केसांना एलोवेरा (Aloe Vera) जेल खूप जण लावतात पण एलोवेरा जेल लावण्याची योग्य पद्धत सर्वांनाच माहित असते असं नाही. केसांना त्वचेप्रमाणेच एलोवेरा लावण्याचे बरेच फायदे आहेत. केस गळणं, त्वचेच्या संबंधित समस्या टाळण्यासाठी एलोवेरा जेल फायद्याचे ठरते. (Hair Care Tips) केसांना पोषण देण्यासह एलोवेरा जेल केसांचे कंडीशनिंग करते. काहीजण ओल्या केसांना एलोवेरा लावतात तर काहीजण कोरड्या केसांना एलोवेरा लावतात. एलोवेरा एक असा पदार्थ आहे जो कुठेही सहज उपलब्ध होतो. (How to Use Aloe Vera Gel for Hair Growth)
केसांना एलोवेरा जेल लावण्याची योग्य पद्धत
१) एलोवेरा जेल नेहमीच सुक्या केसांना लावायला हवं. ओल्या केसांना लावल्यानं पाण्यासह एलोवेरा जेल पण सुकते. म्हणूनच एलोवेरा जेल लावताना केस कोरडेच हवेत.
२) एका वाटीत एलोवेरा जेल घ्या आणि बोटांच्या साहाय्यानं केसांच्या मुळांना आणि लांबीवर लावा. अर्ध्या तासासाठी हे जेल तसेच ठेवा. अर्ध्या तासानं केस शॅम्पूनं धुवा.
३) कोरफडीचे जेल आठवड्यातून दोनदा केसांना लावता येते. हे उत्कृष्ट कंडिशनिंग आणि स्मूथिंगचे कार्य करते. ते लावल्यानंतर नेहमी सौम्य शॅम्पू वापरा.
तुम्ही एलोवेरा जेल तुम्ही इतर गोष्टींसोबत मिसळूनही लावू शकता. तुम्ही त्यात खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल टाकून केसांना लावू शकता. यामुळे तुमच्या केसांना पूर्ण पोषणही मिळेल आणि केसांचा कोरडेपणाही निघून जाईल.तुम्हाला हवे असल्यास तुम्ही एलोवेरा जेल ग्रीन टीमध्ये मिसळून केसांना लावू शकता. यामुळे तुमचे केस चमकदार आणि दाट होतील आणि त्यांची चमक दिसून येईल.
एलोवेरा जेलचा वापर केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी केला जातो. कोरफड तुमच्या केसांना मुळापासून मजबूत करण्याचे काम करते. याच्या वापराने केस मजबूत, चमकदार आणि लांब होतात. कोरफडीची वनस्पती अनेक औषधी गुणधर्म आणि घटकांनी समृद्ध आहे, ज्यामुळे त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्या कमी होतात.
हे जेल केसांच्या वाढीसाठी सर्वोत्तम उपाय ठरू शकते. केसांच्या चांगल्या वाढीसाठी कोरफडीचा थेट वापरही करता येतो. तुम्हाला फक्त कोरफडीचे ताजे पान घ्यायचे आहे आणि ते मधोमध कापायचे आहे. आता पानाचा आतील भाग म्हणजेच जेल तुमच्या केसांवर आणि टाळूवर लावावे लागेल.