Join us  

फेस सिरम लावताना लक्षात ठेवा ५ गोष्टी; परफेक्ट इफेक्टसाठी स्मार्ट टिप्स, चेहरा दिसेल ग्लोईंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2023 3:00 PM

How To Apply Face Serum in Skin Care Routine : सिरम परफेक्ट कसं लावावं याविषयी...

आपली स्कीन कायम तजेलदार, मुलायम राहावी यासाठी आपण स्कीन केअर रुटीनमध्ये विविध प्रकारच्या उत्पादनांचा समावेश करत असतो. यामध्ये फेस वॉशपासून ते टोनर, सिरम, मॉईश्चरायजर, फाऊंडेशन, ब्लशर अशा विविध गोष्टींचा समावेश असतो. अनेकदा आपण चांगलं दिसायचं या नादात या गोष्टी बाजारातून खरेदी करतो खऱ्या. पण त्या कशा वापरायच्या याबाबत आपल्याला माहिती असतेच असं नाही. सिरम ही स्कीन केअर मधील एक अतिशय महत्त्वाची पायरी असून त्वचेचे योग्य रितीने पोषण होण्यासाठी आणि त्वचा हायड्रेट राहण्यासाठी सिरमचा वापर केला जातो (How To Apply Face Serum in Skin Care Routine). 

बाजारातून सिरम विकत घेताना आपण चांगला ब्रँड पाहतो, आपल्या त्वचेला सूट होईल असे किंवा वातावरणाला योग्य असे सिरम खरेदी करतो. पण ते लावताना कोणती काळजी घ्यायला हवी, कशापद्धतीने लावले तर आपल्याला त्याचे जास्त फायदे होतील याबाबत आपल्याला माहिती असतेच असे नाही. म्हणूनच प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल पंथ यांनी याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत, त्या कोणत्या ते पाहूया...

(Image : Google)

१. सिरम लावताना चेहरा आणि हात स्वच्छ करा. चेहऱ्यावर प्रमाणापेक्षा जास्त ओलसरपणा नसेल याची काळजी घ्या. कोरड्या त्वचेसाठी आणि ओलसर त्वचेसाठी कोणते सिरम वापरायचे याबाबत योग्य ती माहिती घेऊन त्यानुसार सिरमचा वापर करा.

२. अनेकदा सिरम लावताना ते ड्रॉपरने थेट चेहऱ्यावर लावले जाते. असे करण्यापेक्षा हातावर काही थेंब घेऊन मग ते चेहऱ्यावर लावल्यास नीट लावले जाते. ड्रॉपरने सिरम कुठे जाते ते समजत नाही आणि काही ठिकाणी कमी लागते तर काही ठिकाणी जास्त लागते. 

३. चेहऱ्यावर बोटाने लहान लहान ठिपके देऊन सिरम लावा. जेणेकरुन चेहऱ्याचा कोणताही भाग वगळला जाणार नाही. सॅलिसिलीक अॅसिड असलेले सिरम तेलकट भागावर किंवा कपाळ, नाक या मुरुम येणाऱ्या भागात लावायला हवे. 

४. सिरमचे चेहऱ्याला लावलेले ठिपके चेहऱ्यावर हळूवार समाज करत हाताने सगळीकडे एकसारखे पसरवा. 

५.  सिरम लावल्यावर चेहऱ्याला मसाज करण्याची गरज नसते. पण सिरम चेहऱ्यावर नीट पसरावे म्हणून वरच्या बाजूला आणि बाहेरच्या बाजुला मालिश करा. त्यामुळे तुमचा तणाव कमी होण्यास मदत होईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीमेकअप टिप्स