Lokmat Sakhi >Beauty > आयशॅडो व्यवस्थित लावताच येत नाही? ५ टिप्स लक्षात ठेवा- डोळ्यांचा मेकअप होईल परफेक्ट

आयशॅडो व्यवस्थित लावताच येत नाही? ५ टिप्स लक्षात ठेवा- डोळ्यांचा मेकअप होईल परफेक्ट

How To Apply Eyeshadow Perfectly?: साध्या सोप्या टिप्स वापरून डोळ्यांचा मेकअप अगदी प्रोफेशनल पद्धतीने कसा करायचा ते पाहा...(easy eye makeup steps)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2024 11:30 AM2024-03-16T11:30:00+5:302024-03-16T11:34:50+5:30

How To Apply Eyeshadow Perfectly?: साध्या सोप्या टिप्स वापरून डोळ्यांचा मेकअप अगदी प्रोफेशनल पद्धतीने कसा करायचा ते पाहा...(easy eye makeup steps)

How to apply eyeshadow perfectly? Eye makeup tips for beginners, How to do eye makeup quickly? 3 simple steps for applying eyeshadow | आयशॅडो व्यवस्थित लावताच येत नाही? ५ टिप्स लक्षात ठेवा- डोळ्यांचा मेकअप होईल परफेक्ट

आयशॅडो व्यवस्थित लावताच येत नाही? ५ टिप्स लक्षात ठेवा- डोळ्यांचा मेकअप होईल परफेक्ट

Highlightsया अगदी सोप्या टिप्स पाहा. यामुळे तुम्ही तुमच्या डोळ्यांना अगदी पार्लरसारखा परफेक्ट आणि प्रोफेशनल लूक देऊ शकाल.

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे बऱ्याच जणींचं कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाला जाणं सुरूच आहे. आता लग्नसराईतले कार्यक्रम म्हटलं की आपला मेकअप आणि आपला लूक परफेक्ट हवाच. म्हणूनच मेकअप करताना नेमका डोळ्यांचा मेकअप कसा करायचा, याच्या या काही खास टिप्स पाहून घ्या. बऱ्याच जणींना डोळ्यांना आयशॅडो कसं लावावं कळत नाही (Eye makeup tips for beginners). किंवा आयशॅडोच्या रंगांचं कलर कॉम्बिनेशन कसं करावं ते लक्षात येत नाही (How to do eye makeup quickly?). त्यासाठीच या अगदी सोप्या टिप्स पाहा. यामुळे तुम्ही तुमच्या डोळ्यांना अगदी पार्लरसारखा परफेक्ट आणि प्रोफेशनल लूक देऊ शकाल. (5 simple steps for applying eyeshadow)

डोळ्यांना आयशॅडो कसं लावायचं?

 

आयशॅडो लावताना नेमके रंग कसे निवडायचे आणि कशा पद्धतीने आयशॅडो लावायचं याविषयीचा व्हिडिओ mamta._.artistry या पेजवर शेअर केला आहे.

शिल्पा शेट्टी म्हणते- मुलींनी श्रीमंत मुलांशी लग्न केलं तर काय चुकलं? राजशी लग्न केल्यानंतर मलाही.... 

१. यामध्ये सांगितलेली सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे सुरुवातीला नारंगी, केशरी, अबोली अशा रंगाची शेड घेऊन ती भुवयांच्या खालच्या भागात लावून घ्या. ही शेड खूप डार्क लावू नका.

२. त्यानंतर त्याच रंगाशी मिळताजुळता पण डार्क रंगाचा शेड घेऊन डोळ्यांच्या कोपऱ्याच्या वर लावा. आयब्रोज जिथे संपतात ते टोक आणि डोळ्यांच्या बाहेरच्या कडा यांच्या दरम्यान हा शेड लावा.

 

३. यानंतर एखादा ग्लाॅसी, ग्लिटरी किंवा शिमरी शेड घेऊन तो डोळ्यांच्या अगदी मधाेमध लावा. 

४. आता पांढऱ्या रंगाचं हायलायटर घेऊन ते बारीक ब्रशच्या साहाय्याने भुवयांच्या खाली अगदी चिटकून तसेच डोळ्यांच्या आतल्या कोपऱ्याच्या वरच्या बाजुला लावा. 

'हा' त्रास असणाऱ्या लोकांनी लसूण खाणं टाळावं, बघा लसूण खायचाच असल्यास कसा- किती खावा?

५. अशा पद्धतीने आयशॅडो लावल्यानंतर आयलायनर आणि मस्कारा लावला की झाला तुमचा डोळ्यांचा मेकअप... कोणत्याही पार्टीसाठी किंवा लग्नासाठी जाताना अशा पद्धतीने आय मेकअप करा. तुमचा लूक बदलण्यासाठी नक्कीच मदत होईल. 

 

Web Title: How to apply eyeshadow perfectly? Eye makeup tips for beginners, How to do eye makeup quickly? 3 simple steps for applying eyeshadow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.