Lokmat Sakhi >Beauty > परफेक्ट काजळ कसं लावायचं? १ सोपा उपाय, काजळ दिवसभर पसरणार नाही, डोळे दिसतील सुंदर...

परफेक्ट काजळ कसं लावायचं? १ सोपा उपाय, काजळ दिवसभर पसरणार नाही, डोळे दिसतील सुंदर...

Makeup tips how to prevent kajal from smudging on eyelids : काजळ लावलं आणि ते चेहऱ्यावर पसरलं तर ते चांगलं नाही दिसत, म्हणून काजळ लावण्याची ही परफेक्ट पद्धत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 01:51 PM2023-01-16T13:51:35+5:302023-01-16T13:53:51+5:30

Makeup tips how to prevent kajal from smudging on eyelids : काजळ लावलं आणि ते चेहऱ्यावर पसरलं तर ते चांगलं नाही दिसत, म्हणून काजळ लावण्याची ही परफेक्ट पद्धत.

How to apply perfect kajal? 1 simple solution, the kajal will not spread throughout the day, the eyes will look beautiful... | परफेक्ट काजळ कसं लावायचं? १ सोपा उपाय, काजळ दिवसभर पसरणार नाही, डोळे दिसतील सुंदर...

परफेक्ट काजळ कसं लावायचं? १ सोपा उपाय, काजळ दिवसभर पसरणार नाही, डोळे दिसतील सुंदर...

काजळ हे डोळ्यांचे सौंदर्य खुलविण्याचा एक महत्वाचा शृंगार आहे. डोळे अधिक आकर्षक दिसावते म्हणून आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाधन लावतो. आय शॅडो, आय लायनर, यांसारख्या विविध प्रसाधन साधनांचा आपण रोज वापर करत असतो.आपल्यापैकी काहीजणी सणासमारंभाला जाताना किंवा अगदी ऑफिसला जाताना देखील किमान आयलायनर, काजळ लावतात. आजच्या काळात मुलींसाठी काजळ लावणे हे एक फॅशन स्टेटमेंट बनले आहे. यामुळे चेहरा खुलून दिसतो.पण दिवसभर काजळ टिकून न राहता ते स्प्रेड झाल्याने डोळ्यांच्या खाली काळे डाग दिसतात. यामुळे सौंदर्य खुलण्याऐवजी अधिकच भयाण दिसते. यासाठीच काजळ चेहर्‍यावर पसरू नये म्हणून या काही खास टीप्स जरूर पाळा. आपण देखील काजल पसरण्याच्या भीतीने ते लावणे टाळत असला, तर चिंता सोडा. अशा काही खास टीप्स समजून घेऊयात की, ज्यामुळे तुमचे काजळ दिवसभर व्यवस्थित टिकून राहील (Makeup tips how to prevent kajal from smudging on eyelids).

नक्की काय करता येऊ शकत ?

१. फेस पावडरचा असा करा वापर... 

आपण काजळ लावल्यानंतर चेहऱ्यावर घाम येत असेल. तर काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांवर मॉईस्चराईजरचा वापर करू नका. तेलकट त्वचा असणाऱ्या महिलांनी काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांच्या आजूबाजूला फेस पावडरचा वापर करा. आधी फेस पावडर लावा. यामुळे काजळ जास्त काळ टिकण्यास आणि न पसरण्यास मदत मिळते. तसेच घामामुळे काजळ पसरत नाही पावडरमुळे व्यवस्थित टिकून राहते. काजळ लावण्यापूर्वी पापण्यांवर तसेच डोळ्यांच्या दोन्ही कडांना आणि डोळ्यांच्या खालच्या भागावर पावडर लावून घ्या. यामुळे त्याभागातील मॉईश्चर शोषले जाईल तसेच काजळ पसरण्यापासून तुमचा बचाव होईल. काजळ लावल्यानंतर अतिरिक्त पावडर ब्रशने पुसा. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात याचा वापर केल्यास, काजळ न पसरण्यास मदत मिळते. त्याचप्रमाणे काजळ जास्त काळ टिकून राहण्यास उपयोग होतो.

काजळ पसरू नयेत म्हणून वापरा या ५ टीप्स... 

१. काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांच्य खालचा भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवा. तेथील ऑईल ग्लॅंड्समधून अतिरिक्त तेल बाहेर पडणार नाही याची काळजी घ्या. यासाठी काजळ लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून टॉवेलने कोरडा करून मगच डोळ्यांमध्ये काजळ लावा. 

२. डोळ्यांवर जाडसर आयलायनर लावयचे झाल्यास स्मज-फ्री काजळ पेन्सिल वापरा. काजळच्या क्वालिटीवरदेखील सौंदर्य अवलंबून असते. हलक्या दर्जाचे काजळ वापरल्यास त्यामुळे  डोळ्यांना इजा होण्याची, खाज येण्याची शक्यता अधिक असते.

३. काही केल्या काजळ टिकत नसेल तर जेल लाइनर वापरा. हे घट्ट असतं आणि पसरत नाही. पेन्सिल काजळच्या तुलनेत हे महाग असले तरी दिवसभर टिकून राहते. 

४. आपल्या पापण्या अधिक ऑयली असल्यास स्वतःकडे ब्लॉटिंग पेपर कॅरी करण्याची सवय ठेवा. जेव्हाही कधी तुम्हाला ऑयली फिल व्हायला लागेल तेव्हा  ब्लॉटिंग पेपरच्या मदतीने ते एक्स्ट्रा ऑइल टिपून घ्या.

५. नेहमी उच्च ब्रँडेड काजळ वापरा. बाजारात अनेक आणि स्वस्त पर्याय उपलब्ध असले तरी आपल्याला सर्वोत्तम काजळ निवडायचे आहे हे लक्षात असू द्या. इतर काजळ लवकर पसरतात आणि डोळ्यांच्या जवळपास डाग सोडतात.

Web Title: How to apply perfect kajal? 1 simple solution, the kajal will not spread throughout the day, the eyes will look beautiful...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.