Lokmat Sakhi >Beauty > मेहंदी लावल्यानंतर केस कोरडे होतात? बघा मेहंदी लावण्याची योग्य पद्धत- केस होतील मऊ, चमकदार

मेहंदी लावल्यानंतर केस कोरडे होतात? बघा मेहंदी लावण्याची योग्य पद्धत- केस होतील मऊ, चमकदार

How To Avoid Dryness Of Hair After Applying Mehendi: मेहंदी लावल्यानंतर केस कोरडे होतात, अशी अनेक जणींची समस्या आहे. म्हणूनच केसांना योग्य पद्धतीने मेहंदी कशी लावायची ते पाहा...(proper method of applying mehendi to hair)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2024 12:29 PM2024-07-26T12:29:31+5:302024-07-26T12:30:08+5:30

How To Avoid Dryness Of Hair After Applying Mehendi: मेहंदी लावल्यानंतर केस कोरडे होतात, अशी अनेक जणींची समस्या आहे. म्हणूनच केसांना योग्य पद्धतीने मेहंदी कशी लावायची ते पाहा...(proper method of applying mehendi to hair)

how to avoid dryness of hair after applying mehendi, proper method of applying mehendi to hair | मेहंदी लावल्यानंतर केस कोरडे होतात? बघा मेहंदी लावण्याची योग्य पद्धत- केस होतील मऊ, चमकदार

मेहंदी लावल्यानंतर केस कोरडे होतात? बघा मेहंदी लावण्याची योग्य पद्धत- केस होतील मऊ, चमकदार

Highlightsअशा पद्धतीने जर मेहंदी लावली तर तुमचे केस मुळीच राठ, कोरडे होणार नाहीत. उलट केसांना छान मऊपणा येऊन ते चमकदार होतील. 

हल्ली कमी वयातच खूप जणांचे केस पांढरे होत आहेत. अगदी शाळा- कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींचेही केस पांढरे झाल्याचं दिसतं. अशावेळी इतक्या कमी वयापासूनच केसांवर कोणताही डाय किंवा केमिकलयुक्त रंग लावायला नको वाटतं. म्हणूनच पांढरे केस लपविण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे केसांना मेहंदी लावणे. पण मेहंदी लावल्यानंतर केस कोरडे, राठ होतात. अगदी झाडूसारखे होतात, असा अनेकजणींचा अनुभव आहे. तुम्हालाही मेहंदी लावल्यानंतर हीच समस्या जाणवत असेल तर केसांना मेहंदी लावण्याची योग्य पद्धत एकदा पाहून घ्या (how to avoid dryness of hair after applying mehendi). यामुळे केसांना अजिबातच कोरडेपणा जाणवणार नाही..(proper method of applying mehendi to hair)

 

केसांना मेहंदी लावण्याची याेग्य पद्धत

मेहंदीमध्ये असणारे काही घटक केसांना निश्चितच कोरडे बनवितात. त्यामुळे केसांना मेहंदी वारंवार लावू नये. महिन्यातून एकदा मेहंदी लावणे योग्य आहे.

 

दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही? मग कुरकुरीत डोसे करा- बघा नाश्त्यासाठी चवदार रेसिपी 

मेहंदी कधीही कोरड्या केसांवर लावू नये. मेहंदी लावण्यापुर्वी आधी केसांना कोमट तेलाने मालिश करावी. अगदी केसांच्या मुळांपासून ते टोकापर्यंत व्यवस्थित तेल लावावे आणि त्यानंतर २ ते ३ तासांनी केसांना मेहंदी लावावी.

२ तासांपेक्षा जास्त काळ केसांवर मेहंदी ठेवू नये.

 

मेहंदी भिजवताना त्यात दही किंवा ताक नक्की टाकावे. कारण दही आणि ताक केसांना मऊपणा देण्यास मदत करतात. दही किंवा ताक नसल्यास केळ मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट मेहंदी भिजवताना त्यात टाका. यामुळेही केसांना मऊपणा येतो. 

सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी मोबाईल पाहता? डोळ्यांसकट तब्येतीवर होतील ३ वाईट परिणाम

मेहंदी धुताना शाम्पूचा वापर करू नये. नुसत्या पाण्याने मेहंदी काढून टाकावी. यानंतर केसांना कोरफडीचा गर किंवा ॲलोव्हेरा जेल लावून १० ते १५ मिनिटे ठेवावे आणि त्यानंतर पुन्हा नुसत्या पाण्याने केस धुवावे. शाम्पू, कंडिशनर वापरू नये.

पावसाळ्यात एक्झॉस्ट फॅन, किचनच्या टाईल्स खूपच चिकट होतात? पाहा तेलकटपणा घालविण्याचा सोपा उपाय 

यानंतर केस पुर्णपणे सुकले की केसांना तेल लावून मालिश करा. आणि दुसऱ्यादिवशी केस शाम्पू करा. अशा पद्धतीने जर मेहंदी लावली तर तुमचे केस मुळीच राठ, कोरडे होणार नाहीत. उलट केसांना छान मऊपणा येऊन ते चमकदार होतील. 

 

Web Title: how to avoid dryness of hair after applying mehendi, proper method of applying mehendi to hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.