Join us  

How to stop hair loss : केस गळून गळून खूप पातळ झालेत? दाट, काळ्याभोर, केसांसाठी जावेद हबीबनं सांगितले दोन घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 5:18 PM

How to stop hair loss :आपले गळणारे केस पाहून लोक दु:खी होतात. हेअर ट्रांसप्लांटसारख्या ट्रिटमेंट्स घ्यायला सगळ्यांकडेच पैसे असतात असं नाही. पण कमी पैशात या समस्येवर उपचार कसे करावे हे बहुतेक लोकांना समजत नाही.

एकेकाळी टक्कल पडणे (hair loss)  ही फक्त पुरुषांची समस्या मानली जात होती. मात्र आता महिलांमध्येही  याचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे.मात्र , ही समस्या केवळ आपल्या देशाची  नाही. उलट जगभरातील लोक टक्कल पडण्याने त्रस्त आहेत. त्यामुळे टक्कल पडण्याची सुरुवातीची लक्षणे दिसू लागल्यावरच त्याबाबत गंभीर व्हायला हवे. जेणेकरून वेळेत केसांची योग्य काळजी घेता येईल आणि टक्कल पडणे टाळता येईल. आपले गळणारे केस पाहून लोक दु:खी होतात. हेअर ट्रांसप्लांटसारख्या ट्रिटमेंट्स घ्यायला सगळ्यांकडेच पैसे असतात असं नाही. पण कमी पैशात या समस्येवर उपचार कसे करावे हे बहुतेक लोकांना समजत नाही. (How to get rid of hair fall)

भारतीयांना जाणवणारी ही केस गळतीची समस्या लक्षात घेऊन हेअर एक्सपर्ट्स जावेद हबीब (Jawed habib hair care tips) यांनी  एक सोपा घरगुती उपाय सुचवला आहे, ज्याचे गुणधर्म आपल्याला आयुर्वेदातही सापडतात. किचनमध्ये वापरल्या जाणार्‍या साध्या गोष्टी घेऊन तुम्ही तुमचे केस गळणे नियंत्रित करू शकता. लसूण आणि कांदा  एकत्र मिसळून हे एक अतिशय खास तेल तयार केले जाते.

1) सगळ्यात आधी कांदा सोलून किसून घ्या. वाटल्यास कांदा मिक्सरमध्ये बारीक करून चाळून घ्या, तरी त्याचा रस सहज बाहेर येईल. आता एका लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घ्या आणि त्या सोलून घ्या आणि बारीक करा किंवा किसून घ्या जेणेकरून त्यांचा रस वापरता येईल. आता एका भांड्यात कांदा, लसूण रस एकत्र करा आणि वर एक चमचा खोबरेल तेल मिसळा. या तीन गोष्टींचे मिश्रण केसांच्या मुळांमध्ये लावावे लागते. केसांच्या मुळांमध्ये चांगल्या प्रकारे  हे तेल लावलं जाण्यासाठी ब्रशचा वापर करू शकता. 

२) हे मिश्रण डोक्यावर केसांच्या मुळांना लावल्यानंतर, तुम्ही तुमच्या केसांच्या मुळांना हलक्या हातांनी क्लॉक वाईज आणि एंटी क्लॉक वाईज मसाज करा. एकूण 4 ते 5 मिनिटे मसाज केल्यानंतर केसांना 10 मिनिटे असेच राहू द्या आणि नंतर शॅम्पू करा. जावेद म्हणतात की, या उपायानं तुम्हाला टक्कल पडणार नाही याची मी खात्री देत ​​नाही. पण यानं तुम्हाला फरक जाणवेल इतकं नक्की. 

कारणं

टक्कल पडण्याची वेगवेगळी कारणे आहेत आणि प्रत्येक कारण फक्त लसूण-कांद्याने दूर होऊ शकत नाही. लसूण आणि कांद्याचा रस केसांना मजबूत करण्याचे काम करतो. जर एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार किंवा वैद्यकीय समस्या असेल, ज्यामुळे त्याचे केस खूप गळत असतील तर त्याला या मिश्रणासह औषधांची देखील आवश्यकता असेल. या उपायानं तुम्हाला बाह्य काळजी आणि पोषण मिळेल, पण अनेकदा औषधे शरीरात गेल्यानंतर केस मजबूत होतात. केवळ डॉक्टरच त्यावर उपचार करू शकतात.

वैद्यकीय शास्त्रानुसार, लसणात असे अनेक गुणधर्म असतात, जे केस तुटणे, पिकणे आणि कमकुवत होण्यास प्रतिबंध करतात. त्यामुळे केसांची लांबीही लवकर वाढते. उदाहरणार्थ, लसणात अल्कलॉइड्स, सल्फर सामग्री आणि अँटिऑक्सिडंट असतात. अल्कलॉइड्स केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात तर सल्फरचे प्रमाण केसांची लांबी वाढवण्यास मदत करते. त्याच वेळी, अँटी-ऑक्सिडंट केस मजबूत, निरोगी आणि जाड राहण्यास मदत करतात. कांद्यामध्ये सल्फर आणि पोटॅशियम देखील चांगल्या प्रमाणात आढळते. हे दोन्ही घटक केसांच्या मुळांपर्यंत जाऊन केसांच्या वाढीस चालना देतात.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स