उपाय करा
केस धुण्याच्या 15 मिनिटांपूर्वी तुमच्या टाळूवर कांद्याचा रस लावा. हा रस केसांच्या मुळांवर आणि सर्व केसांवर अशा प्रकारे लावावा की केस ओले होतील. त्यानंतर 15 मिनिटांनी आपले केस सौम्य शॅम्पूने धुवा. तुमच्या केसांवर या उपायाचा परिणाम तुम्हाला पहिल्यांदाच दिसेल. जर केस खूप पडत असतील आणि ते खूप पातळ असतील तर तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनदा करणे आवश्यक आहे. एक ते दोन आठवड्यांत तुमचे केस गळणे 90 टक्क्यांपर्यंत थांबेल. रोजचा डाळ भात अधिक चवदार, चविष्ट लागेल; फक्त 'या' ५ टिप्स वापरून फोडणी द्या