केसांवर आजकाल प्रत्येकजण नवनवीन प्रयोग करून पाहतो. (Hair Care Tips) आपले केस सुंदर लांबसडक दिसावेत असं प्रत्येकालाच वाटतं. केस चांगले दिसण्यासाठी स्ट्रेटिनिंग, स्मूथनिंग, ग्लोबल कलर असं खूप काय काय लोक करून पाहत असतात. ताण-तणाव, प्रदुषणापामुळे केस फार गळतात. केस गळणं कमी करण्यासाठी मुली पार्लरला जाऊन केराटिन ट्रिटमेंट करून घेतात. (How to do keratin treatment at home)
केराटीन ट्रिटमेंटसाठी जवळपास ३ ते ५ हजार रुपये लागतात. या ट्रिटमेंटमुळे केस रिपेअर होण्यास आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. (How do I do a keratin treatment on my hair naturally) पण इतका खर्च करूनही काही जणींना हवातसा बदल केसांमध्ये जाणवत नाही. अशावेळी काही घरगुती उपाय तुम्हाला मदत करू शकतात. घरच्याघरी केराटिन कसं करायचे ते समजून घेऊया. (How to Apply a Keratin Treatment)
घरच्याघरी केराटीन ट्रिटमेंट करण्यासाठी तुम्हाला तांदूळ, पाणी आणि ऑलिव्ह ऑईल असे तीन पदार्थ लागतील. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होईल. तुम्ही साध्या पाण्याऐवजी नारळ पाण्याचा वापरही करू शकता. सगळ्यात आधी भात मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यात पाणी घाला आणि बारीक पेस्ट तयार झाल्यानंतर ऑलिव्ह ऑईल घालून केसांना लावा. त्यानंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या.