सणासुदीच्या खास प्रसंगी स्त्रिया आवर्जून मेकअप करतात. मेकअप करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेकअप करण्यापूर्वी फाउंडेशन लावणे. फाउंडेशनशिवाय मेकअप फार काळ चेहेऱ्यावर टिकत नाही. फाउंडेशनमुळे चेहऱ्याचे टेक्शर सामान दिसते. चेहऱ्यावरची त्वचा एकसमान, नितळ दिसण्यास मदत होते. आपल्या त्वचेनुसार फाउंडेशनचा वापर केला जातो. फाउंडेशन (Foundation Routine And Makeup Tips) लावल्याने चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या अशा गोष्टी लपतात. मात्र, चुकीच्या पद्धतीने फाउंडेशन वापरल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. चेहऱ्यावर योग्य पद्धतीने फाउंडेशन लावल्यास चेहरा उजळून चमकू लागतो. याउलट चुकीच्या पद्धतीने लावलेल्या फाउंडेशनमुळे आपला चेहरा सुंदर दिसण्याऐवजी निस्तेज दिसू लागतो(How To Apply Foundation For Full Coverage).
या सणासुदीच्या दिवसांत बरेचदा अनेक खास प्रसंगी आवर्जून मेकअप केला जातो. मेकअप करताना फाउंडेशनचा वापर हा नक्कीच केला जातो. मेकअप करणे ही देखील एक कला आहे. त्यामुळे मेकअप कसा करायचा हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. फाउंडेशनचा वापर चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी केला जातो. परंतु, बहुतेकजणींना फाउंडेशन कसे लावायचे (What is the correct way to apply foundation) हे माहित नसते. यंदाच्या सणासुदीच्या दिवशी मेकअप करताना चेहऱ्यावर फाउंडेशन लावण्याची योग्य पद्धत कोणती हे पाहूयात(4 TIPS TO MAKE YOUR FOUNDATION COVERAGE LOOK FLAWLESS).
चेहऱ्यावर फाउंडेशन लावण्याची योग्य पद्धत...
१. प्राइमर लावणे महत्त्वाचे :- अनेकजणींना असे वाटते की प्राइमर लावणे कदाचित तितकेसे महत्त्वाचे नाही, परंतु अशी अनेक कारणे आहेत जी प्राइमरला मेकअपचा महत्त्वाचा भाग बनवतात. सर्वप्रथम, आपल्याला मेकअपसाठी एक गुळगुळीत बेस आवश्यक असणे गरजेचे असते, ज्यासाठी प्राइमर लावणे खूप महत्वाचे असते. प्राइमर आपल्या त्वचेची छिद्रे भरते आणि असमान भाग भरते, ज्यामुळे आपल्याला मेकअप नंतर एकसामान गुळगुळीत फिनिशिंग मिळते.
२. कन्सीलरच्या आधी फाउंडेशन लावू नका :- चेहऱ्यावरील काळे डाग आणि पॅचेस लपविण्यासाठी फाउंडेशनच्या आधी कन्सीलर लावू नका . कन्सीलर लावल्यानंतर, जेव्हा आपण फाउंडेशन लावता आणि ते ब्लेंड करता तेव्हा आधीच लावलेले कन्सीलरही त्यासोबत मिसळते आणि यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग पुन्हा दिसू लागतात. बरेच लोक प्रथम फाउंडेशन लावतात आणि नंतर डोळ्यांखाली आणि इतर ठिकाणी कन्सीलर वापरतात हे चुकीचे आहे. प्रथम फाउंडेशन लावावे आणि नंतर कन्सीलर लावावे. यामुळे चेहऱ्यावर डाग दिसणार नाहीत आणि रंगही एकसारखा दिसेल.
वारंवार केसांना हेअर कलर करूनही केसांचा रंग फिकट होऊ नये म्हणून ७ चुका टाळा...
३. कन्सीलरला सेट होऊ द्यावे :- चेहऱ्याच्या त्वचेवर कन्सीलर लावल्यानंतर ते ब्लेंड करण्यापूर्वी थोड्यावेळासाठी त्वचेवर तसेच राहू द्यावे. यामुळे ते कन्सीलर त्वचेवर व्यवस्थित सेट होईल. कन्सीलरला जितका वेळ आपल्या त्वचेवर आहे तसेच लावून ठेवाल तितके ते चांगले सेट होईल. याचबरोबर ते चांगले ब्लेंड होण्यास देखील मदत होईल.
४. हनुवटी व नाकाच्या टोकावर लक्ष केंद्रित करा :- जेव्हा आपण फाउंडेशन वापरता तेव्हा ते सुंदर आणि ठळक दिसण्यासाठी आपल्या हनुवटी आणि नाकाच्या टोकावर लक्ष केंद्रित करायला विसरू नका. जर आपण कन्सीलर आणि फाउंडेशन पूर्णपणे एकमेकांत ब्लेंड होईपर्यंत एकत्र केले तर आपल्याला अधिक सुंदर परिणाम चेहऱ्यावर दिसेल.
मेथीच्या दाण्यांचे ३ सोपे उपाय, केसांच्या सर्व समस्यांवर एकच असरदार - गुणकारी इलाज...