Lokmat Sakhi >Beauty > केसात भरमसाठ कोंडा-उवा-लिखांचाही त्रास? जावेद हबीबने सांगितला खास उपाय, खर्च १० रुपये

केसात भरमसाठ कोंडा-उवा-लिखांचाही त्रास? जावेद हबीबने सांगितला खास उपाय, खर्च १० रुपये

How to Use Alum on Hair: केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी सुद्धा चमत्कारिक ठरते. पण अनेकांना तुरटी केसांवर कशी लावावी किंवा यापासून काय फायदे मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:55 IST2025-04-10T11:12:33+5:302025-04-11T16:55:20+5:30

How to Use Alum on Hair: केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी सुद्धा चमत्कारिक ठरते. पण अनेकांना तुरटी केसांवर कशी लावावी किंवा यापासून काय फायदे मिळतात.

How to apply alum on hair? Hair expert Jawed Habib told its benefits | केसात भरमसाठ कोंडा-उवा-लिखांचाही त्रास? जावेद हबीबने सांगितला खास उपाय, खर्च १० रुपये

केसात भरमसाठ कोंडा-उवा-लिखांचाही त्रास? जावेद हबीबने सांगितला खास उपाय, खर्च १० रुपये

How to Use Alum on Hair:  सामान्यपणे अनेकांच्या घरात तुरटी सहजपणे असतेच. वेगवेगळ्या कामांसाठी याचा वापर केला जातो. अनेकांना तर केवळ हेच माहीत असेल की, तुरटी केवळ पुरूषांनी दाढी केल्यावरच चेहऱ्यावर फिरवावी लागते. पण असं काही नाहीये. कारण तुरटी बहुगुणी अशी गोष्ट आहे. तोंडाची स्वच्छता, त्वचेवरील जखमा भरणे, त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करणे यासोबतच केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी सुद्धा चमत्कारिक ठरते. पण अनेकांना तुरटी केसांवर कशी लावावी किंवा यापासून काय फायदे मिळतात. तेच आज जाणून घेणार आहोत.

एक्सपर्ट्सचा सल्ला

प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब (Jawed Habib) अलिकडेच त्यांच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, जर तुमच्या डोक्यामध्ये भरपूर कोंडा झाला असेल तर ज्यामुळे सतत डोकं खाजवत असेल तर तुरटी गुणकारी ठरू शकते. तुरटीनं केसांमधील कोंडा लगेच दूर होतो.

कशी लावाल तुरटी?

जावेद हबीब सांगतात की, केसांवर तुरटी कशी लावाल हे फार सोपं काम आहे. कोंडा दूर करण्यासाठी कोणतंही शाम्पू घ्या आणि त्यात तुरटीचं पावडर मिक्स करा. हे शाम्पू डोक्याच्या त्वचेवर केसांना चांगलं लावा. त्यानंतर केस धुवा. 

हा उपाय आठवड्यातून एक वेळा करू शकता. असं केल्यास तुम्हाला काही दिवसातच केसांमधील चिव्वट कोंडा दूर झालेला दिसेल आणि केस चमकदार व मुलायम देखील होतील.

तुरटीचा फायदा

अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, तुरटीमध्ये अ‍ॅंटी-सेप्टीक गुणांसोबतच अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुणही असतात. जे डोक्याच्या त्वचेवर चिकटून बसलेला कोंडा दूर करण्यास मदत करतात.

केवळ केसांमधील कोंडाच नाही तर डोक्यात उवा झाल्या असतील त्या सुद्धा तुरटीच्या मदतीनं निघून जातात. यातील अॅंटी-बॅक्टेरिअल गुण उवांना मारतात. यासाठी आठवड्यातून एक ते दोन वेळा तुरटीच्या पाण्यानं केस धुवू शकता.

तुमचे केस जर पांढरे झाले असतील तर यासाठी तुरटीच्या पावडरमध्ये गुलाबजल टाकून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांवर सुकेपर्यंत लावून ठेवा. नंतर केस धुवून घ्या. काही वेळा हा उपाय केला तर पांढऱ्या केसांची समस्या दूर होईल.

तुरटीचे अनेक फायदे जरी असले तरी काही लोकांना यापासून नुकसान होऊ शकतं. यासाठी आधी तुरटीची एकदा पॅट टेस्ट नक्की करा. कारण अनेकांना यापासून अ‍ॅलर्जी किंवा खाजेची समस्या होऊ शकते. 

Web Title: How to apply alum on hair? Hair expert Jawed Habib told its benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.