Lokmat Sakhi >Beauty > नखांवर नेलपॉलिश बराच काळ टिकून राहण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स, वाढवा हाताचं सौंदर्य

नखांवर नेलपॉलिश बराच काळ टिकून राहण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स, वाढवा हाताचं सौंदर्य

जर तुम्हाला तुमच्या नखांवर नेलपॉलिश जास्त काळ टिकून राहावी असं वाटत असेल, तर तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 13:11 IST2025-03-02T13:10:18+5:302025-03-02T13:11:24+5:30

जर तुम्हाला तुमच्या नखांवर नेलपॉलिश जास्त काळ टिकून राहावी असं वाटत असेल, तर तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता.

how to apply nail polish to last longer | नखांवर नेलपॉलिश बराच काळ टिकून राहण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स, वाढवा हाताचं सौंदर्य

नखांवर नेलपॉलिश बराच काळ टिकून राहण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स, वाढवा हाताचं सौंदर्य

नखांचं सौंदर्य वाढवण्यासाठी, महिला वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर नेलपॉलिश निवडतात आणि त्यांच्या ड्रेसच्या रंगानुसार ती नखांवर लावतात. पण कधीकधी असं होतं की, काही काळानंतर नखांवरून नेलपॉलिश निघून जाते आणि नखांचं सौंदर्य कमी होतं. जर तुम्हाला तुमच्या नखांवर नेलपॉलिश जास्त काळ टिकून राहावी असं वाटत असेल, तर तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता. या टिप्स फॉलो केल्याने नेलपॉलिश नखांवर बराच काळ टिकेल आणि नखंही फारच सुंदर दिसतील.

बेस कोट लावा

नेलपॉलिश तुमच्या नखांवर जास्त काळ टिकून राहावी म्हणून नेलपॉलिश लावण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या नखांवर बेस कोट लावा. बेस कोट लावल्याने नेलपॉलिश जास्त काळ टिकते आणि नखंही सुंदर दिसतात.

नेलपॉलिशचा पातळ लेयर लावा

जर तुम्हाला परफेक्ट आणि दीर्घकाळ टिकणारी नेलपॉलिश लावायची असेल तर नेलपॉलिशचा पातळ लेयर लावा. जर तुम्ही अशा प्रकारे नेलपॉलिश लावली तर तुमच्या नखांना परफेक्ट नेलपॉलिश लागेल आणि सुकल्यानंतर ती आणखी चमकेल.

टॉप कोट लावा

नेलपॉलिश परफेक्ट लावण्यासाठी आणि नखं देखील सुंदर दिसण्यासाठी, तुम्हाला टॉप कोट लावावा लागेल. या टॉप कोटमुळे तुमच्या नखांना चमकदार लूक मिळेल आणि नेलपॉलिश तुमच्या नखांवर बराच काळ टिकून राहिल.

'या' गोष्टी ठेवा लक्षात

- चांगल्या क्वालिटीची नेल पेंट निवडा.

- नेलपॉलिश लावण्यापूर्वी नखं पूर्णपणे स्वच्छ करा.

- नेलपॉलिश थंड आणि कोरड्या जागी ठेवा.

- नेलपॉलिश लावल्यानंतर क्यूटिकल ऑइल वापरा.

नेलपॉलिश लावल्यानंतर जर तुम्ही या टिप्स फॉलो केल्यावर तुमच्या नखांवर लावलेली नेलपॉलिश बराच काळ टिकेल.
 

Web Title: how to apply nail polish to last longer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.