केसांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांचा वापर केला जातो. कितीही हेअर केअर उत्पादनं वापरले तरी हवा तसा इफेक्ट दिसून येत नाही. आज आम्ही तुम्हाला काही हर्बल तेलांबाबत सांगणार आहोत. विशेष म्हणजे या तेलांच्या वापरासाठी तुम्हाला कोणतंही खास काम करावं लागणार नाही. फक्त तीन प्रकारचे तेल एकत्र करून एक नवीन इफेक्टिव्ह तेल बनवायचे आहे. (Rosemary Oil To Promote Hair Growth). एरंडेल तेल, नारळाचं तेल आणि रोजमेरी तेलाची आवश्यकता तुम्हाला असणार आहे. हे तिन्ही प्रकार तुम्हाला कॉस्मेटिस्क शॉप किंवा ग्रोसरी स्टोअर्समध्ये सहज उपलब्ध होतील किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागवू शकता.
फुड ग्रेडचे असावे नारळाचे तेल
केसांना योग्य आणि आवश्यक पोषण दिले पाहिजे. जेणेकरून केस जलद वाढतात आणि निरोगी देखील दिसतात. आपण केसांच्या वाढीस उत्तेजन देण्यासाठी वापरलेले नारळ तेल ते फूड ग्रेडचे असल्यास अधिक चांगले कार्य करेल. यासाठी आपण किराणा दुकानातून किंवा जेवणाच्या सामानाच्या स्टोअरमधून नारळ तेल विकत घेऊ शकता. मसाज करण्यासाठी तुम्हाला तिन्ही प्रकारची तेलं एकत्र करावी लागतील. १ चमचा नारळाचं तेल, १ चमचा एरंडेल तेल, ५ चमचे रोज मेरी तेल एकत्र करा. हे तिन्ही तेलं मिसळा आणि केसांच्या मुळांवर चांगले मालिश करा. आपल्या केसांनुसार हे तेल कमी पडले तर त्याचे प्रमाण लक्षात घेऊन आपण तेल दुप्पटही बनवू शकता.
आपणास पाहिजे असल्यास, तिन्ही तेलांचे प्रमाण लक्षात घेऊन असे मिश्रण तयार करा की आपण ते एका महिन्यासाठी वापरू शकता. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा आवश्यक प्रमाणात तेल काढून केसांची मालिश करा. मुळांपासून शेवटपर्यंत केसांवर तेल चांगले लावा. रात्री या तेलाने मालिश करा आणि झोपायला जा आणि दुसर्या दिवशी सकाळी स्वच्छ शॅम्पू आणि कंडिशनरनं केस धुवा. आठवड्यातून कमीतकमी दोनदा हे तेल वापरणे आवश्यक आहे. आपण त्वरीत केसांची वाढ होण्यासाठी केस गळती कमी होण्यासाठी हे तेल फायदेशीर ठरेल.
फायदे
१) हे तेल केसांना लावल्यानं ते थेट केसांच्या मुळापर्यंत जातं. यामुळे केसांच्या मुळांजवळील स्कॅल्पवर मॉइश्चर(डोक्याची त्वचा) टिकून राहण्यास मदत होते. ज्यामुळे केस आणि स्कॅल्पचे आरोग्य चांगले राहते.
२) जर तुमची डोक्याची त्वचा फार ड्राय असेल तर, या प्रकारच्या तेलानं मालिश करणं फायदेशीर ठरतं. ज्या व्यक्ती जास्तीतजास्त वेळ घरातून बाहेर राहतात किंवा सतत उन्हात काम करतात त्यांच्यासाठी कोमट तेलानं मालिश करणं फायदेशीर ठरतं.
३) तेलानं मालिश केल्यानं केस गळणं कमी होते. मालिश करताना केस थेट मुळांजवळ गेल्यानं केसांची मुळं मजबूत होण्यास मदत होते. याशिवाय ब्लड फ्लो नीट राहतो. त्यामुळे केसांची वाढ झपाट्याने होते.