Join us  

चेहऱ्याला सिरम लावण्याची योग्य पद्धत कोणती? तज्ज्ञ सांगतात, ४ महत्त्वाच्या टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 9:40 AM

How To Apply Vitamin C Serum on Face : सिरमचा नियमित वापर केल्याने त्वचेच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत करते.

ठळक मुद्देत्वचा चांगली राहण्यासाठी आपण काही सौंदर्यप्रसाधने वापरतो खरी पण ती वापरण्याची योग्य पद्धत माहिती असायला हवीसिरम लावण्यामुळे त्वचेला बरेच फायदे होतात पण ते लावण्याची योग्य पद्धत माहिती असायला हवी

चेहरा कायम तरुण आणि फ्रेश दिसावा यासाठी आपण विविध सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतो. यामध्ये सनस्क्रीन, फाऊंडेशन, टोनर यांबरोबरच सिरमचाही समावेश असतो. त्वचा कायम नितळ आणि तरुण दिसावी यासाठी व्हिटॅमिन सी (vitamin C) असलेलं सिरम निवडण्याला तरुणींकडून प्राधान्य दिलं जातं (How To Apply Vitamin C Serum on Face). 

आहारातून त्वचेचे पोषण व्हावे म्हणून संत्री, लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश करायला हवा असं आपण ऐकतो. पण ते म्हणावे तसे होतेच असे नाही. अशावेळी व्हिटॅमिन सी सिरम अतिशय चांगले काम करते. त्वचा चमकदार होण्यासाठी तसेच डेड स्किन काढून टाकण्यासाठी नियमितपणे सिरम लावणं गरजेचं आहे.

(Image : Google)

 त्वचेत खोलवर जाऊन काम करते. जर तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्या असतील तर तुम्ही टोनिंगनंतर सिरम वापरावे. सिरमचा नियमित वापर केल्याने त्वचेच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत करते. परंतु, त्वचेवर कोणतेही सिरम वापरण्यापूर्वी आपण काळजी घ्यायला हवी. यासाठीच सिरम वापरण्याची किंवा चेहऱ्याला लावण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत आपल्याला पुरेशी माहिती असायला हवी. प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. जयश्री शरद आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देतात. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून त्या नेहमी त्वचेसंबंधी अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करत असतात. पाहूयात सिरमविषयी त्या काय सांगतात...

सिरम कसे लावावे?

१. आपल्या तळहातावर ३ ते ४ थेंब सिरम घ्या.

२. त्यानंतर बोटांनी हे सिरम संपूर्ण चेहऱ्यावर टॅप करुन लावा. 

३. सर्वात महत्त्वाचे डोळ्यांच्या खाली, कानाच्या बाजूला, कपाळावर, हनुवटीला आणि गळ्याला सिरम लावायला विसरु नका.

४.  तुम्ही दिवसा सिरम वापरत असाल तर त्यावर सनस्क्रीन लावायला विसरु नका. 

फायदे काय ? 

१. ओलावा टिकून राहण्यास मदत होते. 

२. त्वचेचा टोन एकसारखा दिसतो.

३. डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.

४. सुरकुत्या येण्याची प्रक्रिया मंदावते. 

५. त्वचा नितळ, चमकदार व्हायला मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्सत्वचेची काळजी